बिग बींना भेटून इस्रायलचे पंतप्रधान भारावले..
भारताच्या दौऱ्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आले आहेत. भारत आणि इस्रायलच्या मैत्री संबंधांना २५ वर्ष झाली, त्यानिमित मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये ‘शालोम बॉलीवूड’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नेतन्याहू यांनी या कार्यक्रमामध्ये बॉलीवुडच्या अनेक नामांकित कलाकारांना भेटले तसेच बॉलीवुडचे कौतुक केले. अमिताभ यांची ट्विटर फॉलोअर्स ची संख्या पाहून आणि भेटून ते निशब्द झाले. ते म्हणाले, माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असून ३ कोटी पेक्षा जास्त लोक बीग बींना फॉलो करतात. नेतन्याहू म्हणाले माझ्याही पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. असे कौतुक बीग बींचे नेतन्याहू यांनी केले. बीग बींचे बॉलीवुडमधील कामगिरी पाहून भारावून निशब्द झाले. ते बीग बींना भेटून आनंदी झाले.
या कार्यक्रमास अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलीवुड अनेक निर्माते-दिग्दर्शक-कलाकार उपस्थित होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत ऐश्वर्या बच्चन, अभिषेक बच्चन, निर्माते सुभाष घई, दिग्दर्शक करण जौहर, इम्तियाज अली, मधुर भंडारकर, विवेक ओबरॉय, प्रसून जोशी असे अनेकजण उपस्थित होते.
नेतन्याहू यांनी बॉलीवुडचे कौतुक करत अमिताभ बच्चन आणि बॉलीवुडमधील तारे-ताराकांसोबत समवेत सेल्फीसुद्धा काढली.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.