कोरोना लस: इटली च्या संशोधकांचा कोरोना लस तयार केल्याचा दावा

0
कोरोना लस: इटली च्या संशोधकांचा कोरोना लस तयार केल्याचा दावा

जगभरात कोरोना लस शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. कोरोना वायरस महामारी संकट दरम्यान एक दिलासादायक बातमी आली आहे . कोरोना संसर्ग प्रभावित देशांपैकी एक इटली ने सांगितले आहे की त्यांनी कोरोना लस (व्हॅक्सीन) बनवली आहे आणि त्वरीत कोरोना वायरस चा संसर्ग कमी होण्यास मदत होईल.

Corona Vaccine

त्यांचा असा दावा आहे की मानवी पेशींमध्ये कोरोना व्हायरस चा होणारा शिरकाव कोरोना लस मुळे थांबू शकतो. जगभर पसरलेल्या या आजारामुळे अर्थव्यवस्था आधीच मंदीत असल्याने या लस मुळे जगभरातील लस तयार करणाऱ्या कंपनी साठी ही लक्षणीय बाब असू शकते.

टाकीस या कंपनीच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने उंदरांमध्ये विषाणूचा शिरकाव होण्यापासून वाचवू शकले आहेत. पाच उंदरांवर त्यांनी लसीची चाचणी घेतली आहे. उंदरांना लस टोचण्यात आल्यानंतर त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढलेली पाहायला मिळाली. त्यांच्यापासून बनणाऱ्या antibody चा उपयोग मानवी पेशींमध्ये संक्रमण रोखण्यासाठी होऊ शकतो. ही चाचणी रोमच्या स्पॅलान्झानी इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात आली

टाकीस कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी औरसिचिओ म्हणाले की, लसीच्या विकासाच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्यास उत्सुक आहे. जगभरात आत्तापर्यंत झालेल्या लस चाचणी मधील आमची प्रक्रिया सर्वात प्रगतीपथावर आहे. या उन्हाळ्यानंतर मानवी चाचण्या अपेक्षित आहेत.

नवीन रोगावरील लस तयार होण्यास मुख्यत्वे ५ वर्षाहून अधिक कालावधी लागतो परंतु जगभरातील संशोधनामुळे लवकरच लस तयार होऊन बाजारात उपलब्ध होईल अशी आशा करूयात.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.