दरवर्षी गावागावातून देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या जातात, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी रात्रंदिवस पार पाडणाऱ्या शुर सैनिकांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी कितीही केले तरी ते कमीच पण वडजी ता. भडगाव (धुळे) या गावाने असा निर्णय घेतलाय कि सर्व स्तरातून लोक त्यांची प्रशंसा करत आहेत.
या गावाने सुट्टीवर आलेल्या जवानातर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आखला आहे, अनिल पाटील असे त्या जवानाचे नाव असून त्यास त्या विषयीचे अधिकृत पत्र सुद्धा देण्यात आले आहे.
“ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान देऊन खरच खुप मोठा सन्मान केला आहे. देशसेवा करत असल्याचे सार्थक झाले” अशा शब्दात जवान अनिल पाटील यांनी आपल्याला दिलेल्या सन्मानाविषयी भावना व्यक्त केल्या.
सध्या अनिल पाटील हे इंडो तिबेटीयन दलात कार्यरत असून काही दिवसांसाठी गावाकडे सुट्टीसाठी आले आहेत, त्यात त्यांना दिल्या जाणारा मान पाहून ते प्रसन्न झाले असून सर्व स्तरातून या गावच्या निर्णयाची प्रशंसा होताना दिसत आहे.
अशाप्रकारे बाकीचे गाववाले याचा आदर्श घेऊन आपापल्या गावात जवानांना अशाच प्रकारचा सन्मान देतील अशी आशा सर्व स्तरातून व्यक्त होताना दिसत आहे.
तुमच्या गावात यावर्षी कोण ध्वजारोहण करणार?
आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.