भारतातील एक नावाजलेले कॉफी शॉप म्हणून प्रसिद्ध असलेले CCD चे मालक सिद्धार्थ यांची ६५० करोड रुपयांची अघोषित संपत्ती आयकर खात्याने जप्त केली आहे.
सिद्धार्थ हा माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जावई असून काही महिन्यांपूर्वी एस एम कृष्णा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.
प्राप्तिकर विभागाने त्यांच्याकडून पैशासह, कागदपत्रे सुद्धा जप्त केली आहेत. त्यांच्याकडे अजून बेकायदेशीर संपत्ती असल्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली.