८ ते १० पाकिस्तानी सैनिकांना घातले कंठस्नान ; सीमा सुरक्षा दला (BSF) चे पाकिस्तानच्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर

0
८ ते १० पाकिस्तानी सैनिकांना घातले कंठस्नान ; सीमा सुरक्षा दला (BSF) चे पाकिस्तानच्या हल्ल्याला  सडेतोड प्रत्युत्तर

सांबा (जम्मू-काश्मीरच्या) सेक्टरमध्ये बुधवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

त्यांच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत ८ ते १० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या तुफान गोळीबारात पाकिस्तानचे नुकसान झाले आहे.

जम्मू बीएसएफचे महासंचालक रामावतार यांनी गोळीबारात पाकिस्तानी बंकर्सच्या जवळ असणारी सोलार पॅनल्स तसेच अन्य असणारी शस्त्रे उद्ध्वस्त झाली. पाकिस्तानच्या बंकर्सचेही मोठे नुकसान झाले, अशी माहिती  दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात आठ ते दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. राजबाग(जम्मू-काश्मीर) परिसरामध्ये कालच्या रात्री पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात BSF चे हेड कॉन्स्टेबल RP HAJARA शहीद झाले. त्यांचा काल वाढदिवस होता.

Top 10 Most Powerful Militaries in the World

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.