होळी का साजरी केली जाते? होळीची माहिती

0
होळी का साजरी केली जाते? होळीची माहिती
Share

होळी का साजरी केली जाते असा प्रश्न आपणांस पडलाच असेल, होळी का साजरी करतात याचे उत्तर पौराणिक तथा वैज्ञानिक सुद्धा आहे. महाराष्ट्रात होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा होळी हा दिवस

होळी का साजरी केली जाते? पौराणिक कारण

पौराणिक काळात राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसराजा होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे.

नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्याने प्रल्हादाला विष्णू भक्तीपासून परावृत्त करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरत होता. राक्षस राजाच्या घरातच विष्णू भक्तीला कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

हिरण्यकश्यपूला होलिका नावाची क्रूर अशी बहीण होती. तिला अग्नीचे अभय होते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले.

परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे घडले उलटेच. होलिका जळून खाक झाली. विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. नंतर हिरण्यकश्यपू चा वध विष्णूने नृसिंह रूपात केल्याचे सर्वांना माहीतच आहे.

होळीची आख्यायिका अशी की होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देत आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हा होळी साजरे करण्याचा उद्देश आहे.

आता पाहुयात वैज्ञानिक कारण

होळी सणाबरोबर वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. होळी सणाबरोबर हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. हा काळ म्हणजे निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. हिवाळ्यात थंडीमुळे आपले शरीर हे सूस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत करून मानवाच्या सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

तर ही आहे होळी साजरी करण्यामागची पौराणिक आणि वैज्ञानिक कारणे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.