…तर मी आत्महत्या करेन : कमाल आर खान

0
…तर मी आत्महत्या करेन : कमाल आर खान

याआधी मागील वर्षी प्रदर्शित झालेला अजय देवगणच्या ‘शिवाय’ चित्रपटाच्या वाईट रिव्ह्यूमुळे त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. अतिशय वादात राहिलेला हा व्यक्ती आहे.

“15 दिवसात माझं ट्विटर अकाऊंट सुरु केलं नाही तर मी आत्महत्या करेन,” अशी धमकी अभिनेता कमाल आर खानने दिली आहे. केआरकेने प्रेस रिलीज जारी करुन आत्महत्येची धमकी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमीर खानवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ट्विटरने केआरकेचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं होतं. यानंतर ट्विटरविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं.

याआधी मागील वर्षी प्रदर्शित झालेला अजय देवगणच्या ‘शिवाय’ चित्रपटाच्या वाईट रिव्ह्यूमुळे त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं.

आता केआरकेने प्रेस रिलीज जारी करत आपलं अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह करण्याची विनंती ट्विटरला केली आहे. “जर अकाऊंट रिस्टोअर झालं नाही तर आत्महत्या करेन,” अशी धमकी त्याने दिली आहे.

केआरकेने प्रेस रिलीज जारी करुन म्हटलं आहे की,  “@Twitterindia आणि त्यांचा स्टाफ महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना माझी विनंती आहे की, 15 दिवसात माझं अकाऊंट पुन्हा सुरु करावं. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि अचानक माझं अकाऊंट सस्पेंड केलं. ट्विटरने माझी फसवणूक केली आहे, त्यामुळे मी दु:खी आहे. जर माझं अकाऊंट रिस्टोअर झालं नाही तर मी आत्महत्या करेन. हेच लोक माझ्या मृत्यूसाठी जबाबदार असतील.”

News Source : ABP MAJHA 

याआधी ही केआरके ने ” मोदी पंतप्रधान झाले तर देश सोडीन” असे विधान केलेच होते नी सर्व भारतीयांनी पहिले आहे काय झाल ते. त्यामुळे त्याला कोणी सिरीयस घेईल कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.