तुम्ही अक्षय कुमारचा चित्रपट ‘गब्बर’ पाहिलाच असेल ज्यात हॉस्पिटल वाले मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी सुद्धा खाऊन टाकतात.
असाच एक प्रसंग घडलाय राजेंद्र गावडे यांच्या वडीलांबाबत…. त्यांनी अनुभवलेला एक नामांकित हॉस्पिटल मधील प्रसंग त्यांनी फेसबुक वर शेअर केलाय..
त्यांच्या शब्दात,
4 तारखेला माझ्या वडिलांचे निधन झाले,आम्ही त्यांना दादा म्हनायचो ,ते बुलेटवरून घसरून पडल्याचे निमित्त झाले,त्यांचा 18 sept ला अपघात झाला त्यांना वाघोली येथे तत्पर ऍडमिट केले ,हळूहळू तब्येत सुधारू लागली पण 25 तारखेला डॉक्टरांना हार्ट मध्ये म्हणजे हार्टजवळ काही नको असल्याची हालचाल दिसली आणि मग रुबी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले, तिथे dr. जगदीश हिरेमठ यांच्या अंतर्गत ऍडमिट केले ,तोपर्यंत वडील छान खात पीत होते ,पण ववेवसायची किंवा पैशाची हाव म्हटलं तरी चालेल ,मग खेळ सुरू झाला की फुफुसाजवळ रक्ताचा क्लाट (रक्ताच्या घुटळ्या)झाल्या आहेत ,त्यामुळे आपणाला त्वरीत 1 लाख रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागेल,त्यामुळे रक्त पातळ होईल आणि धोका टळेल असे सांगितले गेले,पाहिजे त्या सह्या घेतल्या कागदावर ,रुबीची asitance ड्रॉक्टर एवढी गोडगोड बोलली की आता बाबा बरे होतील ,नंतर त्यांना रोज एक साधी गोळी घेऊन उरलेलं आयुष्य आरामात काढतील वगेरे ,माझ्याकडे सारे रिपोर्ट होतेच ,म्हणजे मेंदूचा स्कॅन सुद्धा ,तेंव्हा आम्ही सांगितलं की त्यांच्या डोक्याला मार लागून 10 ते 12 टाके पडले आहेत ,ते वरूनही सहज दिसत होते ,तरीही अशा या परिस्तिथीत डॉ. हिरेमठाणी असे इंजेक्शन द्यायला होकार दिला ,अमेरिकन gaudelines आहेत की डोक्याला साधा मार असेल तरी असे रक्त पातळ व्हायचे इंजेक्शन देऊ नये,
आणि दादांना तर टाके होते ,मग मी डॉक्टरांना ही शंका बोलून दाखवली पण प्रॉफिट(पैशाच्या) च्या नादात त्यांनी सांगितले की काय प्रॉब्लेम नाही म्हणून ,
आणि …..
20 मिनिटानी दादा मला म्हणाले अरे माझ्या डोक्यात असह्य वेदना होतायत ,त्यांना सांग इंजेक्शन अर्ध्यावर थांबवायला (सदर इंजेक्शन हळूहळू, एक मशीन द्वारे दिले जाते) मला तेव्हाच कळाले की मेंदुत रक्त उतरले,
पण आणि खरच नंतर स्कॅन केले तर दादांच्या साऱ्या मेंदूत रक्ताचा पाझर झाला होता,शुध्दीवर असलेले दादा आता कोमात गेले ……..
इतकावेळ सायन्स वर बोलणारे रुबी हॉस्पिटल आणि ड्रॉक्टर लगेच देवावर ,नशिबावर आले
आणि माझे 10 वेळा सांत्वन करू लागले,आपल्या हातात काय आहे ,सारे परमेश्वराच्या हातात आहे असे बोलू लागले,
इंजेक्शन द्यायच्या अगोदर चा त्यांचा आपोरच मला आता जाणवला ,आधी एकदम गोडगोड आणि एक लाख पदरात पडले की टाळाटाळ ..
साऱ्यांच्या चेहऱ्यावर चोरीचा भाव स्पस्ट दिसत होता…
मी पुढे मेंदूतज्ञा ला बोलवा असे सांगितले लेखी मागणी नोंदवली तरीही त्यांनी ड्रॉक्टर ला बोलविले नाही
उलट मलाच सांगितले की आता काय फायदा नाय ,उगाचच एवढा खर्च या वयाच्या माणसावर करायचा का ?? कारण त्यांना भीती होती की आपले पितळ उघडे पडेल ,
त्यामुळे मी नाईलाजाने डिस्चार्जे घेतला आणि गावी घेऊन वाघोली ला परत पुढचा इलाज चालू केला ,
वडील शुद्धीवर आले …………….आणि परत तब्बेत ढासळली आणि
दादा गेले …..
माझा बाप गेला …………वडील म्हणजे एक सुरक्षा कवच असते आपल्याला व कुटुंबातील सर्वांना नकळत एक आधार असतो ,………दादा आमच्या शाळेची बस विरंगुळा म्हणून चालवायचे त्यामुळे बस मधील लहान मुलांची त्यांची दोस्ती झाली होती ,मग रोज आळीपाळीने एक दोगांस पुढच्या सीटवर बसवायचे आणि 5 सहा वर्ष्याच्या मुलांना …न नाराज करता दादा सारे मॅनेज करून सार्यांना खुश ठेवित होते …
आता वडील कवच गेले,मी पोरका झाल्याचा फील आलाय,
खरच पोरका झालोय ….
बाप अखिर बाप होता हैं….???????
या इलाजादरम्यान एक भयाण सत्य,डॉक्टरांचे रॅकेट अनुभवले
सारे केवळ पैशासाठी चाललंय हे लक्षात आले
दादान बरोबर अनेक पेशंट ऍडमिट होते
त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा व्हायची तर
एक एक पेशंट 40 ,50 दिवस आहेत अन
बिल 45 ते 50 लाख आता पर्यंत भरले आहेत आणि पेशंट कोमामध्ये च अजून ,
म्हणजे सारासार ठगी….
मानवतेला काळीमा फासायेचे काम आजकालचे ड्रॉक्टर आणि हॉस्पिटल करीत आहे
त्यात रुबी चा नंबर एक आहे
माझा सर्वाना एक कळकलीचा सल्ला आहे
की हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आल्यास शांतपणे इलाज स्वीकारा …(तुम्ही ठरवा काय इलाज करायचा तो)
आणि नेहमी सेकंड ओपिनियन ग्या.
….
मी रीतसर गुन्हा नोंदीणीसाठी प्रोसेस करणार आहे .
म्हणजे इतरांची गत माझ्यासारखी होयु नये
एवढाच उद्देश …
दादांचा 10 वा 13 तारखेला आहे
जमल्यास या आपण
शोकाकुल ….
राजेंद्र गावडे
तानाजी गावडे
शाम गावडे
आई आणि माझे सारे नातेवाईक..