तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे? कसे ओळखाल

0
तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे? कसे ओळखाल
Share

जगभरात कोरोना प्रसार वाढत असताना अनेकांना कोरोना होऊन गेल्यासारखे वाटत आहे. आपल्याला सुद्धा कोरोना होऊन गेला आहे असे वाटतं आहे का?

अनेकांना कोरोना होऊन गेला असून त्यांना सौम्य चिन्ह असल्याने समजलेच नाही असे WHO च्या अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे. भारतात सुद्धा अनेक सर्वेक्षण झाली असून यात काही भागातील लोकांच्यात कोविड अँटीबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना हे संक्रमण इतके सौम्य किंवा निम्न-श्रेणीचे असू शकते यामुळे कोरोना आणि फ्लू सारख्या संसर्गाच्या लक्षणांमधे फरक करणे खूपच अवघड आहे. यामुळेच बरेच लोक असे असू शकतात ज्यांना यापूर्वीच कोरोना झाला होता आणि त्यांनी व्हायरसशी यशस्वी लढा देत त्याला पराभूत केले आहे.

आपल्याला कोरोना होऊन गेला आहे हे कसे ओळखाल?

1. 3 दिवसांपेक्षा जास्त काळ आलेला ताप

कोरोना ताप

तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिलेला किरकोळ ताप (जवळपास 99-100 ℃) हे कोविड संसर्गाचे लक्षण असू शकते, विशेषत: जर तापाबरोबर डोकेदुखी, सर्दी किंवा नाक खाजवत असेल तर हे कोरोनाचे लक्षण असू शकते. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, जवळपास 87% कोरोना झालेल्या रुग्णांचे पहिले लक्षण हे अचानक ताप येणे हे आहे.

2. कमी वास/चव किंवा वास/चव न येणे

कोरोना लक्षण वास चव न येणे

आपल्या ज्ञानेंद्रियांचा गंध/वास कमी किंवा येणे बंद झाले असेल तर हे एक कोविड संसर्गाचे लक्षण असू शकते. वास किंवा चव कमी होणे, हे कोरोना संसर्गात दिसून येते. बहुतेक वेळा जेव्हा विषाणूचे अवशेष नाकातील त्वचेवर हल्ले करतात तेव्हा वास ओळखण्याची आपली क्षमता खराब करते. एका नवीन अभ्यासानुसार असे आढळले आहे की कोविड रूग्ण विशेषतः नारळ आणि पेपरमिंट तेलाचा वास ओळखू शकत नाही. कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा काही महिने वास कमी येऊ शकतो. जुलाब किंवा पोट खराब होणे यासारखे विकार झाले असल्यास सुद्धा कोरोना संसर्ग असू शकतो.

3. कोरडा खोकला

कोरोना लक्षण कोरडा खोकला

कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तीला एका विशिष्ट प्रकारचा खोकला येतो तो म्हणजे कोरडा खोकला. काहीजणांना कोरडा खोकल्याबरोबर, घसा खवखवणे हे कोविड -१९ असण्याचे सक्रिय लक्षण असू शकते. कोरडा खोकला शक्यतो Allergy आणि बाह्य वातावरणातील प्रदूषणामुळे होऊ शकतो. जर ऋतू बदल यांसारख्या निश्चित हंगाम नसेल आणि तुम्हाला सतत कोरडे खोकला येत असेल तर हे कोविड चे लक्षण असू शकतो.

4. गुलाबी डोळे

कोरोना लक्षण गुलाबी डोळे

डोळे चावल्यासारखे होणे, सारखे पाणी वाहने किंवा गुलाबी होणे हे देखील कोरोना विषाणू चे लक्षण असू शकते. जेव्हा आपण सतत डोळे आणि त्वचेला गलिच्छ हातांनी डोळे स्पर्श करतो तेव्हा व्हायरस संक्रमण होण्याचा संभाव्य धोका असतो.

5. त्वचेवर पुरळ किंवा पायांची बोटे लाल होणे

कोरोना लक्षण लाल अंगठे

विशेषत: लहान मुलांमध्ये त्वचेवर पुरळ आणि पायांची बोटे लालसर होणे हे नवीन लक्षण सापडत आहेत. जेव्हा व्हायरस शरीरात सक्रिय असतो तेव्हा आपल्या हात, पोट, पाय किंवा पायाच्या बोटांभोवतालचा त्वचेचा रंग लाल होतो. विशेषतः लहान मुलांच्यात सुज येणे, खाज येणे यांसारखी लक्षणे सुद्धा दिसून आले आहेत.

6. छातीत दुखणे आणि दम लागणे

कोरोना छातीदुखी

धाप लागणे हे रक्तामध्ये ऑक्सिजन कमी असण्याचे चिन्ह असू शकते. धाप लागण्याबरोबर खोकला किंवा सर्दी झाली असल्यास ही सौम्य कोविड संसर्गाची लक्षणे असू शकतात.

7. आपण कोरोना होऊन गेल्याची पुष्टी कशी कराल?

कोविडपासून आपले संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अँटीबॉडीज तयार करणे. जेव्हा आपले शरीर एखाद्या विषाणूशी लढा देते तेव्हा अँटीबॉडीज विकसित होतात. आपल्याला कोरोना होऊन गेला आहे का याची पुष्टी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अँटीबॉडीज चाचणी करणे, या चाचणीमुळे आपल्या शरीरातील कोविड विषाणूशी लढणारे अँटीबॉडीज चा स्तर आपल्याला समजू शकतो.

तथापि, अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की आजारपणाच्या 2-3 महिन्यांनंतर रुग्णांमधील अँटीबॉडीज कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही चाचणी सुद्धा कदाचित निष्प्रभ ठरू शकते.

तथापि, अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की आजारपणाच्या 2-3 महिन्यांनंतर रुग्णांमधील अँटीबॉडीज कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही चाचणी सुद्धा कदाचित निष्प्रभ ठरू शकते.

या लेखात व्यक्त केलेली मते अभ्यासपूर्वक असूनसुद्धा अधिक माहितीसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या.

साभार:

  1. Subtle Signs That Can Tell You Have Already Had COVID-19
  2. WHO

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.