#फाशीद्या हॅशटॅग वापरून नेटिझन्स ची कोपर्डी घटनेतील नराधमांना लवकर फाशी देण्याची मागणी

0
#फाशीद्या हॅशटॅग वापरून नेटिझन्स ची कोपर्डी घटनेतील नराधमांना लवकर फाशी देण्याची मागणी

कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी नेटिझन्स नी आवाज उठवला आहे. #फाशीद्या हा हॅशटॅग वापरून कोपर्डी मधील पीडित ताईला न्याय देण्याची मागणी अनेकांनी केली आहे.

३ वर्षांपूर्वी घडलेल्या कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणानंतर संपूर्ण देशभर मराठा समाजाकडून न्यायासाठी आंदोलने उभारण्यात आली. शांततामय आणि शिस्तबद्ध आंदोलनाचा पाया मराठा समाजाने रचत ताईला न्याय मिळावा यासाठी आंदोलने केली. २ वर्षांपूर्वी अहमदनगर न्यायालयाने तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. परंतु २ वर्ष उलटूनही अजूनही नराधमांना फाशी न झाल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

नेहमीप्रमाणे अजूनही खटला जिल्हा न्यायालयातून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. औरंगाबाद खंडपीठाने हा खटला मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केला आहे. यावर सुनावणी चालू आहे. नेहमीप्रमाणे तारीख पे तारीख पडत आहेत.

यामुळे #फाशीद्या या हॅशटॅग वर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

न्यायव्यवस्था गतिमान करून लवकरात लवकर याचा निकाल लावावा अशी मागणी अनेकांनी केली आहे.

अशाप्रकारे नेटकर्यांनी आपल्या भावना व्यक्त करत संथ गतीने चाललेल्या न्यायव्यवस्थेवर आसूड ओढले.
आपणसुद्धा या हॅशटॅग वर व्यक्त होऊ शकता.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.