आम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचं नाक कापून टाकू; करणी सेनेची धमकी

0
आम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचं नाक कापून टाकू; करणी सेनेची धमकी

‘पद्मावती’चं प्रदर्शन कुणीही रोखू शकत नाही, असं वक्तव्य करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर हल्ला करण्याची धमकी करणी सेनेनं दिली आहे. ‘आम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचं नाक कापून टाकू,’ अशी धमकी करणी सेनेनं दिली आहे. ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाविरोधात १ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची घोषणाही त्यांनी केली.

राणी पद्मिनीच्या जीवनावर आधारित ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून राजपूतांचा अपमान करण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. राजस्थानातील करणी सेनेनं सुरुवातीपासूच या चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण करण्यापासून सेट जाळण्यापर्यंतच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. इतका विरोध होत असतानाही, ‘पद्मावती प्रदर्शित होणारच. कुणीही ते रोखू शकत नाही’, असा वक्तव्य दीपिकानं केलं होतं. त्यामुळं करणी सेनेचा तीळपापड झाला आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनी आज लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. ‘पद्मावती हिंदूंच्या भावना दुखावणारा चित्रपट आहे. त्यासाठी भन्साळींना दुबईतून पैसा मिळाला आहे. दाऊद इब्राहिमनं त्यांना दुबईमार्गे पैसा पुरवला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा चित्रपट येऊ देणार नाही,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दीपिका पादुकोणचं नाक कापण्याची जाहीर धमकीही त्यांनी यावेळी दिली.

News Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.