भारत पाकिस्तान अणुयुद्ध झाल्यास एवढे लोक बळी जाणार

0
Spread the love

भारत पाकिस्तान अणुयुद्ध झाल्यास सुमारे १२ कोटी ५० लाख लोक मारले जाऊ शकतात असा अभ्यासपूर्वक निष्कर्ष पर्यावरण शास्त्र प्राध्यापक अँलन रोबॉक यांनी काढला आहे. त्यांनी अभ्यासपूर्वक संशोधन करून भारत-पाकिस्तान युद्ध परिणाम शोधून काढले आहेत.

भारत पाकिस्तान अणुयुद्ध

भारत पाकिस्तान अणुयुद्ध झाल्यास जगाला उपासमार सोसावी लागेल, अणुयुद्ध धुरामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर न पोहचण्याचा धोका आहे, त्यामुळे उपासमार वाढेल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

अणु बॉम्ब ने समृद्ध देशांनी एकमेकांवर हल्ला केल्यास लाखो लोक या स्फोटात झटपट मरण पावतील आणि नंतर अनेक शहरांना अग्निज्वालांचा सामना करावा लागेल. सर्वत्र पसरलेल्या अग्निमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुराचा लोट माजेल आणि शेती नष्ट होईल कारण धुराच्या लोटामुळे सूर्यप्रकाश रोखला जाईल व तापमान सुद्धा कमी होईल.

जगात सर्वात मोठे लष्करी सैन्य आणि सामग्री यामध्ये भारत ४ थ्या क्रमांकावर आहे. तर याच यादीत पाकिस्तान १३ व्या स्थानी आहे.

काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाकिस्तान संघर्ष टोकाला गेल्यास दोन्हीही अण्वस्त्रधारी देश युद्धाच्या आगीत उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काश्मीर मुद्यावरून आत्तापर्यंत हिमालयी प्रांतावर दोन युद्धे झाली आहेत आणि फेब्रुवारीमध्ये हवाई चकमकी झाल्या होत्या. रोज सीमारेषेवर गोळीबार चालूच असतो.

“अलिकडे वाढलेला गंभीर लष्करी संघर्ष, प्रादेशिक मुद्द्यांचे निराकरण करण्यात प्रगतीचा अभाव, दाट लोकवस्ती असलेला शहरी भाग आणि आपापल्या परमाणु शस्त्रास्त्रांचा वेगवान विस्तार यासह भारत आणि पाकिस्तान विशेष चिंतेत आहेत” प्रोफेसर अँलन रोबॉक

संशोधकांनी हा अभ्यास करण्यासाठी एक प्रकरण गृहीत धरले आहे. जसेकी २०२५ मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला करून तेथील बहुतेक नेत्यांना ठार मारण्याच्या परिस्थितीचा विचार केला आहे. भारत याला उत्तर म्हणून पाकिस्तान नियंत्रित काश्मीरच्या भागात टँक पाठवून कारवाई करते. युद्धात पराभव होण्याच्या भीतीने इस्लामाबादवरून आक्रमण करणार्‍या सैन्यांना अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर दिले जाते आणि आण्विक युद्धाला सुरुवात होते.

प्रतिस्पर्धी त्यांचे सर्वात मोठे अण्वस्त्रे वापरतात की नाही या अनुषंगाने वेगवेगळ्या घटना गृहीत धरून संशोधकांनी अंदाजे ५ कोटी ते १२.५ कोटी लोकांच्या मरण्याचा अंदाज बांधला आहे. अणूबॉम्ब ने खाक झालेल्या बभागातील आगीमुळे आठवड्यात संपूर्ण जगात धुराचे लोट पसरतील.

पृथ्वीवरील पृष्ठभागाचा सूर्यप्रकाश २० ते ३५ टक्क्यांनी कमी होईल आणि जागतिक तापमान ते डिग्री ने थंड होईल आणि पाऊस व बर्फ १० ते ३० टक्क्यांनी कमी होईल. पुन्हा सर्व सुरळीत होण्यासाठी तब्बल १० वर्षांहून अधिक कालावधी लागू शकेल.

शेती १५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल आणि यामुळे उपासमार यांसारखा धोका आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास हे परिणाम सोसावे लागतील. त्यात देशाची आर्थिक स्थिती किती ढासळतेय हे युद्धाच्या प्रचंडतेवर ठरेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

thoughts….. @PuneriSpeaks


©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कारगिल युद्ध माहिती, कारगिल युद्ध मराठी, कारगिल युद्धाचा इतिहास, कसे झाले कारगिल युद्ध?

युद्धस्थितीत ‘महाराष्ट्र पोसणारा’ शेतकरी, शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि बिनव्याजी कर्ज देणारे छत्रपती !

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.