भारतीय जवानांनी पाकिस्तान हद्दीत घुसून तीन सैनिकांचा खात्मा करत भारतीय लष्कराचे जशास तसे प्रत्युत्तर…
श्रीनगर : पाकिस्तान सैनिकांच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केला. पाकिस्तान सैनिकांच्या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातील एक जवान आहे.
भारतीय लष्कराने ही कारवाई LOC जवळ रावळकोट येथे केली आहे. यामध्ये पाकिस्तानचे पाच सैनिक जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी पुनः पाकिस्तान लष्कराने शस्त्रसंधी उल्लंघन केले. त्यालाच सडेतोड उत्तर देत भारतीय लष्कराने ही कारवाई केली.