जियो च्या ग्राहकांसाठी खुश खबर ; विमान प्रवास करताना मिळणार ही सुविधा

0
जियो च्या ग्राहकांसाठी खुश खबर ; विमान प्रवास करताना मिळणार ही सुविधा
Share

जियो कंपनीने AeroMobile सोबत केला मोठा करार.

रिलायंस जियो ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर देत विमान प्मेंरवास करताना कॉलिंग ची सुविधा देण्याचे घोषणा केली आहे. यासाठी जियो ने एयरोमोबाइल सोबत करार केला आहे. एयरोमोबाइल पैनासॉनिक एवियोनिक्स कॉरपोरेशन ची सब्सिडियरी कंपनी आहे. या भागीदारी मध्ये जियो चे ग्राहक हवाई यात्रे दरम्यान सुद्धा जियो च्या सर्व सुविधांचा आनंद घेऊ शकतात.

रिलायंस जियो ची ही सेवा वर्जिन अटलांटिक, एतिहाद एयरवेज, यूरो विंग्स, लुफ्तांसा, मलिंडो एयर, स्विस इंटरनेशनल एयरलाइंस, अमीरात एयरलाइंस, बिमान बांग्लादेश एयरलाइंस आणि अलीटालिया च्या हवाई यात्रेमध्ये उपलब्ध होणार आहे. या सेवे सोबत हवाई यात्रेत मोबाइल सेवा देणारी देशातील पहिली टेलीकॉम कंपनी बनली आहे.

तीन अंतरराष्ट्रीय रोमिंग प्लान केले लॉन्च

या सेवेच्या घोषणे सोबतच जियो ने तीन नवीन अंतरराष्ट्रीय रोमिंग प्लान आणले आहेत ज्याची किंमत क्रमशः 499 रुपये, 699 रुपये और 999 रुपये आहे . आपल्या माहितीसाठी या तीन प्लान ची वैधता फक्त एका दिवसाची आहे.

या तीन प्लान मध्ये तिन्ही मध्ये आपल्याला 100 मिनिटे कॉलिंग आणि 100 एसएमएस ची सुविधा मिळेल, आणि डाटा मध्ये 499 रुपये वाल्या पैक मध्ये 250 एमबी, 699 रुपये च्या पैक मध्ये 500 एमबी आणि 999 रुपये वाल्या पैक मध्ये 1 जीबी डाटा मिळेल. या तिन्ही प्लान मध्ये इनकमिंग ची सुविधा नाही मिळणार.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.