इंस्टाग्राम मॉडेल ट्विकंल कपूर….! मॉडेल बनून जाहिरातीतून कसा पैसा मिळवला

0
इंस्टाग्राम मॉडेल ट्विकंल कपूर….! मॉडेल बनून जाहिरातीतून कसा पैसा मिळवला

इंस्टाग्राम मॉडेल ट्विकंल कपूर….! मॉडेल बनून जाहिरातीतून कसा पैसा मिळवला

सोशल मीडियावर फोटो/व्हिडिओ साठी लोकप्रिय असलेली नेटवर्किंग साईट म्हणजे इन्स्टाग्राम. इथे फेसबुकसारखे मोठमोठे स्टेटस किंवा ट्विटरसारखं २८० शब्दात व्यक्त होणे असा प्रकार नसून फोटो आणि व्हिडिओ यांसाठी इंस्टाग्राम प्रसिद्ध आहे… इंस्टाग्राम वर भारतातील अनेक प्रमाणावर युजर्स वाढत आहेत. तरुण पिढी सध्या इंस्टाग्राम वर पडून असते. पण इंस्टाग्राम चालवताना आपण यातून पैसे कमवू शकता हे आपणास माहीत आहे का? सध्या इंस्टाग्राम हे फोटोच्या माध्यमातून पैसे कमवून देण्याचे एक उत्तम साधन बनले आहे. तुमच्याकडे फॉलोअर्सची (म्हणजेच एखाद्या उत्पादनाचा संभाव्य ग्राहक) संख्या असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहीराती करुन चांगले पैसे कमवू शकता. यातीलच एक उदाहरण म्हणजे इंस्टाग्राम वर ट्विकंल कपूर डॉल हे अकाऊंट यासाठी चांगलेच फेमस आहे. ही ट्विकंल एक मराठी मुलगी असून तिचे खरे नाव चित्रा विलास कदम असे आहे. मराठमोळ्या ट्विकंल कपूर ने मॉडेल म्हणून नावारुपास आणलंय.

इंस्टाग्राम मॉडेल ट्विकंल कपूर


ट्विकंल कपूर ने पाच वर्षांपूर्वी आपली इंस्टाग्राम वर अकाऊंट उघडून सुरुवात केली होती. शून्य फॉलोअर्सपासून सुरु झालेला हा प्रवास आज तब्बल ६ लाख ५१ हजार फॉलोअर्सपर्यंत येऊन पोहोचला आहे. ट्विकंल अनेक आंतरराष्ट्रीय कपड्याच्या ब्रँडचे प्रमोशन करते. हा तिचा फुल टाईम व्यवसाय झाला आहे. सुरुवातीला स्वतःचे सेल्फी, फोटोशूट पोस्ट करत आपला प्रोफाइल अपडेट केला. हळू हळू फॉलोअर्सची संख्या वाढत गेली.

I Can be your private Island ? . . Pc – @artography_by_sagar ???

A post shared by TwinkleKapoor ? (@twinklekapoordollllllll) on

एक-दीड वर्षांपूर्वी ट्विकंल कपूर ला पहिली जाहिरात मिळाली. त्या दिवसानंतर आजपर्यंत तिने मागे वळून पाहिलेले नाही. हे करताना ट्विकंल आणि तिच्या मॅनेजरने नियोजनबद्धरित्या जाहीरातींचे व्यवस्थापन करत Shein App आणि AMIClubwear हे दोन आंतरराष्ट्रीय ब्रँडचे ट्विकंल सध्या प्रोमोशन करत आहे. इंस्टाग्राम वर जाहीरात करण्यासाठी या कंपन्या ट्विकंलला त्यांचे नवीन प्रॉडक्ट्स पाठवतात. त्या प्रॉडक्टसहित स्वतःचे काही फोटोज इन्स्टावर पोस्ट करावे लागतात. फोटोसोबत कंपनी व प्रॉडक्टचे कॅप्शन देत ब्रँड बद्दल लोकांना अवगत करायचे असते, असा हा काहीसा जाहीरातीचा प्रकार आहे. कधी कधी प्रॉडक्टच्या डिमांडनुसार फोटोशूटही करावे लागते. त्याबदल्यात पैसेही चांगले मिळतात.

ट्विकंल आज बोल्ड मॉडेलिंग क्षेत्रात आहे. पण तिलासुद्धा सुरुवातीला घरातलील वडिलधारी मंडळीच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. पदवी मिळवल्यानंतर काय करायचे ते कर? असा घरच्यांचा दंडक होता. मात्र मॉडेलींगची आवड स्वस्थ बसून देत नव्हती. तिच्या आईनेच ट्विकंल कपूर हे टोपणनाव तिला दिले आहे. आईच्या आधारामुळे तिला मॉडेलिंग करणे शक्य झाल्याचे ती म्हणते. ट्विकंलचे खरे नाव चित्रा कदम आहे. फक्त इंडस्ट्रीसाठी चित्राने ट्विकंल नाव धारण केलेले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

फिफा विश्वचषक फॅन्स: फिफा विश्वचषक स्पर्धेत वायरल झालेल्या सुंदर फॅन्स चे फोटो

AMRUTA KHANVILKAR WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, INSTAGRAM, CAREER, HOT PHOTOS

TEJASWINI PANDIT WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, BACKGROUND, HOT AND BOLD PICS

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.