मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला जेनेलीयाकडून महागडं बर्थ डे गिफ्ट..

0
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला जेनेलीयाकडून महागडं बर्थ डे गिफ्ट..

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडी म्हणजे रितेश आणि जेनेलिया..

१७ डिसेंबरला रितेशने आपला ४० वाढदिवस साजरा केला होता. जेनेलीयाने रितेशला एक महागडं बर्थ डे गिफ्ट दिले आहे.

ह्या गिफ्टचे फोटो ट्विटरवर शेअर करत रितेशने या बर्थ डे गिफ्टची माहिती दिली. नुकतीच भारतामध्ये लॉन्च झालेली टेस्ला एक्स महागडी कार जेनेलियाने रितेशला बर्थ डे गिफ्ट दिली आहे.
पाहूया..

४० वर्ष असणाऱ्या बर्थ डे बॉयला २० वर्षाचा असल्याचे कसं जाणवून द्यायचं हे बायकोला नेमकं माहित आहे, असं ट्वीट रितेश देशमुखने केलं आहे.

२०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलियाला २ मुलं आहेत. तसेच रितेश आणि जेनेलिया यांना बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं.

सध्या या  कारची भारतामध्ये किंमत ६८ लाख रु. च्या आसपास आहे. ही कार प्रतितास १३५ किमी. वेगाने धाऊ शकते. पाच दरवाजे असून विजेवर चालत असल्याने आरटीओच्या करांमधून सूट मिळाल्याचे कळतं.

Source

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.