दत्त जयंती जन्मकथा, दत्त महाराज माहिती, दत्ताचे अवतार

0
दत्त जयंती जन्मकथा, दत्त महाराज माहिती, दत्ताचे अवतार

दत्तजयंती ही हिंदू पंचांगातली मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला दरवर्षी साजरी केली जाते. दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया (अनुसया नव्हे!) यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्री दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप अवतार आहे.

दत्त जयंती जन्मकथा | Datta Jayanti Birth

दत्त महाराज Datta Maharaj यांची आई अनसूया यांच्या पतिव्रतेची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यामुळे देवांच्या पत्नी आपल्या पतीला अनसूया यांची पतिव्रता तपासण्यासाठी पाठवतात.

श्री ब्रह्मा , विष्णू आणि श्री महेश हे अत्रि ऋषी यांची पत्नी माता अनसूया यांची परीक्षा घेण्याचे ठरवतात. परीक्षा घेण्यासाठी तिघेही त्यांच्या ऋषींचा वेष धारण करून आश्रमात भिक्षा मागण्यासाठी येतात. पतिव्रता तपासण्यासाठी ते भिक्षा म्हणून स्तनपान ( मम् दुग्ध ) करण्याची मागणी करतात. माता अनसूया पतिव्रता नारी होती, परंतु दारात आलेल्या ऋषींना भिक्षा न देणे धर्मात बसत नव्हते. त्यांना देवांची ही खेळी समजली होती. माता अनसूया तिन्ही देवांचे लहान बालकांत रूपांतर करतात आणि स्तनपान करून त्यांना जेवू आणि झोपू घालतात. आपल्या पतीची वाट पाहत असलेल्या देवांच्या पत्नी एवढा उशीर का होतोय हे पाहण्यासाठी आश्रमात येतात, तेव्हा ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना बालरूपात पाहून माता अनुसया यांना देवांना परत मूळ रुपात आणण्याची विनंती करतात. त्या तिन्ही देवांना मूळरूपात आणतात. त्यांच्या चातुर्यावर आणि पतिव्रता वर प्रसन्न होऊन देव त्यांना वर मागण्यास सांगतात. माता अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागतात, तेव्हापासून ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय महाराज यांचा जन्म झाला.

दत्त महाराज माहिती | Datta Maharaj Information in Marathi

Datta Maharaj Information in Marathi
दत्त महाराज

श्रीगुरुदेव दत्त Datta Maharaj हे हिंदू धर्मातील पहिले गुरू मानले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.

दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी अशी हिंदू धर्मात त्यांची महती आहे, त्यांना हिंदू धर्मात देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनसूया यांचे पुत्र दत्तात्रेय यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ होते.
हिंदू पौराणिक साहित्यानुसार हे तिन्ही भाऊ दत्त, सोम आणि दुर्वास हे विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेऊन त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लिनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शुद्रकाने केलेला आहे. योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता म्हणून दत्त महाराज Datta Maharaj यांची महती आहे.
दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुढे पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झालेले आढळतात. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.
Dattatrey, shreedatta, datta jayanti
दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे वेदातील पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण होती. दत्त महाराज Datta Maharaj यांचे मोठे भाऊ ऋषी दुर्वास हे महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे ऋषी होते.

दत्त महाराज शिष्य

यदु

आयु

अलर्क

सहस्रार्जुन

परशुराम,

सांकृती

Dattatreya Mantra श्री दत्त महाराज प्रार्थना

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

सर्वांना माहिती समजण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.

©PuneriSpeaks

अशाच अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि  टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

श्रीकांत कर्वे: ५३ बेजबाबदार लाचखोर RTO अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे आजोबा

मराठा जातीचा दाखला कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.