मराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल

0
मराठीत बोलल्यावर चीड येते, मनसे घडवणार जान सानू ला अद्दल
Share

कुमार सानू यांचे चिरंजीव जान कुमार सानू ‘बिग बॉस 14’ च्या सीजन मध्ये प्रतिस्पर्धी आहे. यात बोलताना “मराठीत बोलल्यावर मला चीड येते” असे वाक्य वापरून वादाला तोंड फोडले आहे.

या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये रोज नवनवे वाद पाहायला मिळत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू आहेत, यातून हे वक्तव्य केल्याने लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कुमार सानू याने मराठीबद्दल केलेले वक्तव्य

निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात संवाद सुरू असताना जान सानू ने मराठीत बोलू नकोस, मला चीड येते असे बोलला. यामुळे सर्व स्तरातून जान सानू ला अद्दल घडवावी अशी मागणी होत असताना मनसेने यात उडी घेतली आहे. मनसेचे अमेय खोपकर यांनी यावर जान ला अद्दल घडवणार असे बोलले आहेत.

मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी.
आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.

अमेय खोपकर अध्यक्ष मनसे चित्रपट सेना

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.