जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण

1
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बदनामी करणाऱ्या व्यक्तीला मारहाण, आव्हाड यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे भागात राहणाऱ्या अनंत करमुसे या सिव्हील इंजीनिअर तरुणाने मारहाण केल्याप्रकारात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.  सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी दिवे लावण्याचं आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर तरुणाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकलेली होती. जितेंद्र आव्हाड यांचा फोटोशॉप केलेला आक्षेपार्ह फोटो सर्वत्र प्रसिद्ध केला होता.

यावरून भाजपने मंत्री आव्हाड यांच्याविरोधात रान उठवले आहे. मंत्री असताना तरुणाला मारहाण केल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावर त्यांचा राजीनामा मागितला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी देवेंन्द्र फडणवीस यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा आणि मारहाण झालेल्या तरुणाचे फोटो संपूर्ण सोशल मीडियावर वायरल होत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून याबाबत सोशल मीडियावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदर तरुणाने अनेकदा आव्हाड यांच्या परिवाराविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे ते म्हणाले आहेत.

आपल्याला याविषयी काय वाटते आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

 1. आव्हाडनी पोस्ट केलेल्या तीनही फोटो वरून..

  १. पहिल्या फोटोतील पोस्ट कुणी लिहिली आहे ते समजत नाही! उलट असे दिसते की त्यानी स्वतःच लिहिलंय!
  २. दुसऱ्या फोटोत, कमेंट ला मार्किंग केले आहे, त्याच्या वरच्या कमेंट पण आक्षेपार्ह आहेत.
  ३. तिसऱ्या फोटोत, पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी, की त्यालाही उचलून नेणार!

  या शिवाय, मंत्रपदाचा गैरवापर करून, पोलिसांचा वापर केला करून, कपटाने त्या व्यक्तीला घरातून नेले! तोंडावर, खाजगी लोकांना पाठवून उचलायची हिम्मत नव्हती! कारण जर तसे केले असते तर, पीडितांच्या घरच्यांनी वेळेतच पाठपुरावा घेतला असता, आणि अनर्थ टळला असता!
  सगळ्यात अगोदर त्या पोलिसांना कायम स्वरुपी बडतर्फ करायला पाहिजे, आणि मग ह्या बेजबाबदार नेत्याला कायद्याने शिक्षा देऊन, वर मंत्रिपदावरून बडतर्फ केले पाहिजे. या शिवाय नुसते लोकांना दाखवण्यासाठी मंत्रिपद काढून दुसऱ्या शासकीय अधिकारात पद दिले जाऊ शकते, तर, ते ही होऊ दिले नाही पाहिजे!
  हे माझे, माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन आहे! तसेच आवाहनही आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.