सनी वाघचौरे हा पिंपरी चिंचवड पुणे येथील युवक त्याचे आयुष्य एकदम शाही जगत आहे व त्याचे फोटोमध्ये दिसते सुध्दा… सनी गोल्डन ऑडी, गोल्डन बूट, अंगावर गोल्ड असा त्याचा नेहमीचा पेहराव असतो.
अनेक नेते, अभिनेते सनी सोबत राहतात. सनीने हि कमाई कशी केली असेल त्याबाबत तुम्ही विचार केला का? तर पहिले आपण बघूया सनीचा व्यवसाय काय आहे?
फिल्म फायनांस
सिनेमा बनवायला खर्च खूप येत असतो. त्यामुळे अनेक लोक सिनेमा फायनांस चे काम करतात. सनी सुध्दा हेच काम करतो. सिनेमा जगतात पैसे गुंतविणे हा त्याचा एक व्यवसाय आहे.
जिला गाझियाबाद, जयंतीभाई कि लव स्टोरी सारख्या मोठ्या हिंदी सिनेमाला सनीने फायनांस केलेले आहे. एक हिंदि सिनेमा बनवायला १०० करोड पर्यंत खर्च येत असतो. आणि हे खर्च उचलायचे काम करतो सनी….
बांधकाम व्यावसायिक
सिनेस्टार विवेक ओबेराय सोबत कर्मा इंटरप्रायजेस मध्ये तो पार्टनर आहे. हि कंपनी बांधकामाचे काम करते त्यात तो भरपूर पैसा कमवतो. त्यामुळे अनेक वेळेस विवेक व सनी सोबत दिसतो. दोघाचे संबंध अनेक दिवसापासून आहे.
या अगोदर विवेक व सनीच्या मैत्रीची बातमी पेपरात आली होती आणि दोघाच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. परंतु यावर सनीने स्पष्टीकरण दिले होते कि “मला सोने आवडते, परंतु माझ्या आणि विवेकच्या मैत्रीत याचे काही देणे-घेणे नाही.”
सामाजिक काम
सनी हा समाज भान ठेऊन काम करतो. तो महाराष्ट्र हरित सेना समितीचा सदस्य आहे. महाराष्ट्र शाषण व वन विभागाच्या साह्याने हि समिती बनविण्यात आली आहे. आणि या मार्फत सनी वाघचौरे काम करत असतो.
महागडे मोबाईल
सनीकडे एवढा पैसा आहे तर खर्चही तसाच होणार. त्याच्या मोबाईलची यादी व किंमत बघितल्यास तुम्ही आवाक व्हाल.
खालील मोबाईल सनीकडे आहे. VERTU हा मोबाईल उच्चभ्रू ग्राहकाच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बनविला जातो. मोबाईलची विशेषतः हि कि हा मोबाईल हाताने असेम्बल केला जातो. यामध्ये महागाचे हिरे,खडे वापरण्यात येतात. या मोबाईलची कमीत कमी किंमत ६ लाख ५० हजार पासून सुरु होते.
सनीकडे आयफोन 6S व आयफोन 7 हे दोनीही मोबाईल आहे. आणि हे दोनीही मोबाईल सोने आणि हिर्यापासून बनविले आहे. असाच मोबाईल नीता अंबानी कडेही आहे. या मोबाईलची कमीत कमी किमत १ लाख ७८ हजार रुपये पासून सुरु होते. त्याचे हे दोन मोबाईल कमीत कमी ५ लाखाचे आहे.
Blackberry Passport हा मोबाईल त्याच्या कडे आहे. या मोबाईलची किंमत कमीत कमी 83148.00 पासून सुरवात होते.
महागड्या गाड्या
सनी हा महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याची मर्सडिज हि गाडी तर संपूर्ण सोन्याने मढवलेली आहे. आणि संपूर्ण देशाकरिता त्याच्या हि गाडी मागे चर्चेचा विषय झालेली आहे.
त्याच्या कडे असलेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहे. Audi Q7 या गाडीची बेसिक मॉडल ची किंमत ७७,८४,००० रुपये एवढी आहे. ह्या गाडीला त्याने सोन्याने मढविले आहे त्यामुळे या गाडीच्या किंमतीचा आवाका तुम्ही न लावलेला बरा.
त्याच्या ताफ्यात दुसरी गाडी Audi Q5 हि आहे याच्या बेसिक मॉडल ची किंमत ५७,८३,००० एवढी आहे. त्यानंतर त्याच्या ताफ्यात Audi A4 हि लग्जरी कार आहे त्याची किंमत ४१,५२,००० रुपये आहे.
BMW Z4 हि गाडी सुध्दा त्याच्या ताफ्यात आहे. या गाडीची किंमत ७९,०५,००० रुपये आहे. अश्या महागड्या अनेक गाड्या त्याच्या ताफ्यात आहे.
Jagaur XF हि गाडीही त्याच्या ताफ्याची शान वाढवत आहे. या गाडीची किंमत ५६,३५,००० रुपये आहे.
विशेष म्हणजे त्याने त्याच्या गाडीची नंबर प्लेट हि संपूर्ण हिऱ्यापासून बनवलेली आहे.
सनी गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे. दरवर्षी तो स्वतः तर गणेश मंडळात सामील होतो तसेच दरवर्षी नित्यनेमाने लालबागच्या राजाचे न चुकता दर्शन घेतो. अनेक वर्षापासून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची त्याची हि परंपरा सुरु आहे.
Bollywood मध्येही सनीचे सिनेमा फायनांसमुळे चांगेल संबध आहे. तुम्ही त्याला कधी सलमानच्या कुटुंबासोबत तर कधी कपिल शर्माच्या सो मध्ये बघू शकता. राजकारणामध्येही त्याचे कुटुंब सक्रीय आहे.
तर हि आहे सनी वाघचौरेची रॉयल लाईफ. कमेंट करा आणि कळवा आपल्या प्रतिक्रिया…