ग्लेनमार्कचे कोविड-19 वरील औषध बाजारात, एक गोळी 103 रुपयांला उपलब्ध

0
ग्लेनमार्कचे कोविड-19 वरील औषध बाजारात, एक गोळी 103 रुपयांला उपलब्ध
Spread the love

कोविड-19 वरील औषध 34 गोळ्यांसह एक पट्टीमध्ये उपलब्ध असेल. MRP. 3500 ₹ म्हणजेच जास्तीत 3500 रुपयात गोळ्यांचे एक पाकीट उपलब्ध होईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने सांगितले.

Favipiravir FabiFlu
© India Today

औषधाची किंमत 103 ₹ प्रति गोळी आहे. २०० मिलीग्राम प्रति गोळी मध्ये याची पट्टी उपलब्ध आहे. कोरोना रुग्णाला पहिल्या दिवशी 1800 मिलीग्राम दोन डोस आणि त्यानंतर 14 दिवस रोज दोनदा 800 मिलीग्राम डोस देण्याची शिफारस केली गेली आहे.

औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी म्हटले आहे की त्यांनी Favipiravir या ब्रँडखाली FabiFlu नावाने अँटीवायरल औषध लॉन्च केले आहे. कोविड-19 च्या उपचारासाठी FabiFlu हे भारतातील पहिले तोंडाद्वारे घेतले जाणार औषध आहे. हे औषध रुग्णालये आणि किरकोळ मेडिकल मध्ये सुद्धा उपलब्ध होईल.

प्रत्येक रुग्णासाठी दोन पट्ट्या लक्षात घेता, ग्लेनमार्क पहिल्या महिन्यातच सुमारे 82,500 रूग्णांना FabiFlu औषध पुरवू शकते. बारकाईने परिस्थितीचे निरीक्षण करून क्षमता वाढवण्याचा कंपनी विचार करत आहे.

FabiFlu drug

FabiFlu चा वापर मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या कोविड-19 रूग्णांसाठी केला जाऊ शकतो. यात सौम्य ते मध्यम लक्षणे असणा-या रूग्णांसाठी या औषधांचा वापर केला जाऊ शकतो, असे ग्लेनमार्क कंपनीने सांगितले.

हे औषध चार दिवसात व्हायरल त्रास कमी करू शकते आणि रुग्णामध्ये लक्षणात्मक सुधारणा करू शकते. FabiFlu औषधाने सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या 88 टक्क्यांपर्यंतच्या रुग्णांमध्ये सुधारणा घडवली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना उपचार सुरू असलेल्या प्रत्येक दवाखान्यात हे औषध उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.