मोघलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर हिंदू राजपूत छत्रसाल बुंदेला..

0
मोघलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर हिंदू राजपूत छत्रसाल बुंदेला..

छत्रसाल बुंदेला हा चंपतराय बुंदेल्याचा चौथा मुलगा चंपत राय यांनी मोघलांच्या विरुद्ध बुंदेल खंडात बंड सुरु केले होते मोघलांच्या हिरव्या अत्याचारांखाली सारा बुंदेलखंड भाजून निघत असताना, तो एकटाच मर्द असा होता
जो क्रूरकर्मा शाहजहाँनपुढे पाय रोवून उभा राहीला होता….

असेलही शाहजहाँन येळया गबाळ्यांसाठी मोठा प्रेमवीर पण आम्ही त्याच्या मनांत प्रेमभावना होती हे कसं मान्य करावं?

अहो इथल्या भूमीच्या कणाकणाला विचारा, ते सांगतील तुम्हाला शाहजहाँनच्या अत्याचारांच्या कहाण्या! आमची भूमी हिरावण्यात, आमची रयत बाटवण्यात आणि आमच्या मायबहिणी नासवण्यात शाहजहाँन हा खरोखर औरंगज़ेबचा बाप होता…

त्याच्याविरुद्ध चंपतराय उभा ठाकलेला. अखेरीस १६६१ साली चंपतराय हिंदुस्थानसाठी हुतात्मा झाला धनी गेल्याची खबर पोहचताच वीरपत्नी राणी कालीकुमारीनेही तलवारीने आपले शिर छाटून प्राणत्याग केला…

मोघलांना कळलंही नसेल की त्यांनी आणखी एक संसार उधळला! याच चंपतरायाचा पराक्रमी मुलगा म्हणजे हे छत्रसाल छत्रसाल तेव्हा अवघ्या ११ वर्षांचा होते नशीब काढण्यासाठी मिर्झाराजा जयसिंहाची चाकरी करायला लागले….

देव, देश आणि धर्म समजण्याचे त्यांचे ते वय नव्हते १५व्या वर्षीच ही अक्कल असायला माणूस “शिवाजीराजे” म्हणून जन्माला यावा लागतो….

मिर्झाराजांनी छत्रसालला दिलेरखानकडे सोपवले होते देवगडच्या गोंड राजांशी लढताना त्याने न भूतो न भविष्यति पराक्रम गाजवला एवढा, की छत्रसाल नसते तर देवगड मोघलांना कदाचित कधीच जिंकून घेता आले नसते….

पण बादशाहकडून मानमरातब आला तो कुणासाठी? एकट्या दिलेरखानासाठी! कारण तो सेनानी तो मोघल तो गाज़ी! हिंदूंनी काम करावे, पराक्रम करावा तो त्यांच्याच हाताखाली राहून! १७ वर्षांच्या त्या समशेरबहादूरास ही गोष्ट फार लागली…

“आम्ही पराक्रमाची शर्थ करायची, ती काय मोघलांचा गौरव व्हावा म्हणून? मग आम्ही कोण? आमचे अस्तित्व काय? किड्यामुंग्यागत मरण्यासाठीच का पैदास आमची? विसरलात का मोघलांनो, माझ्या वडिलांनी कसे तलवारीचे पाणी पाजले होते तुम्हाला? विसरलात”?

आणि अंतर्मनातून आवाज आला, “ते नाही विसरले, तू विसरलास! तू!”
छत्रसाल खडबडून जागा झाला “हे मी काय करतोय? ज्यांच्याविरुद्ध माझे वडील लढले, त्यांच्याच भरभराटीसाठी मी जीवाची जोखीम घेतोय”?

पुरंदर वेढ्याचे वेळी छत्रसालाची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होऊन तिचा त्याच्यावर खूपच प्रभाव पडला त्याने समशेर हिंदुराष्ट्रवैभव प्रभो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी ठेवली आणि म्हणाला,”मला पदरांत घ्या तुम्ही द्याल ती चाकरी करेन पण पुन्हा त्या देशशत्रूंच्या नोकरीत जायला सांगू नका मला…

महाराजांनी त्याला सांगितले,”छत्रसाल, मी जर तुम्हाला नोकरीत ठेवून घेतले तर तुमच्या यशाचे सर्व श्रेय मला मिळेल तुम्ही स्वयंप्रकाशी आहात हे तुर्क आपल्या देशावर आले मी त्यांना हुसकावून लावण्यासाठी माझी तलवार उगारली आहे….

मला आईभवानीचे आशीर्वाद आहेत मी जे इथे करतोय, तेच तुम्ही तिकडे जाऊन करा बुंदेलखंडांत जा मायभूमी पुन्हां एकवार जिंकून घ्या राज्य नव्हे, स्वराज्य करा आणि स्वराज्यावर राज्य करा कीचकाप्रमाणे मोघलांचा संहार करा अंत:करणात श्रीकृष्ण धरा…

तुम्हीं क्षत्रियांचे मुकुटमणी क्षत्रियांनी सदैव तलवारीने कमावून खावें दुष्मन हताहत करावे याकामी मारले गेलो तर मोक्ष मिळतो, पण जिंकलो तर माणूस पृथ्वीराज म्हणविला जातो…

तुम्हीं जिंकालच ही माझी खात्री आहे जा, मोघलांवर तुटून पडा आणि तुमची विजयदुंदुभी माझ्या कानीं निनादूं द्या! गरज पडली तर मी आहेच.”

केवढी विलक्षण ओजस्वी वाणी! अनाथ छत्रसाल पुन्हा एकवार सनाथ झाला ते साल १६७० होते छत्रसालकडे त्यावेळी केवळ ५ घोडेस्वार आणि २५ पदाती होते तो स्वतः केवळ २१ वर्षांचा होता….

पण रामनामाच्या ताकदीने जसे पत्थरांचेही जलतरण होते, तद्वतच शिवनामाच्या स्फूर्तीने राष्ट्रभक्तीचे वर्धन होते गवतासही भाले फुटतात, पर्जन्यबिंदूंचेही निखारे होतात आणि तान्हूलं बाळही गर्जना करतं “हर हर महादेव”!

प्रथम त्याने धामोणीवर हल्ले केले, तेव्हा तेथील छोटेमोठे सरदार आपल्या लोकांसह त्यास येऊन मिळाले त्यानंतर त्याने माळवा आणि कालिंजर हेही जिंकून आपल्या ताब्यात घेतले
मोघल सैन्याने त्यास विरोध केला…

औरंगजेबाने तहव्वुर खान यांस त्याच्यावर पाठविले परंतु त्याने त्यांचा व १६९९ मध्ये शेख तहव्वूरखानाचाही पराभव केला छत्रसालने असा भरगच्च पराक्रम केला की, मोघलांना पळता भुई थोडी झाली छत्रसालने बुंदेलखंडात स्वतंत्र स्वराज्य स्थापले….

मोघलांच्या एकूण एक फौजेचा पराभव केला औरंगजेबाने हिंदूंची देवळे पाडण्याचा १६६९ मध्ये उपक्रम चालू केल्यामुळे छत्रसालाने स्वजनांना एकत्र करून त्यास कसून विरोध केला….

औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला मोघल सत्तेने छत्रसालाची इतकी दहशत खाली की खुद्द औरंगजेबाने आणि औरंगजेबानंतर बहादुरशाहनेसुद्धा त्याचे स्वातंत्र्य मान्य केले…

उत्तरेत त्याने मराठ्यांना साहय्य केले, हे बादशाहास आवडले नाही तेव्हा डिसेंबर १७२८ मध्ये मुहम्मदखान बंगश या अलाहाबादच्या सुभेदारास त्याजवर पाठविले तोपर्यंत छत्रसाल वयोवृद्ध झाले होते…

बंगशने जैतपूर येथे छत्रसालाचा पराभव केला छत्रसाल लढता लढता गंभीर जखमी झाला त्याला बंगशने पकडले तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली..

बंगश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले…

त्याच्या कानांत त्यांचे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ६० वर्षांपूर्वी उच्चारलेले शब्द फिरत होते त्याचे ध्यान वारंवार एकाच वाक्याभोवती घुटमळत होते, “गरज पडली तर मी आहेच”!

यावेळी महाराज जरी या जगात नसले तरीही त्यांनी पेटवलेल्या स्फुल्लिंगाचा एक अंश अजूनही जिवंत होता, नव्हे तर वणवा बनून म्लेंच्छांना जाळून काढत होता…

महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्य करणारा रणपंडित होता तो! होय, तोच तो हिंदवी स्वराज्याचा पंतप्रधान, बाजीराव पेशवा !!

वयोवृद्ध झाला होता तरी छत्रसाल बुंदेला बंगशचे बारसे जेवला होता आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता…

याच पत्रात त्याने “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥” असा “गजांतमोक्षाचा” हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली..

पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगशवर चालून गेला ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगशला काहीच समजले नाही….

बाजीरावांनी पहिल्याच फटक्यात त्याला असे काही हाकलले की तो सैरावैरा पळत जैतपूरच्या किल्ल्यात जाऊन लपला मोघलांची सारी रसद तोडली अवघ्या काही दिवसांपूर्वीच विजयी मेजवान्या झोडणाऱ्या मोघलांचे दोन वेळच्या जेवणाचेही वांधे होऊ लागले…

छत्रसालने बंगशला मोठ्या अटी घालून मगच सोडले ६० वर्षांपूर्वी शिवरायांनी त्याला स्वराज्याची प्रेरणा दिली होती, ६० वर्षांनंतर शिवरायांच्याच रणशिष्य बाजीरावांनी छत्रसालची राज्यावर पुनर्स्थापना केली….

याच्या मोबदल्यात छत्रसालने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बाजीरावास देण्याचे मान्य केले पण नंतर थोड्याच दिवसांत छत्रसाल बुंदेला मरण पावला.

– महेंद्र सोनार

बाजीराव पेशवे यांच्या रणकारणात अग्रेसर असणाऱ्या चिमाजी अप्पा यांच्याविषयी काही…

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.