मुख्यमंत्र्यांच्या दिवाळी शुभेच्छांवर जनतेने डागली तोफ #काळीदिवाळी

0
मुख्यमंत्र्यांच्या दिवाळी शुभेच्छांवर जनतेने डागली तोफ #काळीदिवाळी

दिवाळीनिमित्त सर्व नेतेमंडळी आपापल्या सोशल मिडिया वरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच ३०० करोड रुपये खर्च करून उभ्यारलेल्या मिडिया सेल वरून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला खरा पण ट्वीटर वर त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यातून जनतेच्या मनातील खदखद दिसून आली.

या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभ दीपावली आणि सुखमय दिवाळीचा सर्वांना शुभेच्छा जरी दिल्या असल्या तरीही त्यांना मिळालेल्या प्रतिसादातून लोकांची दिवाळी कशी चालु आहे याची प्रचीती येतेय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विरोधकांनी सुद्धा #काळीदिवाळी या Tag अंतर्गत भाजपावर शरसंधान साधले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. सर्व स्तरातून दिवाळीला काळी दिवाळी म्हणुन संबोधले गेले असून पाऊस पाणी असूनही यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळीच असल्याच्या भावना सर्व स्तरातून उमडून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कर्जमाफी योजनेला दिल्याने त्यांचा अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त झाल्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आधीच सुरु असणार्या S.T संपामुळे वैतागलेल्या आणि लोडशेडींग मुळे त्रासलेल्या जनतेतून या भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्यातच ३०० कोटी रुपये सोशल मिडिया सेल वर खर्च करून भाजपने सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे.
आपली दिवाळी कशी साजरी झाली काळी का चांगली? आम्हाला नक्की कळवा….

#काळीदिवाळी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.