युक्रेन सारख्या कमी ताकदीच्या देशाने संख्यात्मकदृष्ट्या खूप वरचढ असणाऱ्या रशियन सैन्याला आत्तापर्यंत रोखून ठेवले आहे. याचे कारण काय आहे यावर आपण आज विश्लेषण करुयात.

तज्ज्ञांच्या मते युक्रेन ची युद्धाची तयारी, राष्ट्रीय एकता आणि रशियन सैन्याच्या चुकांमुळे रशियन सैन्याला अनेक दिवसांच्या युद्धानंतर देखील युक्रेन वर कब्जा मिळवता आला नाही. तथापि, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन वारंवार घोषित करत आहेत की त्यांच्या आणि त्यांच्या उद्दिष्टांमध्ये कोणीही उभे राहू शकत नाही आणि ते त्यांचे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय मागे हटणार नाहीत.
तर युक्रेन सारखा छोटा देश रशियन सैन्याला कसे रोखू शकला? काही प्रमुख कारणे
1. युद्धाची तयारी
युक्रेनने, पाश्चात्य देशांच्या मदतीने, २०१४ नंतर आपले सशस्त्र दल मोठ्या प्रमाणात बळकट केले आहे. रशियाने क्रिमियाच्या युक्रेनियन द्वीपकल्पाला आपल्यात सामावून घेतले होते. यामुळे युक्रेन ला रशियन कारवाईची भीती सतावत होती. यामुळे त्यांनी तयारी वाढवत आपले सैन्य मजबूत केले.
जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक डग्लस लंडन म्हणाले, “युक्रेनियन लोकांनी रशियाला प्रतिकार करण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून नियोजन, प्रशिक्षण आणि स्वत: ला सुसज्ज करण्यात घालवली आहेत.”
2. स्थानिक क्षेत्राचे ज्ञान
रशिया USSR अंतर्गत नियंत्रित केलेल्या क्षेत्राच्या सोव्हिएत काळाच्या अभ्यासावर अवलंबून राहिले. तसेच युक्रेनियन सैन्याला स्थानिक क्षेत्राचा होणारा फायदा लेखण्यात देखील कमी पडले आहे. युक्रेन मधील अनेक स्थानिक भूप्रदेशाचे हे बर्फाळ असून अनेक रस्ते चिखलात बदलू शकतात.

स्थानिक लोकांनी सुद्धा रशियन सैन्याविरुद्ध स्वत:हून शस्त्रे उचलल्याने स्थानिक क्षमता ओळखण्यात रशियन गुप्तहेर खाते कमी पडले आहे. अजूनही रशियाला मुख्य शहरांवर कब्जा मिळवत आला नाही. परंतु जेव्हा रशिया कीव सारख्या शहरांमध्ये घुसेल तेव्हा त्यांना होणारा स्थानिक लोकांचा विरोध प्रामुख्याने महत्त्वाचे आव्हाने त्यांच्यापुढे असणार आहे.
3. युक्रेन लोकांची एकता

रशियाने राजधानीच्या काही प्रदेशात प्रवेश केल्यानंतर देखील आपल्या जीवाला धोका असूनही कीव मध्ये राहिलेले अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यामुळे युक्रेनियन लोकांना लढण्याचे बळ मिळाले. युक्रेनियन लोकांनी प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता दर्शवत आपल्या कुटुंबियांना देशाच्या पश्चिमेला किंवा त्याच्या सीमेबाहेर सुरक्षितपणे हलवले आहे. अनेकांनी आपल्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवत देशसेवा करण्याचे मनावर घेतले आहे. एकित ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
4. रशियाच्या धोरणात्मक चुका

२४ फेब्रुवारी रोजी युद्ध घोषणा केल्यानंतर रशियाने युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत अनेक धोरणात्मक चुका केल्या. जसेकी सुरुवातीच्या टप्प्यात खूप कमी सैन्य पाठवले यामुळे पायदळ आणि हवाई दलांना एकत्रितपणे काम करण्यात अपयश आले. रशियाला काही दिवसांत लष्करी यश मिळण्याची अपेक्षा होती परंतु युक्रेन ने केलेला तीव्र विरोध यामुळे रशियाचे मनोधैर्य खचले आहे. “सुरुवातीला त्यांना वाटले की ते राजधानी कीव वर खूप लवकर कब्जा करतील परंतु यात त्यांना अजूनही यश आलेले नाही.
5. रशियन सैनिकांना मानसिक भीती
युक्रेनच्या सीमेजवळ हजारो सैन्य तैनात करून रशियाने जगभरात धोक्याची घंटा वाजवली. परंतु त्यांच्या सैन्याला शेजारच्या देशात युद्धासाठी पाठवले जाणार आहे याची शक्यता कमी वाटली होती. अनेक रशियन लोकांचे नातेवाईक युक्रेन मध्ये आहेत तसेच बरेच युक्रेनधील लोक त्यांची मातृभाषा म्हणून रशियन बोलतात. यामुळे रशियन सैन्याचे मनोबल खचलेले दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक रशियन सैन्य युद्धासाठी तयार नव्हते अशा बातम्या येत होत्या.
तर अशी काही प्राथमिक कारणे आहेत ज्यामुळे रशियाला युक्रेन वर ताबा मिळवले शक्य होत नाहीये.
© PuneriSpeaks