भारत-चीन व्यापार: दोन्ही देशात नक्की किती व्यापार होतो?

0
भारत-चीन व्यापार: दोन्ही देशात नक्की किती व्यापार होतो?
Share

भारत-चीन व्यापार अनेक वर्षांपासून सुरू असून चीन ही आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीन चा जीडीपी सुमारे 13.6 ट्रिलियन डॉलर्स असून चीन जीडीपी मध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकावर आहे. चीनच्या तुलनेत पाहता भारताचा जीडीपी 3.7 ट्रिलियन डॉलर्स आहे.

भारत-चीन व्यापार हा भारतासाठी मुख्य घटक असून भारतामध्ये नवीन उद्योग गुंतवणूक, तंत्रज्ञान कंपन्यांमधील गुंतवणूक, औद्योगिक घटक आणि कच्चा माल पुरविण्याऱ्या देशांमध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. चीन अमेरिकेनंतर भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

भारत-चीन व्यापार किती होतो?

आर्थिक वर्ष 2019-20 नुसार भारताच्या एकूण निर्यातीपैकी 5 % निर्यात चीनला होते तर एकूण आयात पैकी 13% आयात एकट्या चीन कडून होते.

भारत चीन व्यापारभारताकडून चीन (Cr. मध्ये)चीनकडून भारत (Cr. मध्ये)
वर्षनिर्यातआयात
2015-16138246.43443686.75
2016-17147557.94466009.47
2017-18180109.23561013.18
2018-19208406.52618051.19
2019-20179766.72550784.66

चीनच्या भारताच्या निर्यातीत स्मार्टफोन, विद्युत उपकरणे, उर्जा संयंत्र, खते, वाहन घटक, पोलाद उत्पादने, उर्जा प्रकल्प, दूरसंचार उपकरणे, मेट्रो रेलचे डबे, लोह व स्टील उत्पादने, औषधी साहित्य, रसायने, प्लास्टिक व अभियांत्रिकी वस्तू यांचा समावेश आहे. 2000 पासून चीनची भारतातील निर्यात 45 पट वाढून 70 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे.

भारतात आलेल्या चिनी कंपन्या

 • ओप्पो
 • व्हिवो
 • फोसुन इंटरनॅशनल
 • हायर
 • एसएआयसी (SAIC)
 • मिडिया

वरील भारतातील सर्वात मोठे चीनचे उत्पादक आणि ब्रँड आहेत.

चीनमध्ये असलेल्या भारतीय कंपन्या

 • अदानी ग्लोबल लि.,
 • डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि.,
 • जिंदाल स्टील अँड पॉवर लि.,
 • बीईएमएल लिमिटेड,
 • भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड,
 • गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी
 • Aurobinda फार्मा लिमिटेड.

भारतातही नवीन उद्योगांमधील चीनची गुंतवणूक

सिंगापूर, हाँगकाँग आणि मॉरिशस येथे असलेल्या कार्यालयांमधून चिनी कंपन्या अनेकदा भारतात गुंतवणूक करतात. यामुळे त्यांना चिनी कंपनी समजून बंदी टाकणे सुद्धा शक्य होत नाही.

उदाहरणार्थ, PayTm मध्ये अलिबाबा समूहाची गुंतवणूक अलिबाबा सिंगापूर होल्डिंग प्रायव्हेट या कंपनी मार्गे झाली आहे. चिनी गुंतवणूक म्हणून ही सरकारच्या आकडेवारीत नोंद झालेली नसून सिंगापूर-भारत गुंतवणूक म्हणून यास पकडण्यात आले आहे.

नवीन उद्योगांमधील चीनची गुंतवणूक
भारतातील Start-Up मधील चिनी कंपन्यांची गुंतवणूक

भारत-चीन व्यापार मध्ये भारत चीन वर किती अवलंबून आहे?

भारत-चीन व्यापार मध्ये भारत औषध बनवण्यासाठी लागणाऱ्या घटकांसाठी चीनवर अवलंबून आहे. औषधे बनवण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या आयात मधील दोन तृतीयांश आयात (68%) एकट्या चीनमधून केली जाते. भारतातून सर्वात जास्त औषधे निर्यात ही अमेरिकेला केली जातात. भारत औषध निर्मिती मध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. Xiaomi, विवो आणि ओप्पो या चिनी कंपन्यांनी भारतातील मोबाईल बाजारावर आपला कब्जा केलेला आहे. तिघांचा भारतातील मोबाइल बाजारातील वाटा अंदाचे 72% आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.