उत्तर कोरियाने किम जोंग उन यांची तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळानंतर प्रथम जाहीरपणे छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ते गंभीर आजारी असल्याचा अनेक बातम्या आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूचा अंदाज देखील अनेकांनी बांधला होता.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी ने व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध केले असून यामध्ये किम जोंग उन यांनी प्योंगयांग जवळ खताच्या कारखाना उदघाटन समारंभात हजेरी लावलेली दिसत आहे.

या उदघाटन समारंभाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांची बहीण किम यो जोंग या सुद्धा उपस्थित होत्या. तज्ञानुसार किम यांचे काही बरेवाईट झाल्यास संभाव्य उत्तराधिकारी म्हणून बहीण किम यो जोंग यांना ओळखले जाते.

किम यांच्या मृत्यूबाबत अनेक बातम्या येत होत्या. त्याचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम II सुंग यांच्या 15 एप्रिल च्या जयंती कार्यक्रमास ते उपस्थित नसल्याने किमच्या आरोग्याविषयी अटकळ वर्तवण्यात येत होत्या.
36 वर्षीय किम हे सार्वजनिक जीवनातून गायब होण्याची ही काही त्यांची पहिली वेळ नाही. 2014 मध्ये, ते जवळजवळ सहा आठवडे गायब झाले होते. त्यावेळी त्यांच्या घोट्याच्या सिस्टवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे बोलले जात होते.

अलिकडच्या वर्षांत त्याचे आरोग्य वरवर पाहता एक वाढणारी समस्या बनली आहे. त्यांचे आरोग्य हे स्थूलपणा, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे वारंवार बिघडत असते. त्यांचा कौटुंबिक इतिहास हृदयाच्या रोगाचा असल्याने त्यांची जास्त काळजी घेतली जाते.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.