पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

0
पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

अभियांत्रिकी आणि चहा हे अतूट नाते आपल्याला माहीतच आहे. याच नात्याचा धागा कायम ठेवत शिक्षण घेऊन मनासारखी नोकरी न मिळाल्याने खचून न जाता अजित केरुरे या तरुणाने कडक स्पेशल हे चहाचे दालन पुण्यात सुरू केले आहे. कडक स्पेशल या दालनाची पुण्यात भरपूर चर्चा होत असून येत्या काही काळात ते राज्यभर २५ दालने सुरू करणार असल्याचे अजित केरुरे यांनी सांगितले.

लातूरहुन आलेल्या अजितने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकेनिकल पदवी घेतल्यानंतर सगळ्यांसारखी नोकरीसाठी धडपड केली. परंतु दहा-पंधरा हजारापेक्षा अधिक पगाराची नोकरीच मिळेना.. अशाच दोन नोकऱ्या केल्या परंतु त्यात मन रमेना म्हणून नोकरीला रामराम स्वतःच्या पायावर उभे राहत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
सदाशिव पेठ म्हणजेच पुण्यातील प्रमुख ठिकाणी ब्राह्मण मंगल कार्यालयाजवळ दीड महिन्यापूर्वी त्याने कडक स्पेशल दालन सुरू केले. पुणेरी पाट्या आणि त्याला जोड म्हणून दालनात ‘मॅकेनिकल इंजिनीअरिंगची पदवी लग्न जमवण्यासाठीच उपयोगी पडली’ अशी उपरोधिक पाटी लावल्याने त्यांच्या दालनाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. चहा, कॉफी, दुध असे एकूण 10 प्रकारचे पेय ते विकतात.

व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या अजितने शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बराच वेळ घालवल्यानंतर चहाचा व्यवसाय करण्याचे निश्चित केले. चहाचे दालन सुरू करण्याच्या कल्पनेला घरातून पाठिंबा मिळाला. चहाची चव आणि किंमत हे मुद्दे व्यवसायासाठी महत्वाचे असल्याचे जाणवले. बरोबर किंमत आणि चव यामुळे अल्पावधीत प्रसिद्धी मिळून भारावून टाकणारा प्रतिसाद मिळत आहे.

कडक स्पेशल व्यवसायात अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग

या चहाच्या व्यवसायात उतरताना दालन कसे असावे, चहाची किंमत,चवीसाठी चहा पावडर कोणती या सर्वाचा अभ्यास महत्वाचा होता असे अजितने सांगितले. चहाची चव निश्चित करण्यासाठी जवळपास ३७५ लिटर दूध वापरले तेव्हा चव ठरवली गेली.

नोकरीसाठी अभियांत्रिकी पदवी कामी आली नसली, तरी व्यवसाय सुरू करताना शिक्षणातील बारीकसारीक कौशल्याचा उपयोग झाल्याचे त्याने आवर्जून सांगितले. काही दिवसांपूर्वी स्वतः नोकरी शोधणाऱ्या अजितकडे आज बारा जण कामाला आहेत. 15-20 हजारांच्या नोकरीसाठी धडपडणारे अजित आज महिन्याला 15 लाख रुपये कमावतात.

कडक स्पेशल चहा दालन मधील पुणेरी पाट्या

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Top 10 Digital Marketing Courses in Pune with 100% Placement Assistance

The Famous Tea Seller Yewle Tea House from Pune City Earns 12 lakh per Month

महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.