१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत

0
१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत

१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दिलेले लक्ष पार करताना पाकिस्तानचा संघ पुरता ढासळला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ६९ धावांवर बाद झाला. यात फक्त ३ जणांना दोन आकडी धावा करता आल्या.

भारतीय ईशान पोरेल ने ४ बळी घेत पाकिस्तानच्या संघाला खिंडार पाडले. शिवा सिंग आणि रियान पराग ने प्रत्येकी २ बळी घेत भारताला अंतिम फेरीत दाखल करण्यास मोलाचे योगदान दिले.

भारतीय क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध ९ विकेटच्या मोबदल्यात २७२ धावा करत पाकिस्तान पुढे मोठे लक्ष ठेवले होते. भारताचा स्टार फलंदाज शुबमन १०२ धावांवर नाबाद राहिला. पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा या भारतीय जोडीने ८९ धावांची भागीदारी करत भारताला मोठे लक्ष गाठण्यास मदत केली. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ ला मुहम्मद मुसा ने ४१ धावांवर धावबाद केले.

मनोजतने भारतीय बाजूला मजबुत बनवत ४७ धावांची खेळी केली. खेळांच्या सुरुवातीपासून पाकिस्तान ने आपला निराशादायक खेळ चालू ठेवत सुरुवातीलाच दोन झेल सोडले. त्यांनी धावबाद करण्याचे दोन तीन संधीही सोडल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अर्शद इकबाल (3/51) यांने भारताच्या तीन फलंदाजांना झटपट बाद केले. हारविक देसाई (20), रियान पराग (2) आणि अभिषेक शर्मा (5) हे अर्शद चे बळी ठरले.
भारताने हा खेळ २०३ अशा मोठ्या फरकाने जिंकून पाकिस्तान ला चारिमुंडया चित केले आहे.

विश्वचषक जिंकण्यासाठी भारताचा सामना ३ फेब्रुवारी ला ऑस्ट्रेलिया शी होणार असून विश्वचषक सामना चुरशीचा होईल यात शंका नाही.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आढावा

Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत

लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.