आयझॅक न्यूटन: क्वारंटाइन मध्ये असताना जग बदलणारे सिद्धांत मांडणारा न्यूटन

0
आयझॅक न्यूटन: क्वारंटाइन मध्ये असताना जग बदलणारे सिद्धांत मांडणारा न्यूटन

आयझॅक न्यूटन एक प्रसिद्ध संशोधक 1665 मध्ये लंडन शहराला प्लेग रोगाने ग्रासले असताना आपल्या संशोधनातून जग बदलत होता.

Photo: Hindustan Business

ब्रिटीश शहरातील अनेकांना या रोगाने ग्रासले होते. तेव्हा आयझॅक न्यूटन हे केंब्रिज मधील ट्रिनिटी कॉलेजमधील विद्यार्थी होता. त्यावेळी या महारोगापासून वाचण्यासाठी द ग्रेट ब्रिटन ने सुद्धा सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) हा पर्याय अंमलात आणला होता. केंब्रिज ने सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू ठेवण्यासाठी आपापल्या घरी पाठविले होते. 23 वर्षीय आयझॅक न्यूटन कॅंब्रिजच्या वायव्येकडे 60 मैलांवर असणाऱ्या वूलस्टोर्प मॅनोर येथील आपल्या शेतातील घरी माघारी गेला होते.

आयझॅक न्यूटन यांच्या संशोधनाचे चमत्कारांचे वर्ष

वूलस्टोर्प मॅनोर हे ठिकाण भयानक आजाराच्या वाहकांपासून सुरक्षित अंतरावर असण्याबरोबरच शांत आणि निर्मळ वातावरण असलेले होते. न्यूटन ला यामुळे शांत आणि निर्मळ मनासारखे काम करायला मिळाले. त्यांचा हा काळ आता अ‍ॅनस मिराबिलिस म्हणून ओळखला जातो ज्याला “चमत्कारांचे वर्ष” असेही संबोधले जाते. जेव्हा त्याने कॅल्क्यूलस, मोशन, ऑप्टिक्स आणि गुरुत्वाकर्षण या क्षेत्रातील शोधांवर काम सुरू केले.

आयझॅक न्यूटन Calculus शोध

आपल्या कॉलेज पासूनचा वेगळ्या वेळेत गणितातील समस्येवर संशोधन करणे चालू केले. Universal Equations Involving Fluctuating Quantities वर आपले संशोधन सुरु केले. 1666 च्या अखेरीस, न्यूटनने “fluxions”, ज्याला आता Calculus म्हणून ओळखले जाते त्या नियमांच्या समस्या वैज्ञानिक पेपरद्वारे प्रसिद्ध करून प्रभावीपणे सोडविली होती.

आयझॅक न्यूटन बीम प्रिझम प्रयोग

आयझॅक न्यूटन बीम प्रिझम प्रयोग

यानंतर न्यूटन ने ऑप्टिक्सच्या अभ्यासाकडे आपले लक्ष वेधले. त्याने एक प्रयोग केला ज्यामध्ये त्याने त्याच्या बेडरूमच्या खिडकीच्या शटरमध्ये एक लहान छिद्र छिद्रीत केले, येणारा प्रकाश बीम प्रिझमसह रोखला आणि नंतर त्या अपवर्तित बीमच्या मार्गात दुसरा प्रिझम ठेवला. हा शोध आजही विज्ञान विषयामध्ये शिकवला जातो. जिथे त्याने हा प्रयोग केला त्याच वूलस्टोर्प मनोर येथे त्याच्या खिडकीच्या बाहेर ‘सफरचंद वृक्ष’ होते ज्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला.

गुरुत्वाकर्षण शोध

गुरुत्वाकर्षण शोध Photo: Art UK

त्याच वर्षात लिंकनशायरमधील त्याच्या आईला प्लेग झाल्यामुळे न्यूटन केंब्रिज येथून पुन्हा निवृत्त झाला. न्यूटन बागेत फिरत असताना याच त्याचा घराच्या बाहेरील सफरचंदाच्या झाडाखाली त्याने गुरुत्वाकर्षण शोध लावला.

लंडनमध्ये 1665 ते 1666 या कालावधीत एक चतुर्थांश लोक प्लेगमुळे मरण पावले होते. युरोपमधील 400 वर्षातील हा सर्वात मोठा उद्रेक होता. न्यूटन 1667 मध्ये केंब्रिजला परतला. दोन वर्षांनंतर त्यांना प्राध्यापक बनवले गेले. म्हणून जर आपण पुढच्या काही आठवड्यांमध्ये घरातून काम करत असाल किंवा अभ्यास करत असाल तर कदाचित न्यूटनचे उदाहरण लक्षात ठेवा. अशाच एका रोगाची साथ असताना सर्व बंधिस्त असताना या महान संशोधकाने अनेक शोध लावले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.