टिकटॉक ला टक्कर द्यायला भारतीय चिंगारी अ‍ॅप मैदानात

0
टिकटॉक ला टक्कर द्यायला भारतीय चिंगारी अ‍ॅप मैदानात
Share

चीनच्या टिकटॉक ला टक्कर देण्यासाठी चिंगारी हे भारतीय अ‍ॅप प्लेय स्टोअर वर आल्यानंतर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या अ‍ॅपला अवघ्या 72 तासांत 5 लाखाहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे.

चिंगारी अ‍ॅप सुद्धा टिकटॉक सारखे छोटे विडिओ दाखवणारे प्लॅटफॉर्म आहे. या अ‍ॅपच्या विकसकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मेड इन इंडिया” असलेल्या या अ‍ॅपची लोकप्रियता वाढत आहे कारण वापरकर्ते चिनी सोशल अ‍ॅप्सवर बहिष्कार टाकत आहेत. गलवान व्हॅलीमध्ये चीन आणि भारतीय सैनिक यांच्यातील संघर्षानंतर भारतात चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम हळूहळू वाढत आहे.

त्यांनी दावा केला आहे की चिंगारी अ‍ॅप ची मागणी ही गुगल प्ले स्टोअरमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याची लोकप्रियता मित्रो अ‍ॅप पेक्षा जास्त झालेली आहे. व्हिडिओ कसा व्हायरल होतो यावर आधारित चिंगारी आपल्या वापरकर्त्यांना पैसे देते. वापरकर्त्याने अ‍ॅपवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओसाठी प्रति दृश्य गुण मिळतात आणि हे गुण पैशामध्ये रूपांतर करून थेट मिळवू शकता.

ऑडिओ आणि व्हिडिओ-आधारित चिंगारी अ‍ॅप 2019 मध्ये बंगळुरू-आधारित दोन प्रोग्रामर बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी त्यांच्या अर्धवेळेत विकसित केले होते. त्यांनी अल्पावधीत लाखो डाउनलोड्सचे टप्पे साध्य केले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजटि्वटर आणि इंस्टाग्रामटेलिग्राम वर भेट द्या.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.