सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघातातील वाहनचालक आश्चर्यरित्या वाचला

0
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघातातील वाहनचालक आश्चर्यरित्या वाचला

सोशल मीडियावर नुकताच एक खतरनाक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक गाडी चक्क फ्लायओव्हरवरून हवेत उडून थेट खालील रस्त्यावर आदळली होती.

अनेकांनी हा व्हिडिओ नाशिक फाटा, मुंबई येथील असल्याचे म्हणले होते परंतु ही घटना हैदराबादच्या गचीबोली येथे घडली होती. हैदराबाद येथे नुकत्याच या बायोडायवर्सिटी फ्लायओव्हरचे उद्धाटन करण्यात आले होते. या फ्लायओव्हरवरून वेगाने येणारी ही गाडी ताबा मिळवू न शकल्याने हवेत उडत थेट जमीनीवर येऊन आदळली.

या अपघातात गाडी खाली पडून तब्बल सहा जण जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी एक वाजता घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

फॉक्सवॅगन जीटीआय ही कार चालवणारा मिलन या अपघातात वाचला आहे. गाडीतील एअरबॅग्स मुळे वाहनचालक वाचला असून गाडीखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.