कंगना राणावत ची मराठी पत्रकाराला धमकी, खोटेपणा उघड केल्याने धमकी

0
कंगना राणावत ची मराठी पत्रकाराला धमकी, खोटेपणा उघड केल्याने धमकी
Share

बॉलिवूड सेलिब्रिटींना टक्कर देणारी कंगना राणावत आता मीडियावरही जोर धरत आहे. पर्याय नसल्याने तिला शिवसेनेला मतदान करावे लागले होते असा कंगणाने एका मुलाखतीमध्ये केला होता. हा दावा आज तक आणि मुंबई तक चे पत्रकार कमलेश सुतार यांनी खोडून काढत तिचा खोटारडेपणा उघड केला होता. ज्या विधानसभा मतदारसंघासाठी ती मतदान करते त्यामधून शिवसेनेचा लोकसभा आणि विधानसभा अशा कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याचे त्यांनी पुराव्यासहित खोडून काढले. यावर कंगना भडकली आणि ट्विटर वर पत्रकाराला कायदेशीर कारवाईची धमकीच दिली.

कमलेश सुतार यांचा कंगना राणावत ची पोल खोल करणारा व्हिडिओ

यावर कंगणाने ट्विटर वर कमलेश सुतार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन टाकली

पण कमलेश सुतार यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिले. यावर ते म्हणाले की ‘मी एक पत्रकार आहे कोणी ट्रोल करणारा नाही. माझ्यासारख्या पत्रकाराला “तुला किंमत चुकवावी लागेल” यासारख्या दहशतीच्या भाषेत बोलू नका’.

यानंतर मात्र कंगणाने पळ काढत कमलेश सुतार यांनाच ब्लॉक करून टाकले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.