कास पठारावरील ऑनलाइन बुकिंग हटवली?

0
कास पठारावरील ऑनलाइन बुकिंग हटवली?

कास, बामणोली:

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुले पाहण्यासाठी पर्यटकांना शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी सक्ती केली जात होती. आता कास पठार कार्यकारी समितिकडून ही सक्ती उठवली आहे.

तसेच येत्या शनिवार व रविवारपासून सर्व पर्यटकांना कास पुष्प पठारवार सुट्टीच्या दिवशी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कास कार्यकारी समिति यांचे वतीने सोमनाथ जाधव यांनी दिली.

यवतेश्वर घाट आणि पारंबे फाटा या कास पठारावर दोन मार्गावरून प्रवेश दिला जाणार आहे. यवतेश्वर घाट खचल्याने छोटी चार चाकी वाहने. यवतेश्वर घटातूनच ये जा करतील, तर मोठी वाहने मेढ़ा ,कुसुम्बी ,दुंद ,एकिव मार्गे पारंबे फाटयावरुन कास पठारवर येतील. असे मार्गांचे नियोजन केले असल्याचे पठार कार्यकारी समिति यांचेकडून सांगण्यात आले.

पर्यटकांची होत होती गैरसोय

ऑनलाईन बुकिंगची सक्ती करण्यात आल्याने अनेक पर्यटकांची गैरसोय होत होती. हा ऑनलाईन बुकिंगचा फंडा अनेक अनेक पर्यटकांना माहित नसायचा त्यामुळे पर्यटक नाराज होऊन परतायचे. आता ऑनलाईन बुकिंग बंद केल्याने पर्यटकांमध्ये समाधानकरक वातावरण आहे.

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.