लखिमपूर खारी (UP): शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास लखिमपूर शहरातील एका संघटनेच्या सदस्यांनी हाफीज सईद नजरकैदेतून सुटल्यामुळे आनंदोत्सव साजरा केला आहे. शिवपुरी परिसरात आपल्या घरांना हिरव्यागार ध्वजांची सजावट करून ‘हफीज सईद जिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’ यासारख्या घोषणा दिल्या. ही घटना समोर आल्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी आकाशदीप यांनी पोलिसांना त्या भागाचा ताब्यात घेण्यास सांगितले. घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी झेंडे काढून त्या भागात शांतता प्रस्थापित केली.
लाखीमपूर चे इमाम अशफाक कादरी म्हणाले, “जर कोणी राष्ट्रद्रोही घोषणाबाजी केली तर मला काहीच माहिती नाही.”हिरव्या झेंड्यांच्या संदर्भात बरेच लोक शुक्रवारी 2 जुलै रोजी जुलूस-ए-मोहम्मदी उत्सव आत्तापासून साजरा करू लागले. हाफिज सईद किंवा पाकिस्तानशी त्याचा काहीही संबंध नाही.”
हाफीज सईद सुटल्यामुळे उत्तरप्रदेशात आनंदोत्सव साजरा
