चार मिनीटाच्या रीलने जगासमोर आलाय १०० कोटीचा ‘केजीएफ’ ; पडद्यामागची कथा

0
चार मिनीटाच्या रीलने जगासमोर आलाय १०० कोटीचा ‘केजीएफ’ ; पडद्यामागची कथा

सध्या देशभरात सुपरस्टार यशच्या (Yash) ‘केजीएफ २’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सध्या भारतीय सिनेसृष्टीत तुफान कमाई करत नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाने सुपरस्टार यशला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.  मात्र ज्या चित्रपटाच्या कथेने सर्वांनाच वेड लावले आहे त्या केजीएफ च्या निर्मितीची कथाही भन्नाट आहे. कसा तयार झाला हा ब्लॉकबस्टर सिनेमा, काय आहे चित्रपटाच्या यशामागची कहाणी आणि कोण आहे या चित्रपटाचा पडद्यामागचा कलाकार चला जाणून घेऊ. 

केजीएफ चित्रपटाच्या यशामागे सर्वात मोठा वाटा या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याचा म्हणजेच रॉकी भाईचा आहे. कोलार गोल्ड फिल्ड्स अर्थात ‘केजीएफ’ची कथा, तिचे दिग्दर्शक प्रशांत नील यांना आधी फक्त एक छोटा कन्नड चित्रपट बनवायचा होता. जेव्हा चित्रपटाच्या पहिल्या प्रकरणाचे हिंदी हक्क विकले गेले, तेव्हा या चित्रपटाची एकही ओळ हिंदीत लिहिली गेली नव्हती. मात्र हे सगळे यशच्या पराक्रमाने सहज शक्य झाले. यश या चित्रपटाच्या चार मिनिटांच्या रीलसह पहिल्यांदा मुंबईत आला आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच पालटले.

फार कमी लोकांना माहीत असेल की, यशनेच  चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांना मोठ्या बजेटचा चित्रपट बनवायला तयार केले आणि पहिला चित्रपट जेव्हा चार तासांचा झाला तेव्हा तो दोन भागांत प्रदर्शित करण्याची तयारी केली गेली. आता या चित्रपटाचा शेवटचा भाग म्हणजेच ‘KGF Chapter 3’ देखील बनवणार आहे. प्रशांत नील म्हणतात, “या कथेला इतके मोठे यश देण्याचे श्रेय केवळ यशलाच जाते.” .

एक्सेल एंटरटेनमेंटचे बिझनेस हेड विशाल रामचंदानी म्हणतात, “मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा अनिल थडानी माझ्या ऑफिसमध्ये आला होता. चित्रपटाच्या निर्मात्यासोबत यशही आला होता आणि यशच्या बोलण्याच्या शैलीमुळेच रीलचा एकही शब्द न समजता हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याची प्रेरणा मिळाली. आणि फक्त शो रीलच नाही, तर चित्रपटाची पहिली चार तासांचा भाग तयार असतानाही यशने तो कन्नड चित्रपट पूर्ण चार तास आमच्यासमोर वाजवला आणि हिंदीत दृश्यानुसार कथन केला.” त्यामुळेच या चित्रपटाच्या कथेमागे या चार मिनिटांच्या रिलचाच सर्वात मोठा वाटा आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.