Game of Thrones ची ख्याती ऐकली नसेल असे कोणी असेल असे वाटत नाही. जे पाहत नाहीत त्यांनाही या मालिकेबद्दल उत्सुकता असतेच.
काही दिवसांपूर्वी ७ व्या season मधील ४ था भाग प्रदर्शनाआधीच @StarIndia कडून फुटल्याचे समोर आले होते. @StarIndia ला भारतात Game Of Thrones चे प्रदर्शनाचे हक्क असून त्यांच्या कर्मचाऱ्याकडूनच भाग फोडल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून पुढचा तपास चालु आहे.
Game of Thrones ही कायम चर्चेत असणारी मालिका, मग ती सर्वात जास्त Emmy पुरस्कार जिंकल्याबद्दल असुद्या किंवा सगळ्यात जास्त बघितला गेलेला भाग असुद्या नाहीतर सगळ्यात जास्त pirated मालिकेत पहिला क्रमांक असुद्या. कायम चर्चेत राहण्यात अग्रक्रमी.
नुकताच या मालिकेच्या ६ वा भाग सुद्धा फोडला गेल्याचे वृत्त होते पण यावेळी HBO च्या स्पेन विभागातूनच चुकीने हा भाग फुटल्याचा वार्ता होत्या.
अशा वारंवार होणाऱ्या फुटीमुळे HBO च्या कमाईत किती फरक पडतो हे शेवटीच कळेल पण यामध्ये प्रेक्षकांना प्रत्येक भागासाठी वाट बघण्याची उत्सुकता नक्कीच कमी झाल्याची चर्चा मात्र सुरू आहे.
आपणास याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा.
Game Of Thrones चा भाग प्रदर्शनाआधीच फोडल्याबद्दल मुंबईत ४ जणांना अटक
