जाधवगड किल्ला इतिहास: जाधवगड किल्ला की वाडा?

3
Spread the love

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या किल्ल्याचे रूपांतर हेरिटेज हॉटेल, वेडिंग डेस्टीनेशन,एंटरटेनमेंट इव्हेंट्स साठी करण्याच्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभर विरोध करण्यात आला. त्यानंतर वर्ग-१ आणि वर्ग-२ किल्ले वर्गवारी असून यातील वर्ग-१ ऐतिहासिक किल्यांवर कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण केले जाणार नसल्याचे सरकारला स्पष्ट करावे लागले.

या गोंधळात अचानक जाधवगड चा विषय निघाला. ऐतिहासिक वारसा असलेल्या जाधवगड चे आघाडी सरकारच्या काळात खाजगीकरण करत त्यावर हॉटेल उभारले गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आघाडी विरुद्ध युती असा रंग काहीजणांकडूूून प्रयत्न केला गेला.

Jadhavgadh Fort History जाधवगड किल्ला इतिहास

Jadhavgadh Fort History: मराठा साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या विस्थापित झाल्यानंतर सातारच्या गादीवरील छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वराज्यातील सरदारांना जहागिरी देत आपापल्या भागातील मुघल सरदारांना पिटाळून लावले. यातील निवडक सरदार म्हणजे सरदार पिलाजीराव जाधव.

सासवड आणि जाधववाडी भागातील जबाबदारी छत्रपती शाहू महाराज यांनी पिलाजीराव जाधव यांना दिली होती. या भागावर लक्ष ठेवण्यासाठी जाधववाडी गावात त्यांचा एका गढी वर भव्य वाडा होता. या वाड्याला बाजूने सुरक्षेसाठी तटबंदी बांधली गेली होती. यामुळे जाधवगड ची भव्यता दिसून येते. पिलाजीराव जाधव यांनी वेलार च्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली होती. छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात पिलाजीराव यांनी स्वराजवाढीस हातभार लावला होता.

जाधवगड चे हॉटेल मध्ये रूपांतर

पिलाजीराव यांचे वंशज पूर्वीपासून या वाड्यात राहत होते. २००५ साली जाधवगड मध्ये आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले होते. कामत हॉटेल चे मालक विठ्ठल कामत यांनी पिलाजीराव जाधव यांचे वंशज दादा जाधव यांना आपल्या खाजगी वाड्याचे रूपांतर हॉटेल मध्ये करण्याची कल्पना दिली. जाधव घराण्याचा इतिहास दर्शवणारी वास्तू काळाच्या ओघात जाण्यापेक्षा त्याचे रूपांतर हॉटेल मध्ये करण्याचा निर्णय दादा जाधव यांनी घेतला. वाडा खाजगी मालकीचा असल्याने त्यात सरकारच्या हस्तक्षेपाचा विषय येत नव्हता.

 

विठ्ठल कामत यांनी या वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपत २००७ मध्ये आलिशान हॉटेल उभारले. २५ एकर परिसरात पसरलेल्या भव्य जाधवगड वर भव्यदिव्य हॉटेल उभारले गेले. या जाधवगड वर ३०० वर्ष जुने गणपती चे मंदिर देखील आहे. जाधवगड हॉटेल मध्ये “आई” संग्रहालय बांधले असून त्यात जुन्या घरगुती वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे.

खाजगी मालकीच्या वास्तूचे हॉटेल मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय आणि ऐतिहासिक सरकारी वास्तूंचे खाजगीकरण यांची बरोबरी आपल्याला पटते का? आपल्याला काय वाटते?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का?

शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?

थोरले शाहु महाराज इतिहास: संभाजीपुत्र थोरले शाहु महाराज यांचा अलौकिक इतिहास

  1. तिनशे वर्षें ऐतिहासिक वारसा लाभलेलि वास्तु खासगी कशी असु शकते?
    तत्कालीन सरकारने हस्तक्षेप का केला नाही?

  • नाशिक मधील डुबेर येथील बर्वेवाडा ही वास्तु पहील्या बाजीरावांची जन्मस्थान आहे, तो वाडासुद्धा ३०० वर्षांपेक्षा जास्त जुना आहे आणि ती वास्तु सुद्धा बर्व्यांची खाजगी मालमत्ता आहे.

  • LEAVE A REPLY

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.