राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

0
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

कोणत्याही राजकारण्याची सुरुवात ही ग्रामपंचायती पासूनच झालेली असते, काही त्याला अपवाद असतील पण बहुदा सगळे नेते मंडळी आपापल्या भागातील ग्रामपंचायतीपासूनच सुरुवात करून आमदार, खासदार, मंत्री अशी सिंहासने गाठत जातात

 

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल नुकतेच निवडणूक आयोगाने वाजवले असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची विशेषता म्हणजे यावर्षी सरपंच निवडीचे थेट अधिकार मतदारांना दिले गेले आहेत त्यामुळे गावोगावी निवडणुकीचे धुमशान जोरात वाजणार यात शंकेला वाव नाही. सदस्य कोणाचेही असो सरपंच आपला यासाठी बहुदा सर्व पक्ष प्रयत्न नक्की करतील.


राज्यातील ७५७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत.पहिल्या टप्प्यात नाशिक,औरंगाबाद व अमरावती महसूल विभागातील ३८८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.तर दुसऱ्या टप्प्यात कोकण,पुणे,नागपूर विभागातील १६ जिल्ह्यातील ३६९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.

पहिल्या टप्यात ७ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार असून जिल्हानिहाय आकडेवारी:
नाशिक- १७०, धुळे- १०८, जळगाव- १३८, नंदुरबार- ५१, अहमदनगर- २०४, औरंगाबाद- २१२, बीड- ७०३, नांदेड- १७१, परभणी- १२६, उस्मानाबाद- १६५, जालना- २४०, लातूर- ३५३, हिंगोली- ४९, अमरावती- २६२, अकोला- २७२, यवतमाळ- ९३, वाशीम- २८७ आणि बुलडाणा- २८०, एकूण- ३,८८४

दुसऱ्या टप्यात १४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार असून जिल्हानिहाय आकडेवारी:
ठाणे- ४१, पालघर- ५६, रायगड- २४२, रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग- ३२५, पुणे- २२१, सोलापूर- १९२, सातारा- ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६. एकूण- ३,६९२.

आपल्या गावची निवडणूक कधी आहे आम्हाला नक्की कळवा??

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.