श्रीलंका फलंदाजीला लागली गळती..
श्रीलंके विरुद्ध कटक मध्ये काल झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी फक्त फलंदाजीनेच नाही तर यष्टीच्या मागून सुद्धा खेळ बदलू शकतो.
MS Dhoni चे ‘मास्टर माइंड’ आणि चहल ची कमाल..
फिरकी गोलंदाजांना विकेट मिळवून देण्यात विकेट कीपरचे योगदान खूप महत्त्वपूर्ण असते. याबाबत धोनी बाकी विकेट कीपरच्या पुढे आहे. धोनीचा अनुभव जेव्हा त्याच्या मनासोबत मिळून जेव्हा खेळत असतो तेव्हा काहीतरी अप्रतिमच पाहायला मिळत असतं, हे नवीन नाही. हे आपल्याला कालच्या सामन्यात पाहायला मिळाले. त्याच्या या योजनेत कप्तान रोहित शर्मा आणि यजुवेंद्र चहल.
या योजनेत फसले लंकेचे फलंदाज !
श्रीलंकेचे खेळाडू मोठी फटकेबाजी करण्यास उतावळे झाले आहेत, हे धोनीने ओळखलं होते. त्यामुळेच धोनीने चहल ला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यास सांगितले. माजी कर्णधाराने निर्देशावर चहल ने अंमलबजावणी केली. गुणारत्ने मोठा शॉट खेळण्याची घाई करत पुढे गेला आणि चहलच्या बाद असणाऱ्या चेंडूवर धोनीने चपळाईने यष्टीचीत केले.
MS Dhoni चे ‘मास्टर माइंड’ : यामुळे लंकेचे फलंदाज एका पाठोपाठ तंबूत परतत होते. माहीची ही योजना चांगलीच फळाला आली यातूनच त्याची गुणवत्ता दिसली.