अहमदनगर : संपूर्ण देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातले कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. तीनही आरोपींवर गुन्हा सिद्ध केला गेला आहे.
जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर येथे शिक्षेची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कटकारस्थान, बलात्कार आणि खूनाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आहे.
शिक्षेत फाशी होईल की जन्मठेप हे २१ नोव्हेंबरला जाहीर होईल.
१३ जूलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आली.
ह्या घटनेचे पडसाद संपूर्ण जगात आणि मुख्यत्त्वे महाराष्ट्रात उमटले होते. मराठा मूक क्रांती मोर्चा च्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला एक शांततामय विराट आंदोलन पाहायला मिळाले. जगात अनेक ठिकाणी मराठी समाजाने यावर आंदोलने केली.
कोपर्डीच्या ताईला शेवटी न्याय मिळाला असे वाटत आहे.
News Source