धाडस हिरकणीचं: कोजागिरी पोर्णिमा विशेष

0
धाडस हिरकणीचं: कोजागिरी पोर्णिमा विशेष

 आज कोजागिरी पौर्णिमा…. आज उत्सव चांदण्या रात्रीचा…. पण याच कोजागिरीच्या रात्रीच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली होती….. . कोजागिरीच्या रात्रीच हिरकणी रायगडाची अवघड वाट उतरुन खाली आली…. घरी रडणा-या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंव्हांचं बळ एकवटलं….. आणि त्या दिवशीची हिरकणीची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली…..
ती रात्र कोजागिरी पौर्णिमेची….. गोष्ट चार-पाचशे वर्षांपूर्वीची….


स्थळ – किल्ले रायगड….
वेळ – रात्री आठच्या सुमाराची…..

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली, अशी एक घटना तिथं घडली….. हिरकणी नावाची गवळीण संध्याकाळी रायगडावर दूध पोहोचवण्यासाठी गेली…. काम करता करता उशीर झालेला त्या माऊलीला कळलंच नाही….. महाराजांचे सक्त आदेश होते…. संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झालेच पाहिजेत….. कुणाचीही गय नाही…. दरवाजे बंद झाले…

हिरकणीला गडाखाली जाता येईना…. तिचं तान्हुलं गडाखाली तिच्या घरी होतं…. घरी जाऊन त्या तान्हुल्याला पाजायचं होतं…. त्या माऊलीची प्रचंड घालमेल झाली…. अखेर मागचा पुढचा विचार न करता हिरकणी गडाच्या मागच्या बाजूनं अतिशय अवघड वाटेनं एकटी खाली उतरली… घरी जाऊन बाळाला घेतलं, तेव्हा कुठे तिचा जीव शांत झाला…


दुस-या दिवशी शिवरायांना ही गोष्ट कळताच राजांनी हिरकरणीचा सन्मान केला…. तिच्या सन्मानार्थ रायगडावरचा एक कडा हिरकणी बुरूज म्हणून ओळखला जाऊ लागला…… हा सन्मान होता तिच्या मातृत्वाचा आणि धैर्याचा….. हिरकणी म्हणजे मातृत्वाचं प्रतीक, धाडसाचं प्रतीक…. करिअर आणि मूल यांचा योग्य ताळमेळ साधत यशस्वी होते ती हिरकणी…… अशा अनेक हिरकण्या आजही देशोदेशी, खेडोपाडी, गावोगावी आपापली लढाई लढतायत….. आजच्या मुहूर्तावर सलाम या सगळ्या हिरकरण्यांना….

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.