दिल्लीत चार-पाच वर्षांपूर्वी थरकाप उडवून दिलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरण घडले होते. अशीच घटना शनिवारी हिस्सारच्या उकलाना गावात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेतील पीडिता ही ५ वर्षांची चिमुकली असून तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आलेली आहे.
Haryana: A 5-year-old girl was allegedly raped and brutally murdered by inserting a wooden stick into her private parts yesterday in Hisar’s Uklana village pic.twitter.com/tEaGwkUmZv
— ANI (@ANI) December 10, 2017
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तीच्या गुप्तांगामध्ये लाकडी काठी घुसवून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली आहे. स्वतः राहत असलेल्या घरापासून काही मीटर अंतरावरसाग तीचा मृतदेह आढळून आल्याने ही बाब उघड झाली. या घटनेची बातमी परिसरात वाऱ्यासाऱखी पसरली असता स्थानिकांनी आक्रोश करत बाजारपेठ बंद पाडली.
महत्वाच्या बातम्या:
कोपर्डीच्या ताईला शेवटी न्याय मिळाला…. घटनेतील आरोपींवरचे आरोप सिद्ध…. #Kopardi
पुणे सामुहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलं, 4 नराधमांना अटक
खेड तालुक्यातील धामणे येथील सतरा वर्षाच्या मुलीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून..
कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण- तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा
या पप्रकरणाची FIR दाखल केल्याची माहिती हिस्सारचे पोलीस उपअधीक्षक जितेंदरकुमार यांनी दिली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
अशा अमानुष बलात्कार करणाऱ्यांना उघड्यावर फाशी देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. अजून अशा किती निर्भया चिरडल्या जाणार काय माहित….?