काल भाऊबीज निमित्ताने आत्याच्या गावावरून बहिणीच्या गावाला म्हणजेच शिवरे गावावरून विंग ला चाललो होतो जाताना कापुरव्होळ जवळच्या भोर ला फाटा फुटतो त्या उड्डाण पुलावर पाठीमागून जोरदार वेगाने एक रुग्णवाहिका रूग्णाला सायरण देत घेवून येताना आरस्या मध्ये दिसली मी त्या रुग्णवाहिकेला साईट देवून रस्त्याच्या बाजूला झालो. ती रुग्णवाहिका जोरदार वेगाने पुढे गेली मी हळू हळू गाडी चालवत चाललो होतो पुढे धांगवडी फाट्यानजीक ती रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला उभी असलेली दिसली मी मनात विचार केला कि लघू शंकेला थांबले असतील मी साईटने पुढे गेलो आणि आरस्या मध्ये पाहिले तर त्या ठिकाणी रुग्णवाहिकेचा पुढचा टायर पंक्चर असलेला दिसला मी पुढे १०० फुटांच्या आसपास पोहचलो होतो. मागे बसलेल्या मिञाला काशिनाथ शिरवले या मिञाला विचारले की काय झालय त्या Ambulance ला तर त्याने सांगितले टायर पंक्चर झाला आहे मग पुढे जावून आम्ही वळून परत आलो आणि त्या चालकाला विचारले काही मदती हवी आहे का तर त्यांनी सांगितले हो म्हणून त्यांना विचारले दुसरी रुग्णवाहिका मागवू का? ते म्हटले की नको म्हणून नंतर आम्ही स्टेपनी काढून टायर बदलला.. त्या नंतर आम्हाला रहावले नाही म्हणून विचारले
रुग्णवाहिका कोठे चालली आहे?
–>कोल्हापूर
कोणत्या हाॅस्पिटलला?
->हाॅस्पिटलला नाही स्पेशंटला डिचार्ज दिला आहे घरी सोडायला चाललोय..
मग आॅक्सिजन लावून चाललाय? काय होतय स्पेशंटला?
-> दबक्या आवाजात उत्तर भेटले
कि कॅन्सर आहे..
हे उत्तर ऐकून सगळे शरीर सुन्न पडले…
ती रूग्ण एक तरूण मुलगी होती आणि त्या दिवशी भाऊबीज होती.. काही सुचलेच नाही २० मिनिटे.. काही न बोलता गप्प मदत करून शांत पणे उभा राहिलो गाडीतील सर्वांनी आभार मानले परंतू त्या रुग्णवाहिकेत कोण आहे कोठली आहे हा विचार न करता मदतीचा हात पुढे केला तुम्ही त्या बद्दल धन्यवाद बोलले ते…
रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ झाल्यावर आम्ही तेथून निघालो..
आम्हाला माहित नव्हते ते कोण आहेत ते पण एवढच माहित होत कोणाची तरी #आई_वडील_बहिण_भाऊ* आहेत म्हणून..
कधीही असे प्रसंग आले तर त्यांना मदत करा???
सत्कार्यासाठी काम करा
सत्कारासाठी नको….
जिजाऊंचे संस्कार आम्हावर नाही देणार दगा
जय जिजाऊ जय शिवराय
#टिप:- आम्ही बोलून दाखवण्यासाठी मदत केलेली नाही.. तर आम्ही केलेली मदत पाहून दुसरे पण करतील या विचाराने हि पोस्ट
टाकली आहे.
#क्षमस्व ???
Aniket Kondhalkar