नालायक पाकिस्तानकडून कुलभुषण जाधव यांचा भारतावर आरोप करणारा व्हिडीओ प्रसिध्द, भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न

0
नालायक पाकिस्तानकडून कुलभुषण जाधव यांचा भारतावर आरोप करणारा व्हिडीओ प्रसिध्द, भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न

भारतीय कुलभुषण जाधव हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात जेल मध्ये कैद आहेत. त्यांची फाशी थांबवायला भारताला आलेल्या यशानंतर पाकिस्तान कुलभुषण जाधव यांना आणि भारताला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा छेडछाड केलेला अजून एक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित केला आहे. यात कुलभुषण जाधव आपली आई आणि पत्नी भेटायला आली तेव्हा भारतीय राजनियक जे पी सिंग त्यांच्यावर ओरडत होते असा दावा करताना दिसत आहे.

‘माझी भेट झाल्यानंतर भारतीय राजनियक माझ्या आई आणि पत्नीवर का ओरडत होते?’ असा प्रश्न कुलभुषण जाधव व्हिडीओत विचारताना दिसत आहेत. अजून ते या व्हिडीओ मध्ये ‘भेटीदरम्यान माझ्या आईला मारहाण करुन आणण्यात आलं असं वाटत होतं’ असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. तसंच आपण गुप्तहेर खात्यात काम करत नव्हतो अशी खोटी माहिती भारत का देत आहे? असा प्रश्न ते विचारताना दिसत आहेत. ‘मी ठीक असून पाकिस्तान माझी चांगली काळजी घेत आहे, त्यांनी मला हात सुद्धा लावला नाही, आईने मला स्वतःहून पाहिल्यावर विश्वास ठेवला.’ असे कुलभुषण जाधव म्हणताना दिसत आहेत.
.

‘मला भारतातील लोकांना आणि सरकारला सांगायचे आहे की, मी भारतीय नौदलातील अधिकारी आहे. माझ्याबद्दल खोटी माहिती का देताय?’, असं कुलभुषण जाधव बोलताना दिसत आहेत.
.

यावर उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने यावर आश्चर्य व्यक्त न करत पाकिस्तान कुलभुषण वर दबाव आणून अशी वक्तव्ये द्यायला भाग पाडत असल्याची प्रतिक्रिया दिली.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याला उत्तर देत भारतीय नागरिकाच्या मानवाधिकाराचे उल्लंघन न करण्याचा सल्ला दिला. 

For More Info
Kulbhushan Jadhav Case : Kulbhushan Jadhav a prisoner in Pakistan, met with his wife and mother in Pakistan Jail

बांगड्या-टिकली उतरवल्या, मातृभाषेतही बोलू दिलं नाही..

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या परिवाराचा अपमान केला : – सुषमा स्वराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

©PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.