भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षातून 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले असून 43 चीनी सैनिक मृत्युमुखी किंवा जखमी झाले आहेत. सीमेवरील स्थितीत बदल करण्याचा चीनकडून केलेल्या प्रयत्नातून हा संघर्ष झाल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
सोमवारी रात्री लडाख मधील गल्वान व्हॅली येथे चिनी सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत एका कर्नल सह २० भारतीय सैनिक मारले गेले आहेत. गेल्या पाच दशकांतील सीमेवर झालेला हा अत्यंत भयंकर हल्ला होता, यात चीनचे 43 हून अधिक चिनी सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत.
सैनिकांच्यात सशस्त्र झडप झाली नसून दगड आणि दांडके यांचा वापर होऊन सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. भारतीय प्रदेशात झालेल्या शारीरिक चकमकीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले आहेत.
भारत-चीन सीमेवर नक्की काय घडले?
6 जून रोजी झालेल्या चर्चेदरम्यान भारत-चीन सैन्यात काही तोंडी सामंजस्य करार झाले होते त्याची आठवण करून देण्यासाठी भारताचे बिहारचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष आणि भारतीय सैनिक यांची चिनी सैनिकांबरोबर बैठक सुरू होती आणि त्यादरम्यान त्यांनी चिनी सैनिकांना पुन्हा त्यांच्या हद्दीत परत जाण्यास सांगितले .
या चर्चेदरम्यान, चिनी सैनिकांनी जोरदार वादविवाद सुरू केले आणि दगड, काठी व इतर धारदार साधनांनी भारतीय सैनिकांवर प्राणघातक हल्ला सुरू केला..
भारतीय सैन्याच्या तुलनेत चीनचे सैनिक जास्त होते आणि यात भारताच्या 16 कमांडिंग ऑफिसर आणि जवानांना लक्ष्य केले गेले. हा संघर्ष जवळपास तीन तास सुरू होता.
भारत-चीन सैन्यामध्ये शस्त्रास्त्रे का वापरली गेली नाहीत?
1996 मध्ये भारत आणि चीनने एलएसी शांतता करारावर (LAC PEACE TREATY) स्वाक्षऱ्या केल्या आहेत ज्यानुसार दोन्ही देशांपैकी कोणीही आपापल्या विवादित सीमेवर आपली लष्करी क्षमता एकमेकाविरूद्ध वापरू शकत नाही.
करार अनुच्छेद १ : “दोन्हीही देश सीमेवर आपल्या सैन्याच्या क्षमतेचा उपयोग दुसऱ्या बाजूला करू शकत नाहीत. शस्त्रास्त्र दलाचा वापर सीमा नियंत्रित भागात कोणत्याही बाजूने केला जाऊ शकत नाही. अशी कोणत्याही शस्त्रास्त्र दलाचा वापर करू नये ज्यामुळे त्या भागातील शांतता आणि स्थिरता खराब होईल.
या करारामुळे दोन्ही बाजूच्या सैन्याकडे शस्त्रास्त्रे नव्हती परंतु चिनी सैनिकांकडून काटेरी वायर लावलेल्या दांडके, दगड यांचा वापर केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
© PuneriSpeaks