जिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

14
जिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

जिव्हार : प्रेम आणि शेवट

१४ भागांची एक अनोखी प्रेमकथा…

दाराची कडी वाजते. दार उघडल जात. दारात दुधवाला उभा असतो. वीणा दूध घेते आणि दूधाच भरल भांड घेऊन आत स्वयंपाक घरात जाते. एकीकडे दुध तापवत ठेवते आणि दुसरीकडे नवऱ्यासाठी चहा बनवत ठेवते. नवरा बाहेरच्या खोलीत बारावीच्या नोट्स वाचत बसलेला असतो. पेशाने प्रामाणिक शिक्षक असलेले मोहन रोज कॉलेजला जाताना स्वतः अभ्यास करत आणि मग जाऊन मुलांना शिकवत. या विणा-मोहनला दोन मुली होत्या एक श्रद्धा. जी कॉलेज ला असते. सकाळीच ती कॉलेजला गेली होती. त्यामुळे आत्ता घरी फक्त धनु होती. धनु म्हणजे लाडान तिला धनु म्हणत पण खर नाव धनश्री होत. ती दहावीत शिकायला होती. तिला शाळेत जायला अजून वेळ होता म्हणून ती आत स्वयंपाक घरात मेथीची भाजी निवडत बसलेली असते.

घरात दोघ आई-वडील शिक्षक त्यामुळे घरात शिस्त हि होतीच. त्याच्यामुळे धनुही शिस्तप्रिय होती. चुकीच वागण्याचा तिला तिरस्कार वाटत. दिसायला खूप सुंदर गोरी. आणि कायम चेहऱ्यावर आनंद दिसणारी अशी धनु. तशी श्रद्धा हि सुंदर आणि शांत होती पण धनु लहान असल्याने तिच्यावर जास्त जीव होता आई-वडिलांचा.

तस हे कुटुंब मूळच सांगलीच पण मोहनची बदली साताऱ्याच्या एका कॉलेजमध्ये झाली. त्यामुळे हे चौघ सातारला भाड्याने घर घेऊन राहू लागली. वीणाची जरी नोकरी सुटली तरी तिच्यातली शिक्षिका गप राहू देत नव्हती. मग साताऱ्यातल्या एका प्राथमिक शाळेत तिने काम सुरु केल. अशात दोन्ही मुलीना बंधन होती. हौसमौज सगळी व्हायची पण वेळेच बंधन. शाळेत, कॉलेजला मुलांशी मैत्री करण याला विरोधच होता. त्यामुळे प्रेम वैगरे सगळ स्वप्नातच.

धनुला एका शाळेत दाखल केल. ( शाळेच नाव नाही लिहू शकत ) शाळा सुरु होऊन दोन महिने झालेले. धनुसाठी शाळा आजूबाजूचा परिसर नवीन शिक्षक सगळ अगदी नवीन होत. धनुच्या बोलक्या स्वभावामुळे तिच्या वर्गातल्या जवळ जवळ सगळ्याच मुली तिच्या मैत्रिणी झाल्या. दिवस जात होते. आणि दिवसाचे रंग बदलत होते.

शाळा सुटल्यावर नेहमी सारखी धनु निघाली होती. आड-वाटेन घर जवळ पडायचं तिला. म्हणून ती निघाली होती. आणि चालताना तीच लक्ष गेल रस्त्यावर फळ्याच्या दोन तीन रंगीत खडूने अगदी नक्षीत नाव लिहिलेलं. “धनु”…..

भाग ०२

जिव्हार : प्रेम आणि शेवट

ते तीच नाव रस्त्यावर लिहिलेलं बघून धनु गोंधळली. पण तिन विचार केला धनु फक्त ती एकटीच नव्हती तिथ. कारण तिच्या घराजवळ एक मृणमयी नावाची मुलगी राहत होती. तीच एवढ मोठ नाव आणि उच्चार अवघड असल्यानं तिला आजूबाजूचे धनु म्हणत. धनु का तर कारण ति धनु राशीची होती. धनुच्या जीवात जीव आला. हे आपल्यासाठी नाही असा विचार करून तीन पायानं ते नाव पुसलं आणि घरी निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना तिला देशपांडेंच्या दारात असलेल जास्वंदीच झाड लागल पण आज त्याची फुल कोणी तरी तोडली होती सकाळीच. धनुला जास्वंद खूप आवडत. पण आज तिथ फुल नव्हती. अगदी फुल नाही मिळाली तरी ती कळ्या तोडून संध्याकाळी पातेल्यात पाणी घेऊन त्यात रात्रभर त्यात कळ्या टाकत. सकाळी टप्पोरी जास्वंद त्यात फुलत. पण आज कळ्या हि नव्हत्या.ती गेली आडवाटेने. शाळेत निघाली. आणि पुन्हा कालच्या जागेवर तिला तीच नाव दिसलं. “धनु” आणि कालपेक्षा जास्त गडद होत आणि त्यावर टप्पोरी तिला आवडतात तशी दोन जास्वंदाची फुल ठेवली होती. धनु ने आजूबाजूला बघितल कुणीच नव्हत. आज तिला उत्तर मिळाल. ते नाव त्या धनु म्हणजे मृण्मयीच नक्कीच नव्हत. कारण जास्वंद धनुला आवडत होता. आणि येताना तिला फुल मिळाली नव्हती म्हणजे कुणीतरी तिला प्रत्यक्ष नाही पण अस काहीकरूण देण्याचा प्रयत्न केला होता. ती खुश झाली. तिन ती फुल उचलून हातात घेतली आणि नाव पुसायचं पण कस आणि का म्हणून तिन त्यावर माती टाकली आणि हात झाडून निघून गेली.

अस आठवडाभर चालू होत. त्यामुळे तिन आता देशपांडेंच्या झाडाला हात लावायचं सोडून दिलेलं. रोज तेच ते तीच नाव आणि दोन जास्वंदाची फुल तिला वाटेत मिळत. आणि ते प्रत्येक फुल ती घेऊन शाळेत जात आणि सुकलेली फुल ती एका प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवत होती. पण हे सुंदर अक्षरात नाव लिहिणारा आणि अस तिच्या आवडत फुल देणारा लपून राहिलेला मुलगा होता कि मुलगी होती काय माहित पण कोण होत हे मात्र जाणून घ्यायची धनुला ओढ लागलेली. आणि नेहमीसारखा इंग्रजी सण आला फ्रेंडशिप डे.

धनूची मैत्रीण वैशाली दोघी एका बाकावर बसत. त्यांचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता. त्यामुळे खिडकीतून खाली दोघी बघत होत्या. खाली रस्त्यावर मुल मुली एकमेकांना रंगीत दोरे बांधून मैत्रीदिवस साजरा करत होते. तेवढ्यात वैशालीने धनुच्या हातावर हात मारला आणि खुणावल. आणि दोघी खाली एका बाजूला बघू लागल्या. तिथ एक काळासावळा मुलगा होता. त्यांच्या शाळेतला नव्हता तो पण हातात रंगीत दोरा घेऊन एकटक धनु कडे बघत होता आणि तो जरा पुढ आला आणि…….

भाग ०३

जिव्हार : प्रेम आणि शेवट

तो मुलगा जरा पुढे आला. त्याच पूर्ण लक्ष धनु कडे होत. त्यान रस्ता पार केला. आणि धनुच्या खिडकी खाली बरोबर आला. धनु आणि वैशाली त्याच्याकडेच बघत होते. तस आज प्रत्येकाच्या हातात एकापेक्षा जास्त ते रंगीत धागे दिसत होते. पण या मुलाच्या हातात एकही धागा नव्हता होता तो एक हातात धरलेला त्यान. धनुला प्रश्न पडला कि बहुतेक याला कोणी मित्र नसेल. आणि असेल तर अजून त्यांनी या मुलाला धागा बांधला नसेल. या विचारात असताना वैशालीने तिला हलवलं “ ग बघ न तो काय करतोय” आणि धनु बघू लागली. धनु ज्या खडकीला दुसऱ्या मजल्यावर बसायची त्याच्या खाली बरोबर रस्त्यावर एक पातळ खांब होता. त्या खांबाजवळ तो मुलगा जातो. आणि त्या खांबाला तो रंगीत दोरा बांधतो. आणि माग होता तिथे रस्ता पार करून जातो.

धनु आणि वैशालीला काहीच कळत नाही. पण ज्या नजरेने तो धनुकडे बघत होता. तिला राहवत नव्हत. तिला त्याच्याकड जाव वाटत होत. पण सुट्टी व्हायला वेळ होती न तेवढ्यात घंटा वाजली जेवणाची सुट्टी झाली. बाकावरची पुस्तक वह्या पेन काही न आत ठेवता धनु वैशालीला घेऊन खाली घाईत गेली. खाली गेली तर खाली मुलांची गर्दीच गर्दी जमलेली. त्यात तो दिसत नव्हता. तिन नजर टाकली सगळीकड. वैशालीही त्यालाच शोधायचं काम करत होती. दोघी रस्ता पार करून पलीकडे गेल्या पण तो नव्हता.

धनु माघारी आली. आणि तिन त्या खांबाजवळ जाऊन त्या रंगीत दोऱ्याला काढाल आणि वैशालीला दिला. वैशालीने प्रश्नार्थक चेहरा केला आणि धनुने तिचा डावा हात पुढ केला. उजव्या हातावर खूप धागे तिला बांधले होते तिच्या मैत्रिणीने पण डावा हात रिकामा होता. वैशालीने तिच्या हातात तो रंगीत धागा बांधला. आणि धनुच्या चेहऱ्यावर एक सुकून दिसू लागल. दोघी वर आल्या. डबा काढून खाऊ लागल्या. धनु तशी डावखुरी होती. त्यामुळे प्रत्येक घासाच्या वेळीस तिला त्या रंगीत दोऱ्याकडे बघून तो मुलगा आठवत होता.

शाळा सुटली. ती घरी आली. पण अभ्यास कसा तरी उरकून ती झोपली पण तिला झोप येईना. पांघरुणात काळाकुट्ट अंधार होता. गरम होत होत. तरी त्याच्या चेहरा आठवला कि धनुचे श्वास जड आणि त्या गर्मीत हि थंड पडत होते. आणि नकळत उजवा हात त्या धाग्यावर फिरवला जात होता.

सकाळी लवकर उठून ती शाळेत निघाली.त्या मुलाच्या नादात ती रोजच तिच नाव आणि फुल असलेला रस्ता ती विसरूनच गेलेली. पण आज त्या आडवाटेवर तीच नाव नव्हत. ती इकड तिकड बघू लागली पण नव्हत. नाव हि नव्हत आणि जास्वंदीच फुल हि नव्हत. ती नाराज झाली. तशीच पुढ जाताना तिला कालचा तो मुलगा दिसला. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली. तिला वाटल आत्ता जाऊन त्याच्याशी बोलाव. पण एक मुलगी म्हंटली कि खूप सारे विचार करतात मुली. तिला तीन विचार एकमाग एक आले. एक म्हणजे वडिलांनी ताकीद दिलेली कि मुलाशी कोणत्याच मैत्री करायची नाही. मुल फक्त त्या एका गोष्टीसाठी मुलीशी मैत्री करतात आणि नंतर निघून जातात. आणि आयुष्य बरबाद होत ते मुलींचं. जग नाव ठेवत फक्त मुलींनाच. मुलाला कोण बोलायला जात नाही. आणि मुळात हे वय नाही असल काही करायचं. हे वडिलांचे विचार आठवले तिला. दुसर म्हणजे कालपासून या मुलाच्या विचाराने नकळत जे काही मनात-हृदयात होतंय ते नक्की काय आहे आणि का होतंय ? आणि तिसरा विचार हा कि. ठीक आहे ह्या मुलाचा कालचा वेडेपणा बघून मला ह्याच्याबद्दल काहीतरी मनात होतंय पण त्या मुलाच काय जो माझ नाव रोज रस्त्यावर लिहितो माझ्या आवडती जास्वंदीची फुल ठेवतो. खरतर तो मला जास्त आवडला होता. मग ह्या मुलाच काय ?

मनात नुसता प्रश्नांचा गोंधळ उडाला होता.ती भानावर येते आणि बघते तर तो मुलगा समोर नसतो. ती परत नाराज होते. ती शाळेत जाते.

पण दिवसभर तिच्या मनात एकच विचार चालत होता कि. कालच्या मुलाबद्दल मला इतका आपले पण का वाटतोय आणि तो नाव लिहिणारा कोण आहे ज्याच्यावर मला प्रेम झालय. दोन मुल एक मुलगी आणि एकाचा वेडेपणा एकाचा साधेपणा. एकाला तीन बघितलच नाही आणि एकाला तीन प्रत्यक्ष बघितलंय अशा विचारात आज दिवस पण मोठा वाटत होता. प्रत्येक मिनिट एक तास वाटत होता. पण….

भाग ०४

जिव्हार : प्रेम आणि शेवट

धनुची शाळा सुटते. त्या मुलाचा रंगीत धागा आपण घेतला पण आपण हि त्याला द्याव अस तिला वाटल आणि तिन पहिलं दुकान गाठल आणि एक गुलाबी धागा घेतला. मग रोजच्या आडवाटेने चालताना ती इकड तिकड बघून फक्त नजरेने त्याला शोधत राहते. तो दिसत नाही. चालता-चालता अचानक ती मग थांबते . कारण चुकून इकड तिकड बघताना ती तिच्या नावावर पाय देते. माग सरकते आणि गालात हसते. आज गुलाबी रंगाच्या खडूने लिहिलेलं “धनु”…! आणि तिन घेतलेला धागा हि गुलाबीच असतो. ती समोर बघते. कोणीच नसत. तीची छातीची धड धड वाढते. कुणी तरी याव आणि घट्ट मिठीत पकडावं आणि मनाला शांत कराव अस तिला वाटत होत.

हृदयाची धड-धड शांत झाली तोच माग कुणी तरी आहे अस जाणवलं. तिन पहिलं पायांनी तीच नाव पुसलं आणि मांग फिरली तर तिच्या अगदी जवळ तो मुलगा होता. पुन्हा तेच हृदय आता धाड-धाड धडकायला लागल. आता बाहेर येत कि काय अस झालेलं तिला. हातातला धागा पुढ करत तसाच दुसऱ्या हाताने डोळ्यांवर आलेली केसांची बट कानामाग सरकवत शब्दांना शोधत होती ती. तीचे ते गोंधळलेले हावभाव बघून त्यान मग खाली बघितल नाव फिसकटलेल होत. तिला काय सांगाव समजत नव्हत. त्यान खिशात हात घातला आणि दोन जास्वंदीची फुल काढली आणि तिच्या समोर धरली. आता तर पूर्ण रीत झालेली ती म्हणजे विचार शब्द भावना सगळ हरवलेलं तिच.

कारण तिला जो आवडलेला तोही हाच होता आणि ज्याचा वेडेपणा आवडलेला तोही हाच म्हणजे मुल दोन नव्हती एकच होता.

ती हसली आणि तिने फुल घेतली आणि डब्याच्या पिशवीत टाकली. आणि त्याच्यापुढ रंगीत धागा धरला. त्यान हात पुढ करून धागा घेतला आणि खिशात ठेवून निघून गेला. दोघांनी न बोलताच एकमेकांशी संवाद साधला होता. तीही घरी गेली.

दुसऱ्या दिवशी घरातून पाच मिनिट लवकर निघाली धनु. आजही रोजच्या ठिकाणी तिला नाव लिहिलेलं दिसल पण आज तीच नाव नव्हत. तिथ लिहिलेलं होत “ शुभम”…तिने आजूबाजूला बघितल तो दिसतोय का पण नव्हता. मग त्या नावाला अगदी हलग हाताने पुसून हात झाडून ती निघून गेली. रस्त्याने पूर्ण फक्त चेहऱ्यावर तिच्या हास्य होत. शाळेत पण तीच लक्ष नव्हत. एका वेगळ्याच जगात हरवल्यासारखी होती.

शाळा भरली. पहिला तास सुरु झाला. वर्गशिक्षका आल्या हजेरी घेतली आणि इंग्लिशच्या व्याकरणाचे धडे शिकवताना काही लिहून हि देत होत्या.

सगळीच मुल फळ्यावरच उतरवून घेत होते. आणि धनु हि. पण वैशालीला काहीतरी जाणवल तिने निट बघितल वाकून धनुच्या वहीत तर सगळ लिहील होत धनुने सुंदर अक्षरात पण जिथ जिथ “एस ( s )” हे अक्षर होत तिथ-तिथ ते अक्षर मोठ्या लीपित आणि अगदी स्टाईलिश लिहील होत. वैशालीने मग न राहवून तिला विचारल कोण आहे ग हा एस ?

धनु : कोण नाही ग.

वैशाली : गप मला येडी बनवतीस का ?

धनु : नाही ग तस काही नाही.

वैशाली : मग एस( s ) च सगळीकड कॅपिटल काढलायस. आणि ठीके सुरुवातीचा एस कॅपिटल असतो पण अधला-मधला पण कॅपिटल काढलायस खर सांग कोण आहे तो.

धनुने वही बंद केली आणि चेहरा फिरवून चेहऱ्यावर आलेले हासू लपवू पाहत होती. शुभमच्या विचारात दिवस संपला शाळा सुटली आणि धनु शाळेबाहेर आली आणि डोळ्यावर पडलेली केसांची बट कानामाघ घेतली आणि गालात हसली. कारण शाळेच्या गेट पाशी शुभम येऊन थांबलेला असतो. ती गर्दी कमी व्हायची वाट बघते. सगळी मुल निघून जातात आणि मग ती त्याच्या जवळ जाते…….

भाग ५

जिव्हार: प्रेम आणि शेवट

शुभम धनुकडेच बघत असतो. काय बोलाव त्यापेक्षा तिला न्याहाळन्यातच त्याला मज्जा वाटत असते. मग धनु त्याच्या समोर उभी राहून विचारते.

धनु : तू याच शाळेत आहेस का?

शुभम : नाही. या नाही दुसऱ्या.

धनु : कुठ राहतोस तू ?

शुभम : तुमच्या घराच्या माग जो मोठा ओढा आहे त्याच्या पलिकड जी घर आहेत तिथ राहतो.

धनु : बर मला निघावं लागेल कोणीतरी बघेल मला. उगीच काही व्हायला नको. मी निघते.

आणि धनु म्हणते बहुतेक आमच्या इथले पवार सर आहेत ते एsए मी जाते. शुभम घाबरून माग बघतो. आणि तेवढ्यात धनु घाईत काहीतरी हालचाल करते आणि निघून जाते. शुभम पुढ बघतो. धनु मागे बघून त्याच्याकडे हासते आणि नजरेने खाली बघ अस खुणावते. तो खाली बघतो पायाशी एक गुलाबाच फुल असत. ते उचलून तो वरच्या शर्टच्या खिशात ठेवतो. धनु गालात हसत पुढ जाते.

धनुच्या शाळेपाशी दोघांच रोज भेटण सुरु होत साधारण आठवडा झाला असेल. आज धनुच्या शाळेचे मुख्याध्यापक अचानक वारतात. आणि म्हणून आज धनूची शाळा लवकर सोडली होती. म्हणून धनु घरी निघालेली.घरी तिला जाऊ वाटत नव्हत. कारण आज हि तिला शुभमला भेटायचं होत. तो जर आला रोजच्यासारखा तर माझी वाट बघत बसेल आणि नाराज होईल माझ्यामुळ अस तिला वाटल. पण घरी जाण भाग होत. ती धीम्या पावलाने चालत होती. आडवाटेने जाताना एक शाळा लागत होती नगरपालिकेची १९ क्रमांकाची. त्या शाळेची दुपारची सुट्टी झालेली. आणि धनूची नजर तिकड गेली. तिथ एक बर्फाचा गोळे वाला होता. ती तिथ जाऊन एक काला खट्टा चवीचा बर्फाचा गोळा घेते. कारण गुलकंद चवीला छान लागतो पण त्यान जीभ आणि ओठ लालेलाल होतात आणि घरी कळू नये म्हणून ती काला खट्टा घेते. आणि खात असताना तिथ शुभम येतो. त्याच लक्ष नसत पण तिला दिसतो. त्याच्या शेजारी जाऊन धनु बोलते.

धनु : या शाळेत आहेस तू ?

शुभम : हो.

धनु : कोणता घेतोयस गोळा ?

शुभम : काला खट्टा.

धनु : आवडतो का तुला ?

शुभम : हो खूप.

धनु : थांब मी देते पैसे. काका हे धरा पैसे अजून एक द्या.

त्या माणसाकडून गोळा घेते आणि नवीन गोळा खाऊ लागते आणि तिचा गोळा त्याला देते. तोही लाजत खात असतो. दोघ पहिल्यांदाच एकत्र खात असतात. त्यामुळे साहजिकच कसतरी होत होत त्यांना खाताना. लाजल्यासारख आणि त्यात शुभमचा गोळा संपत आलेला असताना हातातल्या कांडीची साथ सोडून बर्फाचा गोळा खाली पडतो. आणि त्याच्या शर्टला घासून जातो. शर्टवर डाग पडतो. ती त्याला तिचा गोळा देऊ करते तो नको म्हणतो. ती हि तिचा टाकून देते. आणि दप्तरातून पांढरा खडू काढून त्याच्या जवळ जाते. आणि त्याच्या डाव्या खांद्यावर उजवा हात ठेवून डाव्या हाताने त्याच्या शर्टवर खडू घासते. डाग फिका होतो.

धनु : घरी जाऊन भिजवत ठेव हा शर्ट. निघून जाईल डाग लगेच निघतो अरे.

शुभम : हहह म्हणतो.

तिच्या त्या स्पर्शाने न जाणे काय काय होत होत त्याला. ती त्याला जाते म्हणून निघते. तो तिला बघत राहतो. घंटा वाजते. तो वर्गात जातो. घरी शाळा सुटल्यावर शर्ट बादलीत भिजवत टाकतो. आणि धुवायला बसतो. साबण आणि ब्रश सगळी कड लावतो पण डाव्या खांद्याला ब्रश लावत नाही. मग तो बाहेर गेला संध्याकाळी आई ने खोबर आणायला सांगितलेलं पावशेर. त्याच दुकानात धनु आलेली. दही न्यायला. कारण आज बाबांचा उपवास असतो. तो तिला सांगतो उद्या भेटशील का मला ?

ती होकार देते. पण कधी.?

शुभम : दुपारी ?

धनु : का काही काम आहे का ?

शुभम : नाही माझी आई घरी नाही उद्या. म्हणून

धनु : हो चालेल. पण मी कशी येऊ ?

शुभम : कशी म्हणजे ?

धनु : काय सांगून शाळेतून निघून येऊ ? ( थोडा विचार करून ) बर बघू बघते काय तरी मी.

मी वाट बघेन ओढ्यापाशी दुपारी दोन ला.

चालेल अस म्हणून धनु निघून जाते. आणि तो त्या दुकानदाराला खोबरे मागतो.

भाग ६

जिव्हार: प्रेम आणि शेवट

जिव्हार

आज धनु सकाळ पासूनच शाळेत गप्प-गप्प बसली होती. पण त्यामागच कारण होत तिला शुभमला भेटायचं होत. त्यासाठी तिला आजारी असल्याच दाखवायचं होत. दुपारची सुट्टी होते. आणि ती वैशालीला सांगते मला बर वाटत नाही. मी घरी जाते. वैशाली म्हणते मी सोडायला येऊ का ? पण धनु नकार देते आणि निघून जाते. नेहमीच्या वाटेवर शुभम थांबलेला असतो. धनु पटकन त्याच्याकड जाते. आजूबाजूला अंदाज घेते आणि त्याच्यासोबत चालू लागते. तो एका वेगळ्या रस्त्याने तिला घेऊन जातो. मग त्या ओढ्यापासून पलिकड जाताना एक लोखंडी पूल होता. त्या पुलावरून जातात दोघ आणि मग ते शुभमच्या घरापाशी पोचतात. या इतक्या वेळात दोघ एकमेकांशी एक “ब्र” शब्दही बोलत नाही.

मग शुभम आजूबाजूला बघतो. आणि पटकन आपल्या पत्र्याच्या शेडच कुलूप उघडतो. तिला पहील आत जायला सांगून मग तो आजूबाजूला बघून दार लाऊन घेतो. तिला बसायला सांगतो. ती खाटेवर बसते. तो जाऊन निट बेडशीट निट करतो आणि मग धनु बसते. तो तिच्या समोर उभा असतो. तीही त्याला बसायला सांगते. पण तो शांतच असतो. मग काहीतरी आठवल्यासारख मागे जातो आणि एक प्लास्टिकची पिशवी घेऊन तिच्यासमोर येतो. ती उठणार तोच तो तिला म्हणतो उठू नको. ती शांत बसते. मग तो पिशवीतून झेंडूची आणि जास्वंदीची फुल काढतो.

फुल का तर शुभमला आई होती वडील कधीच दारू पिऊन मेले होते. त्यामुळे आई धूण-भांडी घासत आणि सकाळी फुलांचे हार करत. आणि शुभम ते विकत असत त्यामुळे त्याच्याकडे जास्वंदी झेंडू गुलाब मोगरा खूप असायचा. तर. त्यातली आजची वाट्याची घरातल्या देवाला घालायची फुल त्यातली राहिलेली फुल तो पिशवीतून काढतो. दोन फुल घेऊन तिच्या दोन पावलांवर ठेवतो. मग दोन फुल अजून घेऊन तिच्या मांडीवर ठेवतो. आणि एक जास्वंद घेऊन उठतो आणि तिच्या पुढ धरतो. धनुला काहीच कळत नाही. ती त्याचा हात धरून छातीशी धरते घट्ट आणि डोळे गच्च मिटते. डोळ्यातून पाणी पडायला लागल. तिची पूजा करायची असते त्याला. पण मधेच ती त्याला अडवून त्याला जवळ ओढून शेजारी बसवते. आणि सगळी फुल गोळा करून ती तिच्या दप्तरात ठेवते. मग ती त्याच्या शेजारी सरकते. आणि त्याच्या केसात हात फिरवते.

आहा हा …! काय ती वेळ होती आणि तो क्षण. त्याला बर वाटत होत. पण यापुढे काय करतात दोघांनाही माहित नव्हत. तिन स्वताला सावरल. डबा काढला. आणि ती त्याला भरवते. एक घास तिचा.एक घास त्याचा. अस करत करत दोघांच जेवण झाल. ती उठली.

धनु : हात कुठ धुवू ?

शुभम : त्या तिथ मोहरीत. बदली आहे बघ त्यात पाणी आहे.

धनु खाली वाकली तेवढ्यात शुभम, तिच्या जवळ गेला आणि तिच्या हातावर त्यान पाणी घातल आणि तिच्या हातावर ओतल. स्वतःचा हात पटकन धुवून. तिच्या हाताला निट धुवून हाताने चोळला. आणि मग दाराला अडकवलेला टॉवेल घेतला आणि तिचे दोन्ही हात घेऊन पुसू लागला. ती त्याला बघत असते. त्याची काळजी. त्याच प्रेम बघून भारावलेली ती. त्यांनतर तोच सांगतो. हा माझा आहे टॉवेल. माझ्या आता कायम लक्षात राहील. तुझा स्पर्श झालाय याला.

आणि मग ती म्हणते मी जाऊ ? त्याचा चेहरा बारीक होतो. पण तिला घरी जाण भाग होत. शाळेतून पळून आलेली ती. म्हणून ती दप्तर घेते. आणि दारापाशी जाते. आणि कडी काढायला जाते. पण निघत नाही. तो माग जातो. आणि मुद्दाम निघत नसल्याचा आव आणून प्रयत्न करू लागतो. आणि त्या सरशी तिला मागून धरतो आणि स्वताकडे करून तिला मिठी मारतो. आता ती संपलीच होती आणि तो हि. तो तिला अजून घट्ट ओढतो. आणि तिही बेभान होऊन त्याला जवळ करते. पण तिला आई, बाबा, श्रद्धा एकामाग एक डोळ्यासमोर येतात आणि झटकन त्याला बाजूला करते आणि म्हणते दार उघड ना. आणि तो दार उघडतो. त्याला सावरता येत नसत. त्याचा हात थरथर कापत असतो. तिचा सगळ अंग लटपट कापत असत. तो दार उघडतो आणि. थांब म्हणतो. तो आजूबाजूला बघतो. कोण नसत बाहेर. मग तिला खुणावतो आणि ती जाते इकड तिकड न बघता. सरळ. तो तिला मागून बघतच असतो.

भाग ७

जिव्हार: प्रेम आणि शेवट

काय काय म्हणून लक्षात ठेवायचं. धनुला त्यान घरी बोलावलं आणि तिन काही कारण न देता ती आली. आली ते आली वर शुभमला मिठी मारू दिली. स्वतच्या हाताने तिन जेवण त्याला भरवल. आणि शुभमने तिचा हात अगदी लहान बाळा सारखा स्वच्छ धुतला काळजी घेतली तेही धनुला आवडल होत. जाताना दारात त्यान तिला जवळ ओढून जी मिठी मारली ती न विसरण्यासारखी होती. दोघांकडे सारख्याच आठवणी होत्या. आणि दोघ हि त्या आठवणीत बुडून होते.

संध्याकाळी धनु आईला स्वयंपाक करताना मदत करत होती. वडील यायचे होते. श्रद्धा अजून क्लास मध्येच होती. घरी फक्त आई आणि धनु. मग चालेलेल दोघींचं टुकूटुकू काम. आणि शेजारी पवारांच्यात काही काम होत म्हणून आई निघाली. जाताना धनुला बजावून गेली. “वरणभात लावलाय कुकरला चार शिट्ट्या कर. जास्त नको करू नाहीतर आटल पाणी आतलं !”.

म्हणायला नुस्त हो म्हंटली धनु आणि तो हुंकार ऐकून आई हि निघून गेली. पण इकड सहा शिट्ट्या झाल्या आणि धनुला जाग आली स्वप्नातून. नशीब बर कि पाणी जरा आटता-आटता राहिला. वेळेवर उठली ती. तिन शेगडी बंद केली. आणि आत जाऊन बसली. पुस्तक उघडून मराठीच वाचत बसली. पण लक्ष लागेल तर ना. हे…….! जराही लक्ष लागेना. मुळात काय अक्षर काय शब्द आणि काय वाक्य ? सगळ सगळ गोंधळलेलं तीच मन फक्त शुभम या एका शब्दाशी तिच्या मनाची ओळख होती. मग अशात पुन्हा तिच स्वप्न तुटल. आई आल्याच तिला जाणवलं. आत कट्ट्यापाशी खुडबुड होत होती. मग आत जाऊन ती मदत करू लागली. वरणात मीठ घालून तिला रवीने वरण फिरवायला लावलं तर काय अगदी नाजूक पणे रवी वरणाच्या डब्यात घालून हळू हळू घट्ट डाळ घोटत होती. सगळी काम ,विचार आणि मनस्थिती सगळी प्रेमळ भावना होती तिची.

इकड शुभमची आई आली. धनुच्या त्या स्पर्शाने त्याला काय झाल त्याच त्यालाच समजल नाही. पण काहीतरी झाल. शारीरिक थकवा आला त्याला. आणि तो झोपून गेला. पण दार जोराच वाजलं आणि तो तसाच उठून दार उघडायला गेला. आई होती. मग आईने मोहरीत जाऊन तोंड धुताना विचारलं “कोण आलेलं कारे घरी ?” आधी जरा घाबरल्यासारख झाल त्याला पण मग म्हंटला “ नाही “ पण त्याला सांगावस वाटत होत आनंदाने कि “हो आलेली तुझी सून मला भेटायला , आपल घर बघायला “ पण नाही सांगू शकत ना. नाहीतर सून आज आत घरी आली उद्या मला आई बाहेर काढेल अशा भीतीने तो गप्प बसला.

दुसऱ्यादिवशी…..

आता ते रस्त्यावर धनु नाव नव्हता लिहित शुभम. ओळख झालेली नां दोघांची म्हणून. शाळेची दुपारची सुट्टी झाली. धनु शाळेसमोरच्या दुकानात उत्तरपत्रिका आणायला गेली. ते घेऊन ती रस्ता पार करणार तर तिला एक पाचवीतली मुलगी अडवून म्हणते “तुला तिथ दादा बोलावतोय.” आता कोणता नवीन दादा म्हणून धनु बघते तर शुभम. मनाशी हसून ती मनातच बोलते. दादा नाही ग होणारा नवरा आहे. उगीच कशाला दादा करते त्याला. आणि ती जाते त्याच्याकडे. तो चालू लागतो. ती त्याला हाक मारते. तो बघत नाही. मग तो जरा पुढ जाऊन खुणावतो. एक बोळ असतो तिकड ये अस खुणावून तो जातो. तीही त्याच्या मागे जाते. तिथ एक पडक घर असत. तिथ कोण नसत. रात्रीची तिथली चारपाच लोक तिथ दारू प्यायला बसत. बाकी असा तिथ सकाळचा वावर नसायचा. तो आत गेला. आणि तीही आजूबाजूला बघून आत गेली.

धनु : काय रे इकड काय करतोस. परीक्षा नाही का ?

शुभम : मला तुला मिठी मारायाचीय.

धनु : काल घेतल नां जवळ ?

शुभम : हो पण आज पुन्हा एकदा

धनु : रोज रोज नको रे. अस म्हणतात रोज रोज केल तर नंतर कंटाळा येतो प्रेमाचा .

शुभम : तुला वाटत का माझ्याकडे बघून ?

धनु : काय ?

शुभम : हेच कि मला तुझा कंटाळा येईल वाटतय का तुला ?

धनु : नाहीरे

शुभम : मग ये नां लवकर जवळ वेळ कमी आहे. तुझी इथच आहे शाळा मला जायला वेळ लागेल.

धनु : बर.

आणि ती त्याच्या जवळ जाते आणि तो पटकन तिला जवळ मिठीत ओढतो आणि भिंतीला टेकतो.

धनु : अरे रंग लागेल न शर्टला.

शुभम : लागु दे.

आणि अजून तिला घट्ट जवळ तो ओढतो. तिच्या मानेला आपले ओठ फिरवत असताना . लाजेने ती चेहरा इकड तिकड फिरवत असते. केसांचा असा वास येत असत असतो. त्यात त्याला मजा येत असते. हे बघून ती बोलते.

धनु : आजच केस धुतलीत मी. छान आहे ना वास ?

शुभम हो म्हणून अजून तिच्या केसाजवळ नाक नेऊन वास घेऊ लागतो. मग ती त्याला थोड्यावेळाने लांब करते. आणि मग त्याचा इन केलेला शर्ट निघालेला तो नीट करतो. ती त्याच्या मागे लागलेला भिंतीचा पांढरा रंग झाडते. मग पहिली ती पुढ जाते. आणि नंतर तो जातो.घंटा वाजते. शाळा भरते.

भाग ८

जिव्हार: प्रेम आणि शेवट

म्हणजे न प्रेमाची कबुली न प्रेमात शपथा आणि आणाभाका घेतल्या या दोघांनी पण हे सोडून दोघांच वेगळच चालल होत. एक वेगळ जग निर्माण करून दोघ जगत होती. म्हणजे एक पृथ्वी आणि त्यात मग खंड , देश , राज्य, शहर , गाव, गल्ली असे काय काय भाग या जगात असतात आपल्यासाठी पण या दोघांसाठी एकच जग होत. आणि त्यात एकच मोठा खंड होता. शुभम-धनु नावाचा. आणि त्या खंडाचे ते राजा राणी. अशा सगळ्या प्रवासात दोघांच रोज भेटण बोलण एकमेकांजवळ येण सुरु होतच.

रविवार होता आज. साहजिकच शाळेला सुट्टी होती. रविवारी तशी धनु बाहेर जायची नाही. कारण तेव्हा सगळेच घरी असायचे बाबा-श्रद्धा-आई आणि धनु हि. त्यामुळे सगळे घरीच असत. आणि अशात दोघांची भेट होणार नव्हतीच. मग आजचा दिवस असाच गेला दोघांना दिवस कसा गेला अस विचारल असत कुणी तर दोघ सुरात बोलले असते एकदम घाण गेला. कारण दोघांची भेट होण यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट त्यांच्यासाठी खास नव्हती.

सोमवार….

धनु शाळेत गेली. आज शुभम तिला दिसला नाही. मनाची घालमेल होत होती. पण असहि तो कधी न कधी भेटेलच ना आजच्या दिवसात म्हणून ती स्वताला समजावते. शाळा भरते. दुपारची सुट्टी होते. वैशालीसोबत डबा खाताना धनु अधूनमधून खिडकीतून खाली रस्त्यावर बघते पण शुभम नसतो. ती परत स्वताची समजूत काढते. कि आत्ता नाही संध्याकाळी भेटेल. इकड वैशालीला जेवण जात नव्हत. काही दिवस तिपण शांत शांत असायची आजारी असायची. सुट्टी संपली आणि. शारीरिक शिक्षणाच्या तासाला शिक्षक आणि एक डॉक्टर येतात. आणि वर्गाचा पट किती असेल ५५ आणि त्या प्रत्येकाची शारीरिक तपासणी केली. सुरुवात हमखासच मुलींच्या ओळीपासून सुरुवात झाली. पुढचे दोन बाक तपासून झाले आता धनुजवळ डॉक्टर आले. तिची तपासणी केली. आणि मग धनुने सांगतील वैशाली जरा आजारी आहे. मग डॉक्टरांनी तिला तपासल आणि काहीतरी शिक्षकांच्या कानात कुजबुजले. त्यासरशी. शिक्षकांनी तिला हाताला धरून ओढत नेल. थेट वर्गाबाहेर. धनु हि माग माग गेली. आणि शिक्षक वैशालीला ओरडू लागले. का ?

कारण वैशाली सव्वा एक महिन्याची गरोदर होती. तिला दिवस गेलेले. तिची नाडी परीक्षण करताना डॉक्टरांना समजल होत. आता तो मुलगा कोण काय हे न विचारता पालकांच्या हवाली तिला द्यायचं आणि हे प्रकरण इथेच दाबायच असा विचार करून शिक्षकांनी तिला घरी सोडल. आता हि गोष्ट फक्त धनुला माहित होती. ती घरी आली. कस काय कधी झाल हे. वैशालीने कधीच धनुला काही सांगितल नाही. आणि हे अस दिवस कशाने जातात ? हे तिला हि माहित नव्हत.

ती घरी आली. आईला तिन सांगितल पण जसच्या तस नाही. नाहीतर वैशालीशी कधी बोलू दिल नसत. कोणत्यातरी छोट्या मुलीची सातवीतल्या मुलीची गोष्ट सांगितली. आणि मग आईला विचारलं आई मुलीला दिवस कसे जातात ? आई जरा विचारात पडली पण मुलीन असल काही जाणून घेऊन नये या भीतीपोटी आईने सांगितल मुल वाईट असतात. एका गोष्टीसाठी मुलीला फूस लावतात आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना जवळ घेतात काही काही करतात आणि मग त्यांना दिवस जातात.

झाल धनुच्या अंगातल अवसान गळाल. मितर खूप काही केलय शुभम सोबत आणि रोज रोज केलय. या विचाराने धनु तशीच खोलीत गेली. आणि तिला ताप आला. आणि त्यातच तिला विचारांनी तिला मासिक पाळी आली. आईने तिला रात्री जेवायला उठवल पण ती उठली नाही. तशीच झोपून गेली…..

भाग ९

जिव्हार: प्रेम आणि शेवट

धनु आजारी होती. शाळेत दोन दिवस गेली नाही. शाळेत अनुपस्थिती लागत होती. वर्गशिक्षकांनी वडिलांना घरी पत्र पाठवल. धनुचे वडील शाळेत गेले. शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्यांना थोडावेळ बसवलं. आणि मग ऑफिस मध्ये नेऊन. पेपरचा गठ्ठा काढला.

शिक्षक : पहिल्या सत्रात ऐंशीच्या आत तिला मार्क नाहीत. आणि आत्ता चाचणीत बघा चाळीस पैकी बारा पंधरा. आणि गणितात किती मार्क पाडायची. आता आणि बघा पन्नास पैकी गणितात तीस पडलेत फक्त.

धनुचे वडील : तीच लक्ष नसत का ? घरी तर करते धनश्री अभ्यास.

शिक्षक : इथही करते. अभ्यासात लक्ष हि असत. खूप शांत असते वर्गात. मला वाटल घरी काय तुमच्या प्रोब्लेम आहे. म्हणून मी समजून घेतल पण मी ठरवलेलं तुम्हाला एकदा भेटायचच.

धनुचे वडील : बर झाल बोलावलं. मीही एक शिक्षक आहे. आणि माझ माझ्या मुलीकडे लक्ष असायला हव.

शिक्षक : आणि धनुच दुपारच्या सुट्टीतून घरी जाण या महिन्यात तिनदा झालय. तिला काही त्रास आहे का आजारी आहे म्हणत होती. एकदा तर मला न सांगता गेली. दुसऱ्यादिवशी छडी हि खाल्ली माझ्या हातून.

धनुचे वडील : हा जरा आजारी आहे. आजपण झोपूनच आहे.

शिक्षक : बघा आता परीक्षा जवळ आलीय आजारी पडून कस चालेल. तिला बर करा आणि जमल तर उद्या पाठवा शाळेत. मी अभ्यास करून घेईन. हुशार आहे धनश्री. लक्ष नको भरकटायला.

धनुचे वडील : हो नक्की उद्या पाठवून देतो शाळेत.

धनुचे वडील तिथून निघून घरी येतात. घरी येऊन धनुजवळ जातात. धनु डोळे उघडे ठेवून झोपलेली असते. उजवीकडे कूस करून झोपलेल्या धनुच्या डोळ्यातून पाणी येत असत. वडील येताना बघून धनु डोळे पुसते. वडील तिच्या शेजारी बसून विचारतात.

धनुचे वडील : धनु .

धनु : काय बाबा ?

धनुचे वडील : पिरेड तुला महिन्यातून किती वेळा येते बाळा ? तीन वेळा ?

धनु : काय झाल बाबा.

धनुचे वडील : शाळेत मधल्या सुट्टीतून घरी गेलीस न तिनदा. घरी नाही आलीस. कुठ होतीस. खर सांग. आणि खोट तर अजिबात बोलू नकोस. कि मी कुठ आले वैगरे. आत्ताच शाळेतून आलोय. शाळेतून पत्र आल तुला मार्क्स कमी पडत आहेत. तू सुट्टीतून पळून जातेस. आजारी असल्याच खोट कारण देतेस. काय लावलं आहेस ?

धनु : नाही बाबा मला बर वाटत नव्हत म्हणून मी. आले. वैशालीच्या घरी थांबले. कुठ नाही गेले. मी.

धनुचे वडील : नक्की ?

धनु : हो बाबा.

बाबानी मनाविरुद्ध मनाला समज दिला आणि निघून गेले. धनु वाचली. आता तिचा जीव घशाशी आलेला. जर त्यांना कळाल शुभम बद्दल तर आपल काही खर नाही. या भितीन ठरवल शुभला आता भेटायचं नाही. ती उठली. आणि कपाट उघडल.आणि बघितल तर सगळ्या खाकी रंगाची वह्यांची कव्हर पिवळ्या रंगाची झालेली. एक पिशवी होती प्लास्टिकची ती तिन काढली त्यातून तो पिवळा रंग सांडत होता. आणि घाण वास हि येत होता. त्या पिशवीत फुल होती. जी आता कुजलेली. शुभमने रस्त्यावर ठेवलेली जास्वंदीची प्रत्येक फुल आणि आणि त्याच्या घरी गेल्यावर तिची त्यान पूजा केली ती झेंडू मोगर्याची फुल सगळी तिन जपून ठेवलेली. पण शेवटी तीही कुजली आणि त्याच पाणी होऊन सगळ्या कपाटात वास मारत होती. नाजूक फुलांची हि व्यथा झाली. मग धनु आणि शुभमच्या नाजूक प्रेमाची काय होईल कथा ?

तिन विचार न करता ती पिशवी कचऱ्यात टाकून दिली. कपाट पुसून घेतल. आणि ठरवल. आता शुभमच नाव काढायचं नाही. बाबांना कळाल तर माझी काही खैर नाही. आणि शुभमला भेटून मला पण वैशाली सारखे दिवस गेले तर ?

नको नादाला नको लागायला अभ्यास करू. आणि ती झोपून गेली. दुसऱ्यादिवशी शाळेत ती गेली. घरी येताना शुभम तिच्याकड बघत असताना दिसला. तिन मान खाली घातली आणि थेट घर गाठल. शुभम तिच्यामाग तिच्या घरापर्यंत गेला पण तिन वळून नाही बघितल. दिवस जात राहिले पूर्ण एक महिना धनुने स्वताला ताब्यात ठेवल होत. असच संध्याकाळी जेवताना धनुचे बाबा सांगतात कि बाबा आणि आई उद्या सकाळी गावाला म्हणजे सांगलीला लग्नाला जाणार आहेत. श्रद्धाची परीक्षा आहे म्हणून ती जाणार नाही आणि तिच्यासोबत असाव कुणी म्हणून धनुला तिच्या जवळ थांबायचं होत. जेवण झाल. ते लवकर जेवत आठला वैगरे. मग जेवण झाल्यावर धनु बडीशेप आणायला दुकानात गेली. तिथ शुभम त्या दुकानदाराच्या मुलाशी बोलत उभा होताच. तिन बडीशेप घेतली आणि निघाली. रस्त्यान जाताना. तोही तिच्या माग गेला. आणि तिच्या माग चालत तिच्याशी बोलू लागला.

शुभम : का भेटत नाहीस मला ? काय झाल

धनु : मला नाही भेटायचं. आणि तुही नको भेटू परत मला. आणि जा इथून कोणीतरी बघितल तर त्रास होईल रे मला जा तू.

शुभम : नाही जाऊ शकत मला तू हवी आहेस. धनु माझ तुझ्यावर प्रेम आहे. तुझही आहे विसरलीस का ?

आज इतक्या दिवसांच्या नंतर पहिल्यांदा दोघात त्यान प्रेमाची कबुली दिली. धनुला कसस झाल. पण तरी ती पुढ चालत राहिली.शुभम तिच्या समोर येऊन थांबला आणि धनु थांबली. शेजारी वडाच झाड होत. अंधार हि होता. तिच्या हाताला धरल आणि गेला झाडामाग घेऊन.

शुभम : नको आहे का मी तुला ? का आवडत नाहीये मी ?

धनु : तस नाही. नको काय आता अभ्यास करायचा आहे. आत्ता नको हे.

शुभम : मी कुठ म्हंटल अभ्यास सोडून कर सगळ पण भेटणार पण नाहीस मला हे चुकीच आहे न ?

धनु : काय रे तुला अभ्यास नाही का ? कधीच अभ्यासाबद्दल बोलत नाहीस.

शुभम : आमची पुढच्या महिन्यात आहे.

धनु : अस कस आमची आत्ता या महिन्यात सुरु होणारे. आणि तुझी पुढच्या महिन्यात कशी ? कधी आहे ?

शुभम : एकोणतीस पासून.

धनु : तेव्हा तर नववीची आहे ना ? वेडा आहेस का जरा तू दहावीला आहेस न ?

शुभम : नाही मी नववीत आहे.

धनु : काय ???????? मला सांगितल का नाहीस तू माझ्यापेक्षा लहान आहेस ?

शुभम : तू विचारलच नाहीस कधी.

धनु : म्हणून सांगण भाग नाही का ? तू मला फसवल शुभम.

शुभम : वय महत्वाच आहे का प्रेमात. आणि कळून काय केल असत ? तुलाही माझ्यासोबत भारी वाटल न एक एक क्षण जगताना ? मला तुला भेटायचय धनु

धनु : नाही आता शक्य नाही.

शुभम : तुझ्याशिवाय मला जगता येत नाही.

धनु : हे बघ जगलासच ना महिनाभर होईल सवय हळू हळू.

शुभम : नको अस म्हणू.

धनु : सोड बाजूला हो मला जाऊदे नाहीतर बाबा येतील शोधत मला. ते चालले आहेत उद्या लगनाला सांगलीला. त्यांना बडीशेप द्यायचीय. जाते मी.

शुभम : घरी कोण असणार आहे.

धनु : दिवसभर मी आणि संध्याकाळी श्रद्धा आणि आई बाबा पण येतील रात्री पर्यंत.

आणि धनु निघून जाते. आणि शुभम गालात हसतो…

भाग १०

जिव्हार: प्रेम आणि शेवट

सकाळी आई बाबा सांगलीला निघाले. इकड श्रद्धा हि कॉलेजला निघाली. धनुने घर आवरून काढल. आणि स्वतसाठी नाष्टा करायला लागली. नाष्टा झाला. पोहे बनवलेले आणि चहा. दोन्ही खाऊन पिऊन ती अभ्यास करत बसली. वाजले असतील आता बारा वैगरे. आणि दार वाजत. आता दारात कोण असेल ह्याचा अंदाज धनुला नव्हता. कारण आईबाबा एव्हाना जाऊन एक तास झालेला. श्रद्धाचा पेपर होता. त्यामुळे ती येणार नव्हती. मग आहे कोण. तिने आतूनच विचारलं कोण आहे. पण बाहेरून काहीच उत्तर आल नाही. फक्त दारावर हातांने एक थाप मारली गेली. धनुने दार उघडल. दारात शुभम होता.

काही न बोलता त्यान आत निट वाकून बघितल आणि आत आला. धनु घाबरली. तिला घाम फुटायला लागला. कोणी बघितल तर आपली वात लागणार या भीतीने तिने त्याला विनवणी केली तू जा इथून. पण शुभम जाऊन सोफ्यावर बसला. खिशातली जास्वंदीची दोन फुल आणि एक कॅडबरी तिच्या समोर धरली. धनु त्याच्या जवळ गेली. आणि हातातल त्याच्या घेणार तर शुभमने तिला जवळ ओढल. ती त्याच्या शेजारी कलली.

शुभम : मी आलो आवडल नाहि का ?

धनु : अस काही नाही.

शुभम : मग ?

धनु : मग काय ? काही नाही.

शुभम : येणा जवळ. मला खूप आठवण आली तुझी. म्हणून धाडस करून आलोय इथ.

धनु : पण मी भेटले असते न बाहेर कुठ तरी.

शुभम : हो पण बाहेर कस तरी होत. म्हणजे कोण ना कोण बघण्याची भीती असते. अस घरात कधीतरी कोण नसल कि भेटायला प्रेम करायला काही वाटत नाही. चारभिंतीच्या आत.

धनु : हो. पण तू निघ आता.

शुभम : होका.

धनु : उगीच नको न प्लीज.

आणि एवढ बोलता बोलता आजवरचा सगळा साठलेला बांध शुभम कडून तुटतो. तिला जवळ ओढून तो तिच्या ओठांना इतक घट्ट आपल्या ओठात पकडतो कि. धनुचे श्वास जोरजोरात वाढतात. ती सोफ्यावर माग पूर्ण अंग टाकून देते. तिला काहीच सुचत नाही. तिने डोळे मिटून घेतलेले असतात. शुभमला भान असत. आणि तो उघड्या डोळ्याने तिला बघत कीस करत असतो. अशात. ती त्याला तिच्यावर ओढून घेते. आता दोघांना हि राहवत नव्हत. दोघानांही काहीतरी होत होत.

Italian Painter Giampaolo Tomassetti Painted Breathtaking Mahabharat Pictures

धनुने शुभमच्या पाठीला इतक घट्ट धरून स्वतःजवळ ओढलं कि शुभमला तिच्या हातातला कंडा रुतायला लागला.

आणि या नादात मगाशी शुभमला बघून धनु बावचळली होती आणि शुभमने फुल देण्यासाठी तिला बोलवल. आणि लगेचच त्यांच्यात प्रेम सुरु झाल. पण एवढ्यात धनुला आठवलच नाही दाराला कडी लावायचं. दाराचा जोरात आवाज येतो. आणि दोघ भानावर येतात. दारात आई आणि बाबा या दोघांना बघतात. शुभम तिच्या अंगावरून पटकन बाजूला होतो. धनु जागेवरच रडायला सुरुवात करते. आईबाबाना जाऊन एक तास झालेला. पण बसमध्ये बिघाड होता म्हणून बस दोन तास नंतर होती. आणि इतक्या उशिरा जाऊन परत एका दिवसात येण शक्य नव्हत म्हणून ते परत आले होते. पण आले ते आले आणि त्यांना हे सगळ काही डोळ्यांनी दिसलं.

बाबा : धनु…………………नुनुनुणु ( जोरात ओरडतात )

बाबा धनु जवळ जातात आणि एक जोरात कानाखाली वाजवतात. शुभम पुरता घाबरून जातो. तो मागून कडेने दाराकडे जातो. पण धनुचे बाबा पटकन जाऊन त्याच्या खांद्याला हिसका देऊन आत ओढतात.

बाबा : कुठ चाललास रे ?

शुभम : कुठ नाही माफ करा मला काका.

बाबा : तू कुठ जायचं नाहीस. आता तुझ्या डोळ्यांनी बघ धनुला मार खाताना. दोघांची चुकी आहे पण शिक्षा तिलाच मिळणार बघ.

आणि त्यांनी दाराला कडी लावली आतून. खूप मारलं धनुला. त्यांनी. लागेल तिथ हात लागत होता तिला. त्या प्रत्येक फटक्याला आई…ग आवाज येत होता. पण आई मध्ये पडली नाही. धनुचा रडताना आवाज ऐकून दाराची कडी वाजली. दारात पवार सर होते. आई जाऊन दार उघडते.

सर : काय झाल वहिनी ?

आई काहीच बोलत नाहीत. ते आत शिरतात. बाबा धनुला मारत होते. आणि एक मुलगा भिंतीला टेकून उभा रडत होता.

सर : अहो थांबा थांबा कुलकर्णी सर.

बाबा : काय थांबा तोंड काळ केल पोरींनी. बदनाम झालो आम्ही आता. आणि का थांबू ?

सर : काय झाल. नक्की सांगा आधी थांबा हो. काय तरी होईल मुलीला. थांबा.

बाबा : लग्नाला गेलेलो. हिच्या भरोशावर घर टाकून तुम्हाला सांगितल पण नाही लक्ष ठेवा मुलींवर म्हणून. पण हिने काय केल या–या पोराला घरी आणून चाळे करतीय.

सर : मग तिला का मारता ह्याला मारा. ए हरामखोर इथ कशाला आलारे तू ? आमच्या पोरी काय तुला अशाच वाऱ्यावर सोडलेल्या वाटतात का ?

आणि ते त्याला कानाखाली वाजवतात. शुभम रडायला लागतो. धनुला त्रास होत्तो त्याला मारताना बघून. पण तिला जागाच हलता येत नसत. पवार सर खूप मारतात शुभमला.

बाबा : काय नाव आहे याच. कुठला रे तू ?

सर : अहो माग ओढ्याच्या पलिकड राहतय गाबड. फुल विकत सकाळी आणि दुपारी असे धंदे करतोस का रे ?

अस म्हणून त्याला जोरात कानाखाली वाजवतात पवार सर. शुभम भिंतीवर जाऊन आदळतो. सर त्याचा हाताला धरून ओढत बाहेर नेतात आणि सांगतात धनुकडे बघितल न तर तुझी खैर नाही.

शुभम निघून जातो. पवार सर आत येऊन दाराला कडी लावतात.

सर : काय करत होते. दोघ.

बाबा : सांगताना पण लाज वाटतीय मला. तो तिच्या अंगावर झोपलेला. आणि हि त्याला कीस करत होती.

सर : बर आता तुम्ही शांत रहा. बर झाल वाड्यात कोण नाही. नाहीतर तमाशा झाला असता. आपली मुलीची बाजू आहे. ते पोरग आता नाही फिरकणार इकड. आणि धनुच्या वाट्याला हि नाही जाणार. फक्त तुम्ही आता हि गोष्ट दाबुण टाका.

बाबा : अस कस म्हणता तुम्ही सर. माझ्या मुलीच अख्ख आयुष्य पुढ पडलय. आत्ता वाचल आम्ही वेळेवर आलो म्हणून. आणि काय भरोसा परत अस काय झाल तर.

सर : नाही होणार धनु तशी नाही आपली. होणा? नाही ना वागणार अस धनु ?

धनु रडत रडत हो म्हणते. वडिलांकडे तिची नजर जाते. रोज प्रेमाने बघणारे तिचे वडील तिला आज रागाने बघत होते. धनु नजर खाली घेते.

धनुला त्या दिवशी दिवसभर जेवण मिळत नाही. ती झोपून जाते.

भाग ११

जिव्हार: प्रेम आणि शेवट

सकाळ झाली आणि धनुच्या अंगावर काटा आला.पण शाळेत जाव लागणार होतच. तिने स्वतःच आवरल आणि गेली आई जवळ भूक लागली सांगायला. पण आई तिच्याशी बोलली नाही. बाहेर येऊन बाबांकडे बघितल तिने बाबांनीही तिच्याकडे बघून दुर्लक्ष केल. श्रद्धा आत होती. तिच्याशी बोलायला गेली तर तीही उठून बाहेर आली. कोणीच तिच्याशी बोलत नव्हत. एकट-एकट वाटत होत धनुला. रडू यायला लागल. खर तर या क्षणाला तिला शुभमची गरज होती. पण सगळ त्याच्यामुळेच झालेलं आहे. तो नसता आला इथ तर काहीच झाल नसत. आला ते आला मी जा म्हणत असताना पण तो गेला नाही म्हणून धनुला त्याचा राग आला पण क्षणात राग विरला पण.
धनुने डबा घेतला. घेतला म्हणजे आईने टेबलवर ठेवलेला. तिने तो घेतला. रोजच्या सारख आईने काळजीने नीट ठेव. डबा सगळा खा. अस काही सांगितल नाही. धनुने नाष्टा हि केला नव्हता. ती दारात गेली. चप्पल घातली. आणि मागून बाबा आले आणि म्हणाले. चल….
आता रोज शाळेत सोडायला आणि आणायला बाबा जाणार होते. त्यामुळे शुभमच तिला दिसण , दोघांच लपून भेटण सगळ बंद होणार होत. आणि त्यामुळे धनु शुभम ला विसरून अभ्यास करेल अस बाबांना वाटलेलं. दोन आठवडे झाले. रोज येताना जाताना बाबा सोबत बघून शुभमला धनुला भेटता आल नाही. त्याची घालमेल होत होती तिला दुखी झालेलं बघून. पण भेटणार कस? काहीच पर्याय नव्हता. वार्षिक एस.एस.सी. बोर्डचा पेपर होता आता पुढच्या आठवड्यात. धनु अभ्यास करत होती. बहुतेक तिच्या डोक्यातून शुभम गेला होता. कारण दिवसभर शाळा , शाळेचा अभ्यास आणि भरीसभर परीक्षेचा अभ्यास. वेळ कुठ होता तिला शुभमचा विचार करायला. आणि घरातले तिच्याशी पुन्हा बोलायला लागलेले. पुन्हा एकदा तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आता तिला मोडायचा नव्हता.
शनिवार होता. आणि सकाळची शाळा होती. तसच बाबांना हि सकाळच कॉलेज होत. आता सोडायला आई गेलेली. आणि आणायला कोण नव्हत कारण श्रद्धा कॉलेजला होती. आणि आई कामाला गेलेली शाळेत.
मग अशात आज तीच तिला एकटीला यायचं होत. बाबांनी बजावलेल कुठ हि थांबायचं नाही. पवार सरांना तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलय मी. त्यामुळे काहीही केल तरी मला बाहेरून कळत. या वाक्याने तिला खात्री पटली कि आपण काही करू शकत नाही. मग तिची शाळा सुटली आणि ती घराकडे निघाली. इकड तिकड कुठ बघायचं नाही. अस ठरवून ती मान खाली घालून चालली होती. आणि अचानक तिला दिसल पुढे लांब एका आंब्याच्या झाडापाशी एक ओळखीचा मुलगा उभा होता. ती मनाला सावरते. आणि पुढ चालायला लागते. तिच्या हृदयाची धडधड वाढते. श्वास थंड होतात. घराचा पत्ता ती विसरते आणि जाते चालत सरळ त्या मुलाजवळ. तो शुभम असतो. ती सावकाश त्याच्या माग जाते. आणि थांबते. तो काय करतोय बघत. झाडावर तो धनु अस नाव लिहितो आणि त्यावर अलगद हात फिरवतो. आणि मग डोळे मिटून त्या नावाला आपले ओठ टेकवणार तोच धनु त्याच्या खांद्यावर हात ठेवते. शुभम दचकतो आणि पटकन काही विचार न करता ते नाव पुसतो आणि माग घाबरून बघतो तर धनु. जीवात जीव येतो त्याच्या.
शुभम : तू आहेस वे . घाबरलो कि मी. कशी आहेस ?
धनु : लागल नाही ना रे तेव्हा तुला ?
शुभम : हे नाही. आई तर ह्याच्याहून जास्त मारते हातात घावल त्याने . चपलीने झाडूने कधी कधी लाटण्याने आहे सवय मला.
धनु हासते. आणि जायला निघते. शुभम माग जातो. पण ती त्याच्याकडे केविलवाणा चेहरा करून बघते. काय ते त्याला समजून जात. तो तिथच थांबतो. धनु घरी येते. आणि खाऊन अभ्यास करायला लागते. एक आठवडा आता सुट्टी होती शाळेला परीक्षेमुळ पण ज्यादा तास ठेवेलेला रोज तीन तास. बीजगणित-भूमिती आणि विज्ञान विषयाचा. एव्हाना बाबांचा तिच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे ज्यादा तासाला तीच तिला जायची मुभा भेटली होती. आणि आज ती ज्यादा तासावरून घरी येताना तिला शुभम भेटला.

भाग १२

जिव्हार: प्रेम आणि शेवट

ज्यादा तास सुटल्यावर वाटेत रस्त्याच्या अलीकड धनु आणि पलिकड शुभम होता. त्यान काहीतरी खुणावल तिला आणि ती समजून गेली. जे काही समजून जायचं होत ते. मग घरी येऊन तिने अभ्यास केला. जेवण केल आणि झोपून गेली.
परीक्षेला आता फक्त पाच दिवस उरले आहेत. आणि धनुवर अभ्यासाचा दबाव होताच.पण काही केल्या शुभमच्या आठवणी तिला अभ्यास करून देईनात. मग अशात काहीना काही हातात येतील त्या पुस्तकातल मनाविरुद्ध वाचून त्या आठवणींचा विसर पाडण तीच सुरु होत. अभ्यासात तिला कळालच नाही कि साडे नऊ वाजलेत. घाईत आवरून नाष्टा करून ती शाळेला निघाली. असही तीन तास असायचा ज्यादाचा तास. त्यामुळे घरी येऊन जेवायची ती. ती शाळेला निघाली. घाईत सगळ सोबत घेतल होत तस तिने. पण नेमक घड्याळ विसरली होती ती. पण असो.
देशपांडेंच्या घरापासून जाताना तिला शुभम थांबलेला दिसला. ती त्याच्याजवळ गेली. का ? आणि कस ? ती त्याच्याकडे आकर्षली जायची ? का इतक धनुला शुभमच बोलण पटायचं ? काय अशी तिला भुरळ पडली होती शुभमची लेखक असून मलाही समजत नाही. प्रेम चीज आहेच अशी. कि कितीही केल तरी शब्दात तिला मांडता येत नाही. त्यामुळे धनूची मनस्थिती हुबेहूब मीही मांडू शकत नाही. सांगू शकत नाही. असो , तर दोघांच बोलण सुरु होत. आणि दोघ एका आडवाटेने जाऊन ओढ्यापासून शुभमच्या घरामागून वाट काढत-काढत लोकांपासून लपत छपत दोघ अजिंक्यताऱ्यावर ( किल्ल्यावर ) जातात.
तिथ हनुमानाच्या देवळापाशी जाऊन कट्ट्यावर बसतात. पण खालून येणारी लोक तिथच थांबत. ओळखीच कुणी तिथ अचानक येऊन थांबल तर काही त्रास व्हायला नको म्हणून ते तिथल्या मोठ्या दगडामाग बोलत उभी राहतात.
धनु : का आलोय आपण इथ ?
शुभम : बोलायचं मला तुझ्याशी महत्वाच.
धनु : मला पण.
शुभम : काय ?
धनु : नको पहिलं तू बोल
शुभम : मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय धनु. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला कोणीपण आवडत नाही. आमच्या वर्गात मुलींचा पट तीस आहे आणि पोर बारा आहेत. पण मला त्यातली एकपण आवडत नाही. आहेत काही त्यातल्या दिसायला चांगल्या. पण मला फक्त तूच आवडतीस.
धनु : मला पण हेच बोलायचं होत. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. जे काय प्रेमात करतात ते मी सगळ पहिल्यांदा तुझ्यासोबतच केलय आता मी नाही कुणाची होऊ शकत. मला फक्त तू पाहिजेस सोबत, कायम. आयुष्यभर. नाहीतर मी मरून जाईन शुभम.
शुभम : अस नको म्हणू. काही होणार नाही तुला. मी करेन काम. पैसे कमवीन. शाळा सोडेन. आपल्यासाठी घर घेईन. तुझी सगळी हौस पुरवेन.
धनु : मला तुझ पत्र्याच शेड पण चालेल. फक्त तू हवायस सोबत.
शुभम : नको आपण आपल वेगळ राहू. माझी आई नाही घेणार तुला घरात आणि मला पण नाही घेणार.
धनु : चालेल मी खूप शिकेन आणि चांगली नोकरी करेन.
शुभम : चालेल.
धनु : एक अजून चार वर्ष आपण सगळ प्रेम जपून ठेवून मनात सारख सारख भेटायला नको. आपण आपल लक्ष देऊ आपल्या भविष्याकड. आणि मग लग्न करू म्हणजे कोण काय म्हणणार नाही आपल्याला.
शुभम : मला नाही जमणार
धनु : काय ?
शुभम : तुला न भेटता राहण.
धनु : मला पण नाही जमाणार पिल्ल्या. पण आपल्याच साठी करायचं आहे ना. आत्ता संयम ठेवला तर आयुष्यभरासाठी आपण एकत्र होऊ. नाहीतर थोडक्यासाठी माती नको व्हायला. समजतंय का तुला ?
शुभम : बर.
धनु : बर काय ?
शुभम : हो
धनु : हो काय ?
शुभम : होय समजल.
धनु : हा गुड बॉय.
शुभम : मग आत्ता देणा मला
धनु : काय ?
शुभम : कीस
धनु : अरे आत्ता कुठ ? खाली जाऊ आपण चल कुणी तरी बघेल अस नको उघड्यावर.
शुभम : किती मोठा किल्ला आहे हा. कोण दिसतंय का तुला इकड.
धनु : नाही अरे पण नको ना.
तिच बोलण थांबत. शुभम तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर अगदी तुटून पडतो. तो छातीवरच्या ओढणीला तिच्या खसकन ओढतो. ओढणीला लावलेल्या दोन्ही खांद्यावरच्या पिना ओढल्या जातात. ड्रेसला तिच्या होल पडतात. पण कुणाला भान राहत नाही. ओढणीच्या बाजूने तिच्या छातीवर शुभमचे हात जातात. आणि अवसान गेल्यासारख धनु अंग टाकून देते. शुभम तिला सावरत, सोबत तिच्या ओठांवर त्याच ताकदीने ताबा मिळवत आणि तिच्या छातीवर जोराने स्पर्श करत सगळ्या गोष्टी सांभाळत असतो. काही वेळान. धनु सावरत घेते. आणि विस्कटलेली केस निट करते. तो गोड तिच्याकड बघून हसतो. आणि तिच्या केसांना निट कानामागे सरकवतो. आणि तिच्या दोन्ही गालांना धरून जवळ जाऊन तिच्या नकट्या नाकावर आपले ओठ टेकवतो. ती गालात हसते.
शुभम : काय झाल ?
धनु : काही नाही . तुला काय झाल ?
शुभम : मला काय होणार ? काही नाही झाल. बस तुझ्यावर प्रेम झालय.
धनु : होका ?
शुभम : हो. खूप सुंदर आहेस तू. जगात अस कोण नाही तुझ्यासारखं.
धनु : होका बस झाल. एवढी काही नाही मी सुंदर
शुभम : कोण म्हणाल अस तुला ?
धनु : मीच म्हणतेय
शुभम : मग वेडी आहेस तू.
धनु : हो आहेच तूच बनवलंयस मला.
शुभम : पण खरच तू खूप सुंदर आहेस धनश्री
धनु : आता बस. चल खाली जाता लवकर किती वाजलेत कळेना पण झालय.
शुभम : थांब हे धर. आररररर…… चेपली कॅडबरी.
धनु : असुदे. दे इकड. निट ठेवायची न मागच्या खिशात.
शुभम : अग मला वाटल आपण बसलो वर जाऊन तर लक्षात राहायचं नाही माग कॅडबरी आहे ते म्हणून पुढ ठेवली तर मिठीत आपल्या चेपली. देऊ का कागद काढून ?
धनु : दे.
तो कागद काढत असताना. धनु. निघालेली ओढणी निट लावत असताना दगडामागून पुढ जाते. आणि बघते. बरीच छोटी मुल पाचवीची आणि त्यांच्याच शाळेची पर्यावरणाच्या तासासाठी इकड किल्ला साफ करायला आलेले. ति बघते. आणि शुभमला लवकर जायला हाक मारते भीतीने. आणि डावीकडे खांद्याला पिन लावता येत नाही म्हणून शुभम येऊन तिला हातात कॅडबरी देतो आणि निट पिन लावतो.
धनु : झाल का ?
शुभम : होतय
धनु : किती वेळ.?
आणि शुभम तिला मागून मिठी मारतो दोन्ही हात खांद्यावरून पोटाला धरून तिला घट्ट जवळ घेतो. आणि मग दोघ पायरी पर्यंत जातात. तोच मागून कचरा टाकताना लांबून पवार सर या दोघांना बघतात…..

भाग १३

जिव्हार: प्रेम आणि शेवट

सकाळी घाईत जाताना धनु घड्याळ हातात घालायचं विसरते. तिकडं डोंगरावर मारुतीच्या देवळातील घड्याळ बंद पडलेलं होत आणि उशीर होईल घरी जायला या नादात ती शुभमला घेऊन लवकर किल्ला वर करते. तीच ती अनोळखी वाट आणि मग शुभमच घर मग मोठा ओढा त्यावरचा साकव लोखंडी पूल आणि मग मधल्या वाटेन तीच घर. ती आली आणि तिनं चप्पल काढली. तोच आईने प्रश्न केला आज दोन तासातच उरकला क्लास? झालं सगळी चोरी पकडल्यासारखं झालं धनुला. पण स्वतःला सावरून तीन काहीबाही उत्तर दिल. आईने हि त्यावर विश्वास ठेवला. धनु हातपाय तोंड धुवायला गेली. मग आईने तिला जेवायला वाढलं. ती जेवली आणि अभ्यासाला बसली.
धनुचे बाबा तिकडं कॉलेज वरून थेट धनूच्या शाळेत गेले तिला आणायला. ते शाळेच्या गेटपाशी थांबलेले. तिकडून त्यांच्या शेजारून मुल एका रांगेत आत शाळेत जातात आणि मागून त्यांच्या पवार सर येत असतात आणि ते धनूच्या बाबांना बघून मुलांना सांगतात वर्गात जावा तुम्ही असता.मी आलोच. वर्गात शांत बसा.
आणि मग ते धनूच्या बाबांना सांगतात कि त्यांनी धनु आणि शुभमला अजिंक्यताऱ्यांवर ( किल्ल्यावर )बघितलं आहे. धनुचे बाबा निघतात.
सर : मारू नका तिला. फक्त विचारा
बाबा : तीच आता खर नाही सर . बस झालं खूप झालं. चुकलं आमचं आम्ही विश्वास ठेवला तिच्यावर पण तिने करायचं तेच केलं
सर : हो पण ऐका तर
बाबा : नाही सर आज निकाल लावणार आहे तिचा मी
सर : उद्या पेपर आहे सर बोर्डाचा. काहीही बोलू नका तिला.
बाबा निघून जातात सरांचं बोलणं न ऐकता.
इकडं घरी देशपांडे काकू आलेल्या असतात. धनु आत अभ्यास करत असते.
देशपांडे काकू : कुलकर्णी बाई ? आहात का?
आई : हो या ना आत
काकू : नको बाई मी आपलं सांगायला आलेय फक्त तेवढं ऎका म्हणजे झालं
आई : आत तर या आधी
काकू : नको म्हंटल ना पोरीला सावरा तुमच्या जरा
आई : का काय झालं
काकू : कुठय ती बेरकी , गरीब दिसती नुसती पण नाहीये गरीब चालू आहे नुसती
आई : कुणाबद्दल बोलताय?
काकू : तुझीच कि मुलगी
आई : मला दोन मुली आहेत
काकू : ती बारकी शाळेत जाणारी ..
आई : काय केलं तिन?
काकू : ते ओढया पलीकडच्या वस्तीतल्या पोरासोबत बोलती काय त्याला भेटती काय आमच्या घरासमोर नालायक तो तीच रस्त्यावर नाव लिहितो धनु म्हणून. रोज पाणी टाकून साफ करायला लागत मला. नाहीतर सगळं पांढर पांढर दिसत दारात. काय चाललेले असतात चाळे लक्ष ठेवा तिच्यावर खूप दिवस बघितलं म्हंटल आत्ता सांगावं मग सांगावं. परत मला वाटलं तुम्ही दोघ नवरा बायको शिक्षक म्हणजे शिस्त धाक असेल पोरींवर पण नाही कसला धाक न कसलं काय? तुमच्याच घरात अस असेल तर काय शिकवता तुम्ही पोरांना शाळेत ?
आई : नाही हो अस नाही ऐकून तर घ्या आत येऊन बोला
काकू : नाही बाई जाते मी तू बघ काय करायचं तुझ्या पोरीचं मी आपलं सांगायचं काम केलं तुला चालत असेल असलं तर बस गोंजारत पोरीला . पण ध्यानात ठेव जेवढं आहे न तुमची मान प्रतिष्ठा सगळी मातीत मिळवून मगच बसणारे हि प्याद. मग तुला समजलं . समजलं का ?
आई : बघतेच तिला
काकू : मारू नको तिला इथून ठेव दुसरीकडं तिला पोरापासून लांब येते मी.
त्या निघून जातात. आणि आई लाटणे घेते आणि आत जाऊन धनुला काही न विचारता मारायला लागते. तिला मारत असताना धनुचा आक्रोश सुरु असतोरच. त्यात पुन्हा दारावर थाप पडते. आई धनुला आवाज बंद करायला सांगते धनु तोंडावर हात घट्ट दाबून रडते. आई जाऊन दार उघडते. दारात पवार सरांची बायको असते.
आई : या कि काय हवं आहे का?
पवार : धनु आलीय का? घरी
आई : हो आलीय कि अभ्यास करतीय
पवार : होका फिरून थकली असेल ना?
आई : म्हणजे समजलं नाही मला शाळेत गेलेली ती अहो
पवार : कुठलं तो गिरणिवाला गेलाय मुंबईला आईकडे म्हणून याआज गिरणी बंद त्याची. म्हणून त्या ओढ्याच्या पलीकडं आहे बघा एक गिरणी शिंदेंची तिकडं गेलेले तर तुमची धनु न एक काळ पोरगं चाललेले एकमेकांना खेटून.
आई : कुठं?
पवार : गेले किल्ल्याच्या रस्त्याकड
आई आत जाऊन हाताने आता परत मारायला सुरुवात करते. धनुला लागत असत आईच्या हातातल्या सोन्याच्या जाड बांगड्या.दोन तीन काचेच्या बंगड्यातर मागशीच फुटलेल्या तिला मारताना आणि त्यातली एक तर धनूच्या कोपऱ्याला लागलेली आणि तिथून रक्त हि येत होत. पवार सरांची बायको शांतपणे बघत होत्या सगळं. पुन्हा दार वाजलं आणि आता कोण आलं आपली चाडी लावायला म्हणून धनूच्या अंगावर काटा आला. पवार सरांच्या बायकोने दार उघडल आणि दारात धनुचे बाबा.
बाबा : वहिनी तुम्ही इकडे?
पवार : काही नाही सहज म्हणून आलेले बर मी येते.
बाबा आत येतात आणि दार लावतात आणि आत जातात धनु रडत असते. गोरी पान धनु गुलाबी लाल काळीनिळी झालेली इतकं आईने तिला मारलेल. बाबा पँटीचा पट्टा काढतात आणि चामड्याच्या त्या पट्टयाने ते तिला मारतात.बरेच सवाल करतात तिला तिची उत्तर काहीच नाही फक्त रडण्याचा आवाज येत असतो तिचा.
बाबांचा हात दुखतो म्हणून ते थांबतात मारायचे. आई रडतच असते . त्या बाहेरच्या खोलीत जातात.
धनु : बाबा
बाबा : एक शब्द बोलू नकोस माझ्याशी आणि हे बाबा बीबा म्हणायचं नाही मला कळाल का ?
धनु : मला शुभम आवडतो आम्ही लग्न करणार आहे
झालं पुन्हा डोक्यात राग आला आणि बाबानी तिला मारायला सुरुवात केली खूप खूप मारलं तिला अक्षरशः तिला मारताना बाबांना भान राहील नाही पट्टयाचा चामड्याच्या भागा ऐवजी ते पुढच्या स्टीलच्या भागाने तिला मारत होते. तोंडातून रक्त यायला लागलं तिच्या. दात पांढरे सगळे लालेलाल झाले. बाबा उठले आणि त्यांनी एक बॅग काढली त्यात धनुचे कपडे भरले आणि तिला हाताला धरलं बाथरूम पाशी नेलं. तोंड धु अस सांगितलं आणि ते आईशी बोलायला लागले. धनु बाहेर आली . तसच तिच्या हाताला धरून दोघ बाहेर पडले ते थेट बसस्टँड वर जाऊन थांबले. रांगेत उभी राहिलेली लोक धनुला विचित्र नजरेने बघत होते. धनु रडत मान खाली घालून उभी होती
बाबा : रडू नकोस बर का नाहीतर एक देईन गप्प शांत उभी राहा लोक बघतायत तोंडाकड आपल्या
त्यांचा नंबर आला त्यांनी तिकीट काढलं आणि सांगलीतल गाव गाठलं. घरी बाबांचे आई वडील आणि मोठा भाऊ होता. त्याची बायको कोल्हापूरला माहेरी गेलेली पोरांना घेऊन मग ते धनुला असल्या अवस्थेत बघून सुधीरबुधीर झाले.
काय हाल केलेत रे पोरीचे ? अस बाबांच्या आईने विचारलं काही उत्तर न देता ते धनुला आत घेऊन गेले आणि एका खोलीत तिला बसवून दाराला बाहेरून कडी लावली आणि बाहेर येऊन काय झालं ते सगळं सांगितलं आई बाबा आणि मोठ्या भावाला.
आणि मग आई एक मार्ग सुचवते…….

शेवटचा भाग १४

जिव्हार: प्रेम आणि शेवट
( शेवटचा भाग )

धनुचे बाबा उभे असतात. त्यांना त्यांची आई बसायला सांगून एक मार्ग सांगतात.
आई : ऐक मोहना , धनु आपली तशातली नाही. तिला चांगले संस्कार आहेत मला वाटतंय त्या पोरानच तिला फूस लावली असणारे बघ. त्या शिवाय नाही धनु अशी वागायची.
भाऊ : होय रे मोहन , तिला विचारलं का त्यान तिच्यासोबत काय केल का नाही वैगरे
धनुचे बाबा : नाही विचारलं. तिला मारलं आणि सरळ इकड घेऊन आलोय.
भाऊ : अरे म्हणजे कस मुली होतात वेड्या प्रेमात .पण लगेच नाही. जेव्हा पोर त्यांच्या अंगाशी खेळतात तेव्हाच खर पोरीना ते प्रेम वाटत. तस काय झालाय का विचारायला हव होत तू मोहन.
धनुचे बाबा : असल कस विचारायचं तिला ?
आई : का तुझीच आहे न पोरगी त्यात लाजायचं काय ? जा विचार आत गोड बोलून.
धनुचे बाबा आत जातात. धनु रडतच असते. ते तिला समजावतात. एक तास. आणि नंतर सांगतात तू निट वागलीस त्याला भेटायचं सोडलस तर उद्या परीक्षेसाठी मी परत तुला साताऱ्याला घेऊन जाईन. पण धनु नाही म्हणते मला शुभमला भेटायचं आहे. तो माझी वाट बघत असेल अस काही बाही बोलत असते. आत बाबांचा राग अनावर होतो. पण इथ काही तमाशा नको म्हणून ते गप्प राहतात. तिकड साताऱ्याला कोण आजूबाजूला जास्त नव्हत पण इथ सगळी घर एकमेकांना लागून आणि याचं नाव जरा जास्तच होत गावात. सगळे घरात सुशिक्षित. त्यामुळ लोक त्यांच्याकडे आदराने बघत.
बाबा : धनु शांत बसायचं हा मला जास्त बोलायला लावायचं नाही. मला सांग काय बघितलस तू त्या पोरात? धड ते दिसायला चांगल नाही. त्याची परिस्थिती नाही. राहायला घर निट नाही .आपल्या जातीतल नाही. घरात कोण शिकलेलं नाही आणि त्याची पण इच्छा दिसत नाही शिकायची. काय बघितलस काय तू त्याच्यात ?
धनु : त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे.
बाबा : तुझ नाही का ?
धनु : आहे खूप आवडतो तो मला.
बाबा : आवड आणि प्रेम ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत धनु. प्रेम म्हणजे काय नाही समजत तुला बाळा गल्लत करतीयस तू. त्याच्या आकर्षणाला तू तुझ आणि त्याच प्रेम म्हणतियस.
धनु : नाही बाबा. आकर्षण नाही आमच. त्यान मला खूप छान क्षण दिलेत. खूप आनंद दिला कमी वेळात.
बाबा : आम्ही नाहीच का दिला आनंद ?
धनु : दिला. त्यान खूप काही केल माझ्यासाठी कि मला त्याच ते वागण आवडल.खूप जास्त.
बाबा : आम्ही काहीच केल नाही का तुझ्यासाठी ? लहानाची मोठी काय तू अशीच झालीस का ?
धनु : नाही.
बाबा : मग तो का आवडला तुला या एका प्रश्नच उत्तर दे.
धनु : खरच माहित नाही.पण मला तो आवडतो.
बाबा : बर मला एक गोष्ट सांगशील ?
धनु : हो बाबा.
बाबा : बघ हा आईची शप्पथ घेऊन सांग मला खर खर मी तुला सगळ विसरून माफ करेन.
धनु : हो.
बाबा : आम्ही परवा आलो त्याच्या आधी तुम्ही काय केल घरी ?
धनु : काही नाही तुम्ही आला त्याच्या एक मिनिट आधी तो आलेला.
बाबा : खर का ?
धनु : हो आईची शप्पथ
बाबा : बर त्या व्यतिरिक्त त्यान कधी तुला हात लावलाय का कुठ ?
धनु : नाही
बाबा : खर सांग लग्नानंतर कळत नवऱ्याला तू सागीतल आत्ता मला तर मला माहित असाव ना बेटा. बोल लावलाय का त्यान तुला हात ?
धनु : हो छातीला. पोटाला
धनुचे बाबा आता काय बोलाव या विचारात उठतात दारात जातात आणि दार ओढून बाहेर जातात. आई आणि भावाशी बोलतात. ते त्यांना धनुशी झालेलं बोलण सांगतात.
आई : ऐक मोहना , तिला इथच ठेव शिकायला. म्हणजे आमच्या निगराणीत शिकलं नीट.
धनुचे बाबा : नाही ती शिकायची नाही आता.त्या पोराच्या नादात नाहीते शिकलीय. आता नाही शिकाणार ती अभ्यासच काहीच.
भाऊ : मग काय करणार आहेस ?
धनुचे बाबा : बघतो मी.
संध्याकाळी मस्त मटण बनवलेलं असत. सगळे जेवयला बसतात. धनुला बाबा बोलावतात पण ती नको म्हणते. मग धनुच्या बाबांचे भाऊ जाऊन तिला समजवतात. पण ती ऐकत नाही. मग धनुच्या बाबांची आई समजावते , ओरडते तरी ती ऐकतच नाही. मग स्वत बाबा समजवतात तर सकाळपासून शांत धनु वेड्यासारखी मला शुभमला भेटायचंय नाहीतर मी मरेन अस बोलायला लागली. या अशा वेडेपणामुळ तिच्या केलेलं जेवण कुणाला जाईना. धनुचे बाबा बाहेर जातात.
इकड शुभम बोकडाची रक्ती आणि भाकरी खात असतो. आणि त्याचा मित्र सुरज येऊन सांगतो कि धनुला घेऊन तिचे बाबा कायमचे सांगलीला गेलेत. शुभमच्या घशात घास अडकतो. त्याला काय कराव सुचत नाही. आई भांडी घासत असते. तिला काय झाल कळत नाही. शुभम भरल्या ताटावरून उठून जाताना बघून ती सुरजला हाकलून देते आणि शुभमला जबरदस्ती जेवयला लावते. शुभम जेवतो.
इकड धनुला जबरदस्ती बाबा थोडासा रस्सा आणि भाकरी देतात. ती नाही खात तरी तिला जबरदस्ती भरवतात. तिला एक घास खाताना बघून सगळ्यांना बर वाटत. मग धनुचे बाबा भावाला आणि आईला जेवयला सांगतात. दोघ निघून जातात. धनुचे बाबा तिला ओरडून ओरडून चार घास खायला घालतात.
इकड शुभम जेवण करून धनुच्या घरापाशी जातो. खरच घरात अंधार असतो. दार उघड असत आणि धनु दिसत नसते. त्याच्या डोळ्यात पाणी येत. पण काहीच पर्याय नसतो. तो घरी येतो आणि गादिखाली ठेवलेले हाराचे दोनशे रुपये घेतो आणि ठरवतो सांगलीला जायचं. पण आईकड बघून त्याला भीती वाटते आणि चोरलेले पैसे पुन्हा गादिखाली ठेवून तो खाटेवर झोपून जातो.
इकड धनुचे बाबा नाही हो नाहि हो च्या भांडणात तिला पाचवा घास चारतात. आणि तो घास चावत असतानाच धनूची दातखिळी बसते. तोंडातला घास तोंडात राहून तीच तोंड घट्ट मिटल जात. डोळ्यांची बुबुळ वर जातात आता डोळे सफेद दिसतात. हाताला ती आखडून घेते. आणि बसल्या जागी माग कलंडते. बेडच्या मागच्या लाकडी भागावर तीच डोक जोरात आपटत. धनु मरून जाते.
शुभम शांत झोपेत असतो. सकाळी नऊला उठल्यावर आवरल्यावर त्याला धनूची आठवण होते. पण काय करणार होता तो ? फक्त आठवणीत रमण्याशिवाय. आणि इकड सकाळी श्रद्धा आणि आईला सांगलीला यायचं बोलावण येत. झोपेत धनु गेली अस गावभर धनुच्या बाबांनी बातमी केली. पण खरतर बाबांनीच तिला मारलेल असत. ते जेव्हा बाहेर गेले तेव्हा ते डॉक्टर मित्राकडे गेले. त्यांच्याकडून एक अस इंजेक्शन आणल जे मांडीत दिल कि माणूस मरतो. पण मांडीत तिला कस देणार म्हणून ते मटणाच्या रस्स्यात ते औषध टाकतात. एक एक घास धनु खायला पाच दहा मिनिट लावत होती. आणि नंतर पाचव्या घासाला तिची नाडी धीमी झाली आणि अचानक श्वास थांबला. आणि तिन अंग टाकून दिल.
धनुच्या श्राद्धा नंतर श्रद्धा आई बाबा कायमचे सातारला आले. आता पुन्हा तिथ गेल तर तिची आठवण येईल म्हणून ते कायमचे साताऱ्याला येतात.
शुभम धनूची वाट बघतो. पण ती येत नाही. तो शाळा सोडून देतो आणि नंतर आईला काम करून हातभार लावतो. आणि पाच वर्षांनी शुभम एका धनुपेक्षा सुंदर मुलीशी रुपालीशी पळून जाऊन लग्न करतो. सांगलीलाच. आणि त्याचा त्याचा तो संसार करू लागतो. पण धनु त्याला आठवत असेल का ? हा प्रश्न लेखक म्हणून मला पडला आहे.

समाप्त …….

( कथा कशी वाटली ? कथा आज संपली. तुमच मत नक्की द्या. आजवर या कथेच्या १४ भागांना जो काही तुम्ही प्रतिसाद दिला न विसरण्या जोगा आहे. सर्वांचा आभारी आहे )

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

असेच वाचण्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा…

कथा सत्य घटनेवर आधारित असली तरी यातले प्रसंग पूर्णपने काल्पनिक आहे. 

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

धर्मवीर संभाजी: त्याग हिंदवी स्वराज्यासाठी

महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात

  1. खूप छान, पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे…

    • नक्कीच, पुढील भाग येतील एक दिवसाआड इथेच
      तूर्तास ” तुला प्रेमाची शप्पथ आहे ” या कथेचे 1 ते 8 भाग वाचा नक्की आवडतील

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.