जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला 32000 करोड रुपयांचा दंड, बेबी पावडर मुले महिलांना गर्भाशय कर्करोग होत असल्याचे सिद्ध

0
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला 32000 करोड रुपयांचा दंड, बेबी पावडर मुले महिलांना गर्भाशय कर्करोग होत असल्याचे सिद्ध

जॉन्सन अँड जॉन्सन यांना कंपनीच्या पावडरमुळे गर्भाशय कर्करोग विकसित झालेल्या 22 स्त्रियांना जवळजवळ $ 4.7 बिलियन (₹32202 करोड) नुकसान भरपाई देण्याचा आदेश स्ट्रीट लुईस न्यायालयाने दिला आहे.

सहा महिला गर्भाशय कर्करोगाने मरण पावल्या असून जॉन्सन अँड जॉन्सन ने 40 वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या उत्पादनामध्ये अभ्रक टाकत असल्याने हा कर्करोग झाल्याचा दावा 22 स्त्रियांनी केला होता.

स्ट्रीट लुईस येथील एका न्यायालयामध्ये सहा आठवड्यांच्या खटल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला न्यायालयाने हा दंड ठोठावला.

वैद्यकीय तज्ज्ञांनी खटल्यादरम्यान साक्ष दिली की Asbestos यामुळे कर्करोग होतो आणि हे Asbestos जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पाउडर आणि शावर टू शावर प्रॉडक्ट्समध्ये प्राथमिक घटक म्हणून वापरल्याचे आढळले आहे.

बर्याच स्त्रियांच्या अंडाशयातल्या टिशूंमध्ये Asbestos चे आढळून आले होते.

महिल्यांच्या सल्लागार लॅनिएर म्हणाले की, “आम्हाला आशा आहे की हा निर्णय जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बोर्डाचे लक्ष वेधून घेईल आणि ते Asbestos आणि गर्भाशय कर्करोगामधील संबंधांबद्दल वैद्यकीय समुदाय आणि जनतेला चांगले माहिती देतील, “लॅनिएर म्हणाले. “अजुन या भयंकर आजारामुळे अनेक स्त्रिया मरण पावण्याआधी कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट बंद करायला हवे.

जॉन्सन अँड जॉन्सन यांच्यावर 9000 पेक्षा अधिक महिलांनी खटला दाखल केला आहे ज्यांना Asbestos मुळे गर्भाशय कर्करोग झाला आहे. कंपनी मात्र त्याची उत्पादने रोगाशी निगडित नाहीत असे सांगितले आहे.

कंपनीने सांगितले की, या निकालामुळे ते गंभीर निराश झाले आहेत. त्यांच्या उत्पादनामध्ये Asbestos नसल्याचे कंपनीने दावा केला. Ovacome कंपनीने केलेल्या संशोधनावर कंपनीने प्रश्न उपस्थित केले असून यावर अजून संशोधन करण्याची गरज असल्याचे बोलले.
आपण जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे बेबी पावडर आणि इतर उत्पादने वापरता का? आम्हाला नक्की कळवा..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Ajay Devgn Chanakya: Ajay Devgan Set to Play Chanakya in Neeraj Pandey Next Film

फिफा विश्वचषक फॅन्स: फिफा विश्वचषक स्पर्धेत वायरल झालेल्या सुंदर फॅन्स चे फोटो

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.