सोन्याच्या किमती मध्ये २ हजाराने घट, चांदीही ९ हजाराने घसरली

0
सोन्याच्या किमती मध्ये २ हजाराने घट, चांदीही ९ हजाराने घसरली
Share
  • अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमती वर दबाव आला आहे.
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याची घसरण तात्पुरती असू शकते असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सोन्याच्या किमती मध्ये २ हजाराने घट, चांदीही ९ हजाराने घसरली

सोन्याच्या किमती या आठवड्यात घसरल्या आहेत. सोन्याच्या किमती सोबतच चांदीच्या किमती सुद्धा घसरल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांतील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदविली गेलेली आहे. MCX वर शुक्रवारी सोन्याचे दर २३८ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ₹ ४९६६६ वर येऊन स्थिरावले आहेत. चांदी सुद्धा २ टक्याने घसरून प्रतिकिलो ₹ ५९०१८ झाली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर भारतात प्रति १० ग्रॅम २,००० रुपयांनी घसरले आहेत तर चांदीचा दर प्रतिकिलो ९००० रुपयांनी खाली आला आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस च्या म्हणण्यानुसार सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹ ४९२५० च्या खाली घसरु शकतात आणि हे दर जवळपास ₹ ४८९००-४८८०० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सोन्याचे दर ४.६ टक्के तर चांदी १५ टक्क्यांनी खाली आली आहे.

सोन्याच्या दरात घसरण सुरु राहणार?

अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीत वाढलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याची घसरण तात्पुरती असू शकते असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. भू-राजकीय तणाव कायम असतानाच आर्थिक दृष्टिकोनही धूसर राहिला असल्याने सोन्याला खालच्या स्तरावर पाठिंबा मिळू शकेल, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

डॉलरचा सोन्याच्या किंमतींवर कसा परिणाम होतो?

नियमानुसार, जेव्हा जगातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढते, तेव्हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत घसरण होते. कारण इतर चलनांमध्ये सोने अधिक महाग होते. कोणत्याही वस्तूची किंमत जसजशी जास्त वाढते तसतसे कमी खरेदीदार असतात, म्हणजेच मागणी कमी होते.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.