शाहरुख खान चे फिरले तारे

0
शाहरुख खान चे फिरले तारे

म्हणतात ना की सुखाचे नऊ दिवस, एकदा दुःखाचे दिवस चालु झाले की झाले. असेच सध्या किंग खान शाहरुख खान यांच्या बाबतीत घडतेय.
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला “जब हॅरी मेट सेजल” मोठ्या पडद्यावर अक्षरशः पडल्यानंतर वितरकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी शाहरुख खान कडे नुकसान भरपाई साठी तगादा लावला आहे. सलमान खानच्या ट्यूबलाइट च्या अपयशानंतर त्याने वितरकांना ३२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली होती याचेच उदाहरण देत वितरकांनी शाहरुख खानला भरपाई देण्याचा सल्ला दिला आहे.
सुपरस्टार रजनीकांत ला सुद्धा अशाच प्रकारचा एकदा फटका बसला असून “लिंगा” च्या अपयशानंतर वितरकांनी ४० कोटींची मागणी केली होती आणि ते त्याने देऊ केले होते.
बहुतेकदा सिनेमा अपयशी होऊन सुद्धा त्याचे सॅटेलाइट राईट्स, संगीत राईट्स विकून निर्माते घातलेला पैसे भरून काढतात पण वितरकांना खरा तोटा सहन करावा लागतो. त्यासाठी त्यांनी शाहरुख खानच्या मागे पैशासाठी तगादा लावला असून तो याचे काय करतो हे बघण्यायोग्य राहील.

आपणास याबद्दल काय वाटते, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.