Karmaveer Bhaurao Patil: शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारा शिक्षण महर्षी

0
Karmaveer Bhaurao Patil: शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारा शिक्षण महर्षी

शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील Karmaveer Bhaurao Patil

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Karmaveer Bhaurao Patil Information, भाऊराव पायगौंडा पाटील, डॉ. भाऊराव पाटील, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील

महाराष्ट्रात शिक्षण देणारया संस्था खुप आहेत आणि त्या संस्थाचे उदिष्ट पैसा कमविणे हाच असतो. ह्या सर्व खाजगी कंपन्या झाल्या आहेत. सुजाण नागरिक घडविणे आणि देशाचा विकास करण्याचा उदेश या शिक्षण संस्थाच्या संचालकाचा नाही. विद्यार्थी दशे पासूनच जर विद्यार्थांना प्रवेश घेताना भष्ट्राचार करून शिक्षण घेत असतील तर पुढे कोणत्याही पदव्या त्यांनी घेतल्या तर त्याचा उदेश फक्त पैसा कमविणे हाच असणार आहे. त्यांना देशाच्या विकासाशी कोणते ही देणेघेणे नाही. दिनाक ४ ऑक्टोबर १९१९ ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. त्यावेळी १९१९ ला उदिष्ट लक्षवेधी होते.

Rayat Shikshan Sanstha रयत शिक्षण संस्था उद्दीष्ट

१. शैक्षणिक दुष्ट्या गोरगरीब मागासवर्गीय समाजात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ते वाढविण्यास मदत करणे.
२. मागासलेल्या समाजात गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
३. निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांत बंधुभाव निर्माण करणे.
४. अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
५. संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
६. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
७. बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.असे शिक्षण देणारे संस्था संचालक शोधून हि सापडणार नाहीत..रयत शिक्षण संस्था ही भी आज सत्यशोधक महात्मा फुलेच्या वैचारिक वारसदार भाऊराव पाटील यांच्या धेय्य धोरणा नुसार चालत नाही या संस्थेत पूर्ण चातुर्वर्ण आणि गर्वसे कहोचा चा बोलबाला आहे.

Karmaveer Bhaurao Patil

कर्मवीर भाऊराव पाटील जन्म २२ सप्टेंबर १८८७; कुंभोज,जिल्हा कोल्हापूर,महाराष्ट्र येथे झाला.ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील (Rayat Shikshan Sanstha Founder Karmaveer Bhaurao Patil) यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.लहानपणा पासूनच भाऊराव बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड होती.अस्पृश्यता पाळणाऱ्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला होता.पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले.याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळीं बरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले होते. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह त्यांनी सुरू केले होते. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला होता.त्यामुळे त्यात त्यांनी समाजात परिवर्तन घडविण्या साठी प्रथम शिक्षण संस्थाची सुरवात केली.त्याच्या कार्याला डॉ नागनाथअण्णा नायकवडी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची प्रथम देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.आणि इतिहास लिहला गेला.

Rayat Shikshan Sanstha Startup रयत शिक्षण संस्था सुरुवात

मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलीला शिक्षण घेण्या साठी साताऱ्यात भाऊराव पाटील Bhaurao Patil यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली होती. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.जून १६, इ.स. १९३५रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक समाजाच्या विचाराने भारावलेली एक पिढी त्यांनी घडविली. जेव्हा सातारा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाने लोक जागृतीसाठी जलसे काढले तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी मागेपुढेही पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधि‍वेशन घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील Karmaveer Bhaurao Patil यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी एक खास संस्था काढण्याची कल्पना मांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात त्यास मान्यता मिळाली. अशा रितीने रयत शिक्षण संस्थेचे बीज सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले. वृक्षाखाली गौतम बुध्‍दांना ज्ञान प्राप्त झाले. बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !! हे गौतम बुध्‍दांचे संदेश आहे म्हणून संस्थचे बोधि‍चिन्ह वटवृक्ष आहे.

स्वावलंबी शिक्षण : कमवा आणि शिका

देशातील भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कराड येथे ‘(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले.

Laxmibai Bhaurao Patil लक्ष्‍मीबाई भाऊराव पाटील

Laxmibai Bhaurao Patil लक्ष्‍मीबाई भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्‍या सामाजिक कार्यात त्‍यांच्‍या अर्धांगिनी लक्ष्‍मीबाई भाऊराव पाटील (Laxmibai Bhaurao Patil) यांनी मोलाची साथ देत संसाराचा गाडा ओढत ओढत रयत शिक्षण संस्थेचा गाडाही ओढत नेला. कुंभोजजि. कोल्हापूर येथील अण्‍णा पाटील यांची मुलगी लक्ष्‍मीबाई यांचा जन्‍म ७ जून १८९४ रोजी कुंभोज येथे झाला. लक्ष्‍मीबाई व भाऊरावांचे लग्‍न सन १९०९ मध्‍ये कुंभोज येथे झाले. 

‘ श्री  छत्रपती शाहू  बोर्डिंग हाऊस’ वसतिगृहाची जबाबदारी लक्ष्‍मीबाई पाटील (Laxmibai Bhaurao Patil) यांच्यावरच होती. भाऊराव बोर्डिंगच्या व इतर सार्वजनिक कामासाठी महिन्यातील पंधरा- वीस दिवस  फिरतीवर असायचे त्यामुळे लक्ष्‍मीबाई यांना वसतिगृहाची कमान सांभाळावी लागत असे. 

१९३० च्या मकर संक्रात सणाच्या वेळी वसतिगृहाची परिस्थिती फारच बिकट झाली होती. वसतिगृहातील मुलांना खायला धान्यच उरले नव्हते. पैसा सुद्धा  शिल्लक  नव्हता. ऐन सणासुदीत  व्यापारी उधार धान्य  देण्यास सुद्धा तयार नव्हता. अशावेळी भाऊराव  देणग्या जमा  करण्यास बाहेरगावी  गेलेले होते. अशा वेळी लक्ष्‍मीबाई यांना काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. वसतिगृह सांभाळताना आधीच लक्ष्‍मीबाई यांनी लग्नात केलेले आपले ६०  तोळ्यांचे  सोन्याचे दागिने  विकले होते. आता  विकण्यासाठी मंगळसूत्र सोडून एकही दागिना शिल्लक नव्हता.  क्षणभर मनाची घालमेल झाली. मुलांना उपवास घडेल या विचाराने त्यांनी सौभाग्याचे लेणें मंगळसूत्र काढून ते  गहाण ठेवुन  पैसे आणण्यास सांगितले आणि सर्व मुलांना पोटभर जेऊ घातले. अशा या निस्वार्थी मातेच्या त्यागावर आज रयत शिक्षण संस्था उभी आहे. 

Laxmibai Bhaurao Patil and Karmaveer Bhaurao Patil
Laxmibai Bhaurao Patil and Karmaveer Bhaurao Patil

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. कर्मवीर भाऊराव पाटील Karmaveer Bhaurao Patil यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार. रयत शिक्षण संस्था मधून बाहेर पडलेले विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडतात.

अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी: पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, First Indian Lady Doctor Anandibai Gopalrao Joshi

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.